लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ही गंभीर लक्षणे
निरोगी जीवन जगण्यासाठी शरीरातील सर्व अवयव निरोगी असणे फार गरजेचे आहे. शरीरातील एका अवयवाचे कार्य बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडून जाते. त्यामुळे योग्य रित्या आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. शरीरातील विषारी पदार्थ तसेच पोटत साचून राहिल्यामुळे अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. पण हेच विषारी पदार्थ बाहेर पडून गेल्यांनतर पचनक्रिया सुधारते, शरीरात ऊर्जा टिकून राहते इत्यादी कार्य सुरळीत चालू राहतात. पण हे कार्य बिघडल्यानंतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: थंडीमुळे हातापायांच्या त्वचेवर सुरकुत्या आल्या आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून त्वचा करा सुंदर आणि मुलायम
अतिप्रमाणात बाहेरच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे किंवा सतत धूम्रपान केल्यामुळे लिव्हरचे आरोग्य बिघडू लागते. सतत बाहेरचे पदार्थ खाल्यामुळे लिव्हरचे कार्य बिघडते. तसेच लिव्हरला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी शरीरात कोणतेही गंभीर लक्षणे दिसू लागल्यानंतर वेळीच सावध होऊन आरोग्याची योग्य ती काळजी घेणे फार गरजेचे आहे. त्यामुळे आज म्ही तुम्हाला लिव्हर खराब झाल्यानंतर रात्रीच्या वेळी शरीरात कोणती लक्षणे दिसतात, याबद्दल सांगणार आहोत.
रात्रींचये वेळी चांगली झोप न लागणे हे लिव्हर खराब होण्याचं मुख्य लक्षण आहे. झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर लिवर सिरोसिस सारखे आजार होण्याची शक्यता असते. तसेच लिव्हरचे कार्य बिघडल्यामुळे रक्तामधील विषारी घटक बाहेर पडून जात नाहीत. ज्याचा मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि चांगली झोप लागत नाही. रात्रीच्या वेळी झोप पूर्ण न झाल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात.
लिव्हर खराब झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. रात्री झोपल्यानंतर वारंवार लघवीला जावे लागते. शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जात नसल्यामुळे वारंवार लघवीला जावे लागते. विषारी घटक बाहेर पडून न गेल्यामुळे पाण्याची साठवण होत नाही. तसेच यामुळे शरीरात थकवा निर्माण होण्याची शक्यता असते.
लिव्हरचे कार्य बिघडल्यानंतर रात्री झोपल्यानंतर सतत अंगाला खाज येऊ लागते. पित्ताशयामध्ये विकार होऊ लागतात. लिव्हरची कार्यक्षमता बिघडल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. लिव्हरचे कार्य बिघडल्यानंतर हातापायांच्या तळव्यांवर खाज येऊ लागते. हातापायांच्या तळव्यांना आलेली खाज लिव्हर खराब झाल्याचे गंभीर लक्षण आहे.
लिव्हरसह शरीराचे आरोग्य निरोगी ठे
वण्यासाठी संतुलित ठेवण्यासाठी आहारात योग्य त्या पदार्थांचे सेवन करावे. आहारात काकडी, बीट, पालेभाज्या, फळभाज्या, फळे इत्यादी अनेक पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. शरीराला पोषण देण्यासाठी योग्य पदार्थांचे सेवन करावे.
हे देखील वाचा: नसांमधील कोलेस्ट्रॉलचा पिवळा थर काढून टाकण्यासाठी प्रभावी ठरेल हिरवी चटणी, कोलेस्ट्रॉल होईल कमी
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी नेहमी व्यायाम आणि योगासने करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. व्यायाम केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.