40% भारतीय प्रवासी हॉटेलमधून उचलतात साबण-शॅम्पू; सर्वेतून समोर आल्या प्रवासासंबंधित लोकांच्या अंतरंगी सवयी
सहलीमधील सगळ्यात मजेदार भाग म्हणजे प्रवासादरम्यान घडणारे गंमतीशीर आणि विचित्र अनुभव असतात. प्रवास करताना असे अनेक प्रसंग घडतात, जे कधी राग आणतात, तर कधी खूप हसवून जातात. विशेषतः जर भारतीय प्रवाशांची गोष्ट असेल, तर प्रवासात काहीतरी मजेशीर न घडणं अशक्यच! अलीकडे एक सर्वेक्षण करण्यात आलं, ज्यात भारतीय प्रवाशांच्या काही भन्नाट सवयी आणि अनुभव उघडकीस आले, जे वाचून तुमचं हसू थांबणार नाही. चला तर मग पाहूया या खास गोष्टी.
काय विसरतात पॅक करायला?
या सर्वेच्या माहितीनुसार, 37% प्रवासी फोन चार्जर किंवा अॅडॅप्टर घरीच विसरतात. त्यानंतर टूथब्रश/टूथपेस्ट, औषधं आणि इयरफोन विसरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. काही प्रवासी तर छत्री, सनग्लासेस, आणि महत्त्वाचे ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स देखील पॅक करायला विसरतात.
हॉटेलमध्ये विसरून येतात हे विचित्र सामान
सर्वे अनुसार, 42% भारतीय प्रवासी हॉटेलमध्ये कपडे जसे की मोजे, शर्ट विसरून जातात. 37% लोक इलेक्ट्रॉनिक उपकरणं, 36% टॉयलेट्रीज, 30% लोक चष्मा, आणि 22% जण दागिने विसरतात. 17% प्रवाशांनी पासपोर्ट विसरले, तर 15% जणांनी हेअर एक्स्टेन्शन आणि 13% जणांनी दातांसाठीचे अलाइनर्स विसरले. विशेष म्हणजे, 12% प्रवासी आपले पाळीव प्राणीही मागे ठेवतात!
नमकीन आणि बिस्किटे – प्रवासातील खरा आधार
भारतीय प्रवाशांसाठी प्रवासात स्नॅक्स खूप महत्त्वाचे असतात. 54% लोक नमकीन, खाखरा किंवा बिस्किटं बरोबर नेतात. 41% जण ड्रायफ्रूट्स घेतात, 39% जण चॉकलेट किंवा कँडी बरोबर नेतात आणि 37% लोक घरी बनवलेले पराठे, थेपला किंवा पुरीसारखे पदार्थ बरोबर घेऊन निघतात.
या चुका बिघडवतात सुट्टीचा मूड
भारतीय प्रवाशांच्या सुट्ट्या बिघडवण्याचे मुख्य कारण म्हणजे – ट्रान्सपोर्टमधील अडचणी, खराब हवामान, योग्य अन्न मिळण्यात अडचण, खूप टाईट शेड्यूलमुळे आराम न मिळणं, आणि हॉटेलमधील गोंगाट करणारे शेजारी.
चुकून दुसऱ्याच्या खोलीत प्रवेश!
या सर्वेतून अजून एक मजेशीर बाब समोर आली – 52% भारतीय प्रवासी स्थानिक भाषेत चुकीचं बोलून विनोदाचा विषय बनतात, तर 42% लोक चुकून दुसऱ्याच्या हॉटेल रूममध्ये शिरल्याचं कबूल करतात. याशिवाय, 25% लोकांनी चुकीच्या तारखेला एअरपोर्टवर पोहोचण्याची चूक केल्याचं मान्य केलं आहे.
आठवणीसाठी काय आणतात?
64% भारतीय प्रवासी स्थानिक कपडे, 58% स्थानिक खाद्यपदार्थ आणि 50% लोक फ्रिज मॅग्नेट, मग, की-चेन यांसारख्या वस्तू आठवणीसाठी खरे