बद्धकोष्ठता होण्याची ६ कारणे कोणती
बद्धकोष्ठतेची समस्या ही जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करते आणि सामान्यतः सर्वच वयोगटांमध्ये आढळून येते. बद्धकोष्ठता म्हणजे जेव्हा तुम्हाला आतड्याची हालचाल करण्यास त्रास होतो किंवा मल बाहेर काढण्यात अडचणींचा सामना करावा लागतो. मलविसर्जन करण्यास अडचण येत असल्यास पोट फुगणे, ओटीपोटात दुखणे, गॅस, अस्वस्थता आणि मळमळ यासारखी लक्षणं आढळून येतात.
बद्धकोष्ठता ही एक अशी समस्या आहेत की योग्य उपचार केल्यास ती बरी होते. मात्र वेळीच उपचार न केल्यास या समस्यांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. हे केवळ तुमच्या शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यावरही परिणाम करू शकते. कालांतराने यामुळे नैराश्य, चिडचिड, आक्रमक होणे अशा भावना निर्माण होऊ शकतात. अनेकांना बद्धकोष्ठतेचा सामना करावा लागतो कारण त्यांना त्यामागील घटक किंवा सामान्य कारणे माहीत नसतात. ही कारणे समजून घेणे आणि त्यांचे निराकरण करणे नक्कीच फायदेशीर ठरु शकते. डॉ. रावसाहेब राठोड, पोटविकार तज्ज्ञ, हेपॅटोलॉजिस्ट आणि थेरप्यूटिक एंडोस्कोपिस्ट, मेडिकवर हॉस्पिटल्स, खारघर, नवी मुंबई यांनी सांगितले आहे.
थायरॉईड विकार आणि मधुमेह
कमी सक्रिय असलेली थायरॉईड ग्रंथी ही तुमच्या आतड्यांसंबंधी हालचालींमध्ये व्यत्यय आणू शकते. यामुळे तुमचे चयापचय मंदावते आणि तुम्ही खाल्लेले अन्न आणि टाकाऊ पदार्थ तुमच्या पचनसंस्थेमध्ये हलवण्याच्या मार्गाच अडथळा निर्माण करते ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.
वेळीच मलविसर्जन न करणे
शौचाला त्रास झाल्यानेही बद्धकोष्ठता निर्माण होते
बऱ्याचदा काही लोकांना मलविर्जनाची भावन निर्माण झाली तरी देखील शौचास न जाणे अथवा ती भावना रोखून धरण्याची सवय असते. मात्र असे केल्याने ही समस्या आणखी वाढून शारीरीक समस्यांना आमंत्रण मिळते. तुमच्या या सवयीमुळे आतड्याचे कार्ये कमकुवत होऊ शकते आणि दीर्घकालीन बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.म्हणून शौचालयाचा वापर करण्यास विलंब करु नका व या नैसर्गीक क्रिया रोखून धरु नका
काय आहे शंखप्रक्षालन क्रिया, आतड्यातील सडलेली घाण त्वरीत काढेल बाहेर, बद्धकोष्ठता करेल छुमंतर
पुरेसे पाणी न पिणे
पाणी न पिण्यामुळेही होतो त्रास
हे डिहायड्रेटेड होण्याचे प्रमुख कारण ठरते. तुमचे मल शरीराबाहेर टाकण्यासाठी पाणी हे महत्वाचे कार्य करते. पुरेसे पाणी प्यायल्यामुळे मलविसर्जन करण्यास अडथळा येत नाही. निर्जलीकरणामुळे मल घट्ट होऊ शकतो ज्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढणे कठीण होते. त्यासाठी पुरेसे पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड राखणे गरजेचे आहे.
तुम्ही गरोदर आहात
गरोदरणात बद्धकोष्ठतेचा त्रास
हार्मोनल बदल आणि वाढणारे गर्भाशय हे तुमच्या आतड्यांवर जास्त दबाव निर्माण करु शकते. ही तुमची पचनक्रिया मंद करू शकते आणि आपल्या शरीरातून टाकाऊ पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करते. गर्भधारणेदरम्यान बद्धकोष्ठता सामान्य आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष करु नये.
आयबीएस सारखी जुनाट स्थिती आहे
इरिटेबल बाऊल सिंड्रोमचा त्रास असल्यास
इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS) सारख्या परिस्थितीमुळे आतड्यांमधून टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याच्या मार्गावर परिणाम होऊ शकतो. यामुळे पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते. आयबीएसची समस्या व्यवस्थापित केल्याने तुमची लक्षणे कमी होण्यास मदत होऊ शकते.
5 High Fiber Foods जे करतील बद्धकोष्ठता, कॅन्सर-डायबिटीसला गायब, पचनक्रियाही होईल तगडी
मानसिक तणाव
मानसिक तणावामुळे बद्धकोष्ठता
तणाव हा तुमच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो यामुळे पचन प्रक्रिया मंदावते. चिंता आणि मानसिक ताणामुळे आतड्यांमधून टाकाऊ पदार्थ बाहेर काढणे अवघड होऊ शकते. तणावाचे व्यवस्थापन केल्यास पचनाचे क्रिया सुरळीत होण्यास मदत होते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.