
photo- yandex
अशा परिस्थितीत आपल्या स्वयंपाकघरातील काही मसाले आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. वेलची ही त्यापैकीच एक आहे. चहापासून ते बिर्याणीपर्यंत वेलचीचा वेगवेगळ्या पादर्थांमध्ये चव वाढवण्यासाठी वापर केला जातो. परंतु, काही अभ्यासांनुसार, वेलची ही आरोग्याच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणूनही काम करते. वेलचीचे सेवन केल्याने आरोग्याला कोणकोणते फायदे होतात, जाणून घ्या.
Health Tips: सतत थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? रोज खा ‘ही’ एक गोष्ट; शरीराला मिळतील अनेक फायदे
काही अभ्यासांनुसार , वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असलेले अनेक नैसर्गिक घटक असतात. जे रक्तातील साखर, आणि खराब कोलेस्ट्रॉल सुधारण्यात काही प्रमाणात मदत करतात. परंतु, वेलची थेट शरीरातील चरबी कमी करत नाही किंवा वजन कमी होण्याइतपत मेटाबॉलिजम रेट वाढवत नाही. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही संतुलित आहारात वेलचीचा समावेश करू शकता. त्याचबरोबर, तुम्हाला कॅलरी इनटेक, दररोज चालणे आणि नियमित व्यायाम करणे यासारख्या गोष्टींवरही लक्ष दिले पाहिजे.
पचनाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी पारंपरिकरित्या वेलचीचा वापर केला जातो. काही अभ्यासांनुसार, वेलचीचे पाणी गॅस, अपचन आणि पोट फुगणे यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. परंतु, जर तुम्हाला सतत पोटाशी संबधित समस्या जाणवत असतील, तर त्याचे कारण समजून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कधीकधी पोटाच्या समस्या काही गंभीर आजाराची चिन्हे असू शकतात.
अभ्यासात असेही दिसून आले आहे की, वेलचीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे शरीरातील सोडियमची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. दररोज वेलचीचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.वेलची हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते. ती कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते.
जर तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधीचा त्रास होत असेल, तर हिरवी वेलची नैसर्गिक माऊथ फ्रेशनर म्हणून खाऊ शकता. यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म तोंडातील जिवाणूंना नष्ट करतात.
वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेतील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात. सात दिवस नियमितपणे तिचे सेवन केल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येऊ शकते. याशिवाय, मुरुमांसारख्या समस्या कमी होऊ शकतात.
तुम्ही ससकाळी रिकाम्या पोटी एक किंवा दोन हिरवी वेलची चावून खाऊ शकता. याशिवाय तुम्ही कोमट पाण्यासोबतही याचे सेवन करु शकता. ज्या लोकांना वेलची खाल्ल्यानंतर ॲलर्जी किंवा पोटदुखीचा त्रास होतो, त्यांनी याचे सेवन टाळावे. जर तुम्हाला एखादी विशिष्ट वैद्यकीय समस्या असेल किंवा तुम्ही नियमित औषधे घेत असाल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.