Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लिव्हरला मिळवून देतील मजबूती 5 वनस्पती, आयुर्वेदातील अश्वगंधा पळवून लावेल आजार

Herbs For Liver: यकृत आपल्या शरीराच्या अनेक भागांमध्ये पोषक द्रव्ये पोहोचवण्याचे आणि शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करण्याचे काम करते. औषधी वनस्पतींचे नियमित सेवन यकृताचे आरोग्य सुधारू शकते

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 15, 2024 | 04:23 PM
निरोगी लिव्हरसाठी या वनस्पतींचे करा सेवन

निरोगी लिव्हरसाठी या वनस्पतींचे करा सेवन

Follow Us
Close
Follow Us:

यकृत हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे, जो शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यात आणि पचनक्रिया उत्तम राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. यकृत निरोगी ठेवण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित अनेक आजार बरे करण्यासाठी काही औषधी वनस्पती प्रभावी मानल्या जातात, ज्याच्या मदतीने अनेक आजार दूर ठेवता येतात. आयुर्वेदात अशा काही वनस्पती आहेत ज्या लिव्हरचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत करतात. 

अनहेल्दी लिव्हरमुळे भूक न लागणे, निद्रानाश, थकवा जाणवणे, अशक्तपणा, वजन झपाट्याने कमी होणे, उलट्या होणे आणि यकृताला सूज येणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. आयुर्वेदात यकृताच्या काळजीसाठी अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती सांगितल्या आहेत. परमीत कौर, प्रमुख आणि मुख्य, पोषणतज्ज्ञ आणि आहारतज्ञ, मोरिंगो एशिया हॉस्पिटल, गुरुग्राम यांच्या मते, यकृत निरोगी ठेवण्यासाठी आणि त्याचे नुकसान नियंत्रित करण्यासाठी अनेक औषधे उपलब्ध आहेत, परंतु काही प्रभावी औषधी वनस्पतींच्या मदतीने तुम्ही यकृताची काळजी घेऊ शकता. अनेक समस्यांपासून तुम्हाला आराम मिळू शकतो आणि यामुळे लिव्हर निरोगी राहते (फोटो सौजन्य – iStock) 

अश्वगंधा वनस्पतीचा उपयोग

अश्वगंधातील गुणधर्म ठरतील योग्य

अश्वगंधा ही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपैकी एक आहे. अश्वगंधाचा वापर शारीरिक शक्ती वाढवण्यास, तणाव कमी करण्यास आणि यकृत निरोगी ठेवण्यास मदत करतो. यात दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे यकृताला मुक्त रॅडिकल्सच्या चार्जपासून संरक्षण देतात. अश्वगंधा पावडर कोमट पाणी किंवा दुधासोबत सेवन करता येते.

लिव्हरच्या आजाराबाबत अधिक माहितीसाठी यावर क्लिक करा

कोरफड 

कोरफडचा होईल योग्य उपयोग

कोरफड ही लोकप्रिय औषधी वनस्पती अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. याचे जेल अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. हे यकृताचे कार्य सुधारण्यास आणि डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते. यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी अर्धा चमचा कोरफडीचा रस एका ग्लास पाण्यात मिसळून पिणे फायदेशीर ठरू शकते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास याचा अधिक उपयोग होतो 

गुळवेलाचा फायदा

गुळवेल ठरेल रामबाण उपाय

गुळवेलाला आयुर्वेदात अमृत असेही म्हणतात. यात इम्युनोमोड्युलेटरी गुणधर्म आहेत, जे लिव्हरला अनेक संक्रमणांपासून वाचवण्यास मदत करतात. गुळवेलाच्या नियमित सेवनाने यकृत दीर्घकाळ निरोगी राहते. गुळवेलाचा रस किंवा त्याचा काढा तुम्ही सेवन करू शकता. काढा बनवण्यासाठी गुळवेलाच्या वनस्पतीचे देठ एका ग्लास पाण्यात उकळून सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा याचा तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल 

लिव्हर खराब झाल्यास काय दिसतात संकेत जाणून घ्या एका क्लिकवर

रामबाण ठरणारी हळद 

हळदीचा करून घ्या उपयोग

प्रत्येक घरात आढळणारा हा एक सामान्य मसाला आहे, ज्यामध्ये कर्क्यूमिन नावाचे सक्रिय संयुग असते, जे प्रक्षोभक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असते. हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन यकृताची जळजळ दूर करण्यास आणि मुक्त रॅडिकल्सच्या प्रभावापासून संरक्षण करण्यास मदत करते. याच्या मदतीने यकृताला अनेक प्रकारच्या नुकसानीपासून वाचवता येते. दुधासोबत हळदीचे सेवन करणे सर्वात फायदेशीर आहे. चांगल्या परिणामांसाठी, एक ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी प्या.

Web Title: 5 herbs best for liver health can eat on empty stomach ashwagandha aloe vera turmeric know the benefits in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 04:23 PM

Topics:  

  • Health News

संबंधित बातम्या

2 वर्षाच्या चिमुकल्याने नजरचुकीने केले ॲसिड सेवन, पुण्यातील तज्ज्ञांनी वाचवला जीव
1

2 वर्षाच्या चिमुकल्याने नजरचुकीने केले ॲसिड सेवन, पुण्यातील तज्ज्ञांनी वाचवला जीव

Navarashtra Special: हिवाळ्यात पाण्याकडे दुर्लक्ष करताय? वेळीच सावध व्हा; नाहीतर..
2

Navarashtra Special: हिवाळ्यात पाण्याकडे दुर्लक्ष करताय? वेळीच सावध व्हा; नाहीतर..

आयुर्वेदात पेरूला समजले जाते अमृतफळ; काय आहे कारण? फायदे वाचून व्हाल थक्क…
3

आयुर्वेदात पेरूला समजले जाते अमृतफळ; काय आहे कारण? फायदे वाचून व्हाल थक्क…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.