काय आहे शंखप्रक्षालन क्रिया आणि कशासाठी करावी
बद्धकोष्ठता असल्यास, मल जाण्यास त्रास होतो. त्याच्या लक्षणांबद्दल सांगायचे तर पोट नीट न साफ होणे, स्टूल खूप कठीण होणे, पोट फुगणे, पेटके येणे, मळमळ होणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात. कारण मल आतड्यांमध्ये जमा होऊ लागतो. ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास विष्ठेसोबत रक्तही दिसू लागते आणि स्थिती गंभीर होऊ शकते. बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेक प्रकारची पावडर, उपाय आणि औषधे घेतात, परंतु प्रत्येक गोष्टीचा उपाय योगामध्ये सापडतो.
बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी दररोज शंखप्रक्षालन करावे. त्यामुळे आतड्यांमध्ये साचलेला मल बाहेर येतो. याशिवाय शंखप्रक्षालन प्रक्रिया केल्याने अनेक फायदे होतात आणि निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया योग प्रशिक्षक दीक्षा दाभोळकर यांच्याकडून, शंखप्रक्षालन कसे केले जाते (फोटो सौजन्य – iStock)
पाण्याने करावी सुरुवात
शंखप्रक्षालनाची सुरूवात ही पाण्याने करावी असे सांगण्यात येते
पाणी पिऊन शंखप्रक्षालन प्रक्रिया सुरू होते. सर्वप्रथम मलासनात बसून किमान दोन ते तीन ग्लास कोमट पाणी प्या. तसेच या पाण्यात थोडे मीठ घालावे. पोटातून सर्व पाणी निघून गेल्यावर किमान 40 ते 45 मिनिटे शवासन करावे. यामध्ये कुंजल क्रिया आणि नेतीक्रिया देखील केल्या जातात ज्या ऐच्छिक आहेत. मात्र हे आपण आपल्या योगा प्रशिक्षकाच्या सल्ल्यानेच करावे
5 योगासनं करावीत
5 योगासनाने सुरूवात करावी
शंखप्रक्षालन प्रक्रियेची पुढील पायरी म्हणजे तुम्हाला पाच योगासने करावी लागतील. प्रथम ताडासन, नंतर तिर्यक ताडासन आणि त्याच क्रमाने तिर्यक भुजंगासन, उद्रदर्शनासन सोबत कटिक्रासन करावे. हे चक्र 6 ते 7 वेळा पुन्हा करा. या काळात प्रत्येक चक्र पूर्ण केल्यानंतर पाणी प्या. शंखप्रक्षालनाची क्रिया मोठी आहे, या क्रमानुसारच ती करावी. योगा करताना आपण योग्य देखरेखीखाली आणि मार्गदर्शनानुसारच करावे. याचा योग्य परिणाम शरीरावर होण्याची गरज आहे. योगासन करताना त्याची पोझ योग्य आहे की नाही याचीही खात्री करून घ्यावी.
या गोष्टी टाळा
कोणत्या गोष्टी खाणे टाळावे
शंखप्रक्षालन प्रक्रिया ही आतडे पूर्णपणे स्वच्छ करण्याची प्रक्रिया आहे, म्हणून आहाराच्या निर्बंधांबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मसालेदार आणि आम्लयुक्त अन्न सात दिवस खाऊ नये. यावेळी मूग डाळीची मऊ खिचडी खावी. याशिवाय दुधापासून बनवलेल्या गोष्टी टाळाव्यात. आपल्या आहाराकडे काटेकोरपणे तुम्ही लक्ष द्यावे तरच याचा फायदा शरीराला मिळू शकतो
Yoga For Hypertension: औषधांशिवाय 5 योगासन ठरतील ‘गुणकारी’, हाय ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय
कोणी करू नये
कोणत्या गोष्टी करणे टाळावे
ज्यांना हृदय किंवा मूत्रपिंडाचा त्रास आहे त्यांनी शंखप्रक्षालन करू नये. याशिवाय उच्च रक्तदाब, गर्भधारणा, चक्कर येणे, पेप्टिक अल्सर, हर्निया आणि रक्तस्त्राव मूळव्याध अशा रूग्णांनी शंखप्रक्षालन टाळावे. जर तुम्हाला ही प्रक्रिया पूर्णपणे करायची असेल तर तुम्ही तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा, आपल्या स्वतःच्या मनाने ही क्रिया करणे टाळावे