
तुळशीच्या पानांचे फायदे (फोटो सौजन्य - iStock)
तुळशीच्या रोपाला केवळ धार्मिक महत्त्व नाही, तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही ते खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदात तुळशीच्या पानांना ‘औषधांची राणी’ म्हटले जाते. तुळशीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल सारखे गुणधर्म असतात. अशा स्थितीत जर तुम्ही दररोज रिकाम्या पोटी तुळशीची पाच पाने चघळली तर ते तुमच्या शरीरातून एक एक करून अनेक आजार दूर करू शकतात. येथे तुम्ही तुळशीच्या पानांचे सेवन करण्याचे काही फायदे जाणून घेऊ शकता. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी तुळशीच्या पानांचे काही महत्त्वाचे होणारे फायदे सांगितले आहेत, जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
Viral ताप
तापापासून ठेवते दूर
तुळशीच्या पानांमध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टीरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात, जे शरीरातील विषाणूजन्य संसर्ग दूर करण्यास मदत करतात. तुळशीची पाने नियमित चघळल्यास विषाणूजन्य तापासारख्या समस्या कमी होऊन शरीर लवकर बरे होऊ शकते. ताप, सर्दी अथवा खोकला जो व्हायरल होतो त्यावेळी तुळशीची पाने चाऊन खावीत अथवा तुळशीच्या पानाचा काढा पिण्यानेही हा आजार पटकन बरा होतो आणि नियमित तुळशीच्या पानाचे सेवन केल्यास तुम्हाला व्हायरल तापाला सामोरे जावे लागत नाही
सर्दी आणि खोकल्यावर उत्तम उपाय
सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय
तुळशीची पाने सर्दी, खोकला आणि फ्लूपासून आराम देतात. या पानांमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असतात जे श्वसनसंस्था मजबूत करण्यास आणि श्वासोच्छवासाच्या नळ्या स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. तुम्हाला नियमित प्रदूषण अथवा अन्य संक्रमणापासून दूर राहण्याची इच्छा असेल तर रोज सकाळी उपाशीपोटी अगदी उठल्या उठल्या तोंडही न धुता तुळशीची पाने खावीत, तुम्हालाच त्याचा योग्य फायदा लवकर दिसून येईल. विशेषतः ज्यांना धुळीमुळे सतत सर्दी-खोकला होतो त्यांनी याचा वापर अधिक करावा
https://www.navarashtra.com/lifestyle/benefits-of-drinking-tulsi-leaves-water-recipe-for-making-tulsi-leaf-water-659041.html#: :text=%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A5%80%20%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%20%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE,%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87.
पचनाशी संबंधित त्रास
पोटाशी संबंधित त्रास करेल दूर
तुळशीची पाने पोट स्वच्छ ठेवण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतात. या पानांमध्ये अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे पोटाची सूज कमी करतात आणि गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर करण्यात मदत करतात. आजकाल अयोग्य वेळी जेवण अथवा कोणत्याही पदार्थाचे कधीही सेवन करणे हे त्रासदायक ठरते आणि अनेकांना पोटाच्या खूपच समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. यासाठी तुळशीची पानं उत्तम रामबाण उपाय ठरतील.
तणावापासून सुटका
तुळशीच्या सेवनाने तणाव होईल दूर
तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. तुळशीमध्ये ‘अद्रक’ नावाचे तत्व असते जे मानसिक शांती आणि स्थिरता आणण्यास मदत करते. याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत होऊ शकता. तसंच तुम्हाला मेडिटेशन करतानाही तुळशीतील या गुणधर्माचा उपयोग होऊ शकतो. तुम्ही तुळशीच्या पानाचे नियमित सेवन करावे
तुळशीच्या नियमित सेवनाने काय होते? जाणून घ्या फायदे
डायबिटीस रूग्णांसाठी
डायबिटीसच्या रुग्णांनी रोज करावे सेवन
तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. यामुळे शरीरातील इन्सुलिनचा प्रभाव सुधारतो, ज्यामुळे मधुमेहाची समस्या आटोक्यात ठेवता येते. तुम्हाला जर शरीरातील साखर सतत वाढत असेल तर तुळशीच्या पानांचा आधार घेणे लाभदायक ठरेल. डायबिटीस रूग्णांनी आपल्या डाएटमध्ये रोज सकाळी तुळशीचा समावेश करून घ्यावा
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.