कोणत्या फायबर रिच फूड्सचा समावेश असावा
फायबर समृद्ध आहार हा आपली पचनसंस्था सुधारण्यात, वजन नियंत्रित करण्यात आणि संपूर्ण आरोग्याला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. फायबरयुक्त आहार खाल्ल्याने केवळ पचनच सुधारते असे नाही तर आरोग्याच्या अनेक पैलूंना चालना मिळते. फायबर शरीरात चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देते आणि हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करते.
हार्वर्डच्या अहवालानुसार, फायबरच्या सेवनाने हृदयविकार, स्ट्रोक, टाइप-2 मधुमेह आणि आतड्यांचा कर्करोग इत्यादींचा धोका कमी होतो. अभ्यासात याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. यामुळे नक्की कोणकोणता फायदा होते आणि कोणते फायबरयुक्त पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करायला हवेत याबाबत आपण जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
भाज्यांसह सूप्स
सुप्समध्ये करा भाज्यांचा समावेश
सूप आपण नियमित घरी करतो. मात्र काही वेळा यात भाज्यांचा समावेश करत नाही. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सुप्समध्ये भाज्या मिक्स कराव्यात. हा तुमच्या आहारातील फायबर आणि पोषक घटक वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे. भरपूर फायबरयुक्त सूप बनवण्यासाठी टोमॅटो, गाजर, कांदे आणि मटार यांचा उपयोग करा. क्विनोआ किंवा तपकिरी तांदूळ यासारख्या तुमच्या आवडत्या संपूर्ण धान्याचाही वापर करून तुम्ही सर्व्ह करा.
हेदेखील वाचा – चिया सीड्समध्ये खच्चून भरलंय प्रोटीन-फायबर, सकाळीच खाल्ल्याने एनर्जी राहील कमाल
फायबरयुक्त स्नॅक्स निवडा
नाश्त्यात करा फायबरचा समावेश
फायबर युक्त स्नॅक्स निवडणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपल्या रोजच्या आहारातील दह्यात फळे घालून निरोगी नाश्ता बनवा. सकाळी तुम्ही दहीयुक्त ही फळं खाल्ल्याने तुम्हाला नक्कीच फायदा मिळतो. हा नाश्ता तुम्हाला प्रोबायोटिक्ससह फायबरदेखील मिळवून देईल. अक्रोड, बदाम, पिस्ता, काजू याचा आपल्या नेहमीच्या नाश्त्यात समावेश करा. हे पदार्थ निरोगी चरबीसह फायबरदेखील शरीराला मिळवून देतात.
डाळींचा करा समावेश
डाळींमधून मिळेल फायबर
फायबर समृद्ध राजमा, हरभरा, शेंगदाणे आणि मूगडाळ तुमच्या आहारात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मूग डाळ भाजीसोबत शिजवू शकता किंवा खिचडीमध्ये घाला. यामुळे स्वादही येतो आणि तुमच्या शरीराला फायबरही मिळते. याशिवाय भाजलेले हरभरे स्नॅक्स म्हणून खाल्ले जाऊ शकतात, जे कुरकुरीत आणि चवदार असतात. वेगवेगळ्या डाळी तुमच्या शरीराला आवश्यक फायबर मिळवून देण्यास मदत करते. याचा उपयोग करून घ्या
फळं आणि भाजी खा
फळं आणि भाज्यांचा समावेश करून तुम्ही फायबर मिळवा
सफरचंद, पेर, संत्री, गाजर, ब्रोकोली आणि पालक यांसारखे फायबरयुक्त पदार्थ तुमच्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतात. सफरचंद सालासह कापून स्नॅक म्हणून खा किंवा सॅलडमध्ये घाला. ते दह्यात मिसळूनही खाता येते. याशिवाय तुम्ही ब्रोकोली सलाड, पालक सूप, पेर, संत्र्याचे सलाड अथवा गाजराची कोशिंबीर अशा स्वरूपात पदार्थांचा वापर करू शकता. नैसर्गिक साखर असल्याने डायबिटीसवरही नियंत्रण राहते आणि त्रास होत नाही
हेदेखील वाचा – आहारातील फायबर म्हणजे काय? फ्रूट फायबरचे काय आहेत फायदे ? जाणून घ्या
संपूर्ण धान्याचा करा उपयोग
संपूर्ण धान्याचा करा समावेश
तपकिरी तांदूळ, ओट्स, क्विनोआ आणि संपूर्ण गव्हाचा ब्रेड यांसारखे फायबरयुक्त पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते, जे तुम्हाला जास्त खाणे टाळण्यास आणि वजन नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासही मदत मिळते. त्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, गॅससारख्या समस्या निर्माण होत नाहीत. तसंच डायबिटीस नियंत्रणात राहण्यासही मदत मिळते.