Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Liver मध्ये कुजलेली घाण स्वच्छ करतील 7 पदार्थ, फॅटी लिव्हरचा धोका होईल कमी

Best Foods To Detox Liver - लिव्हर खराब झाले तर शरीराचे नुकसान होऊन त्याचे गंभीर परिणाम होतात. अनेक खाद्यपदार्थ लिव्हर डिटॉक्सिफाय आणि स्वच्छ करण्यात मदत करू शकतात. लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले पाहिजेत. असे केल्याने लिव्हर संबंधित आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 03, 2024 | 11:35 AM
लिव्हर डिटॉक्सिफिकेशन फूड

लिव्हर डिटॉक्सिफिकेशन फूड

Follow Us
Close
Follow Us:

शरीराची कार्यप्रणाली सुरळीत ठेवण्यासाठी लिव्हर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. लिव्हर अनेक पाचक रस तयार करते, ज्याचा प्रभाव पचनसंस्थेपासून शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिसून येतो. लिव्हरमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास शरीराची संपूर्ण यंत्रणा विस्कळीत होऊ शकते. 

चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे अनेक विषारी घटक आपल्या लिव्हरमध्ये जमा होतात ज्यामुळे हानी पोहचू शकते. हे टाळण्यासाठी लिव्हरचे डिटॉक्सिफिकेशन करणे अत्यंत आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगत आहोत, ज्यांच्या सेवनाने लिव्हरमध्ये साचलेली घाण साफ होऊ शकते. याबाबत डाएट मंत्रा क्लिनिक, नोएडाच्या संस्थापक आणि वरीष्ठ आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा यांनी अधिक माहिती एका हिंदी संकेतस्थळाला दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock) 

लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी काय करावे 

  • लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी लोकांनी भरपूर पाणी प्यावे
  • लिंबू पाण्यात टाकून सकाळी प्यायल्यास लिव्हरमध्ये साचलेली घाण साफ होते
  • ग्रीन टी पिण्यानेदेखील लिव्हर डिटॉक्स होऊ शकते
  • पावसाळ्यात लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी आवळ्याचा रस प्रभावी ठरू शकतो. त्यात अनेक अँटिऑक्सिडंट्स असतात, जे लिव्हरमधील घाण साफ करून जळजळ कमी करण्यास मदत करतात. या रसामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील भरपूर असतात. याशिवाय अनेक गोष्टी यकृत डिटॉक्स करू शकतात

लिंबाचा वापर 

लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी लिंबाचा वापर

लिंबू व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. हे लिव्हरमधील विषारी घटक काढून टाकण्यास मदत करते आणि लिव्हर निरोगी ठेवण्यास मदत करते. सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणे लिव्हर डिटॉक्सिफिकेशनसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

हेदेखील वाचा – Liver च्या आरोग्यासाठी 5 उत्कृष्ट पदार्थ कोणते? डाएटिशियनने दिली यादी

ग्रीन टी 

लिव्हरमधील घाण काढण्यासाठी ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट असतात, जे यकृताचे कार्य सुधारतात आणि विषारी घटक काढून टाकतात. ग्रीन टी चे नियमित सेवन लिव्हरसाठी फायदेशीर आहे. तुम्ही दिवसातून दोन वेळा ग्रीन टी चे सेवन करू शकता. ग्रीन टी मध्ये असणारे हर्ब्स हे आपल्या शरीरासाठी उत्तम ठरतात

गाजर आणि बीट 

गाजर आणि बिटाचा वापर करून लिव्हर डिटॉक्सिफिकेशन

गाजर आणि बीटरूटचे सेवन केल्याने लिव्हरचे आरोग्यदेखील सुधारते. बीटरूटमध्ये बेटेन नावाचा घटक असतो, जो यकृताच्या पेशींची दुरुस्ती करतो आणि विषारी पदार्थ काढून टाकतो. गाजरमध्ये बीटा-कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट असतात जे लिव्हरचे कार्य वाढविण्यास मदत करतात. 

हेदेखील वाचा – कोल्ड ड्रिंक्स का ठरतात फॅटी लिव्हरला कारणीभूत? जाणून घ्या

आल्याचा आणि हळदीचा उपयोग 

लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी हळद आणि आल्याचा वापर

आल्यामध्ये जिंजरॉल आणि शोगोल सारखे सक्रिय घटक असतात, जे पचन सुधारतात आणि लिव्हर डिटॉक्सिफाय करतात. तर हळदीमध्ये कर्क्यूमिन असते, जे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. हे लिव्हरची जळजळ कमी करते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

हिरव्या पालेभाज्या 

हिरव्या पालेभाज्यांचा उपयोग करून लिव्हर डिटॉक्स

लिव्हर डिटॉक्समध्ये हिरव्या पालेभाज्या फायदेशीर मानल्या जातात. पालकामध्ये क्लोरोफिल आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे लिव्हर स्वच्छ करण्यास मदत करतात. याशिवाय ब्रोकोलीमध्ये सल्फोराफेन आणि व्हिटॅमिन सी असते, जे यकृताचे कार्य वाढवते आणि ते डिटॉक्सिफाय करते.

Web Title: 7 amazing foods to detox liver and cleanse body quickly use lemon beet ginger turmeric

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 10:43 AM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

सर्पदंशावर हाफकीन महामंडळाच्या लसीचा प्रभावी उतारा, जनजागृती मोहीम
1

सर्पदंशावर हाफकीन महामंडळाच्या लसीचा प्रभावी उतारा, जनजागृती मोहीम

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना
2

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना

आयुष्याचे दोन थेंब:  हाफकीनला मिळाली संजीवनी! ‘पोलिओ रविवार’ राबविणार
3

आयुष्याचे दोन थेंब: हाफकीनला मिळाली संजीवनी! ‘पोलिओ रविवार’ राबविणार

Naked Sleeping: रात्री कपड्यांशिवाय झोपताय का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान
4

Naked Sleeping: रात्री कपड्यांशिवाय झोपताय का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.