Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील असा एक देश जिथे गरुडासाठी बनवलं जात पासपोर्ट, अनोखं आहे यामागच कारण…

मध्य पूर्वातील विमानतळांवर प्रवाशांसोबत गरुडही फ्लाइटने प्रवास करताना दिसतात. UAE मध्ये या गरुडांना अधिकृत पासपोर्ट दिला जातो, जो परंपरा, कायदे आणि प्रजातीच्या संरक्षणाचा अनोखा नमुना आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 01, 2026 | 08:35 AM
जगातील असा एक देश जिथे गरुडासाठी बनवलं जात पासपोर्ट, अनोखं आहे यामागच कारण...

जगातील असा एक देश जिथे गरुडासाठी बनवलं जात पासपोर्ट, अनोखं आहे यामागच कारण...

Follow Us
Close
Follow Us:
  • गरुडांना आंतरराष्ट्रीय प्रवास करता यावा यासाठी UAE सरकारकडून अधिकृत पासपोर्ट दिला जातो.
  • यामध्ये ओळख, मालक आणि आरोग्यविषयक माहिती नमूद असते.
  • अरब देशांमध्ये गरुड पालन ही शेकडो वर्षांची परंपरा असून UNESCO ने याला अमूर्त सांस्कृतिक वारसा मान्यता दिली आहे.
मध्य पूर्वातील अनेक विमानतळांवर कधी कधी एक अनोखं दृश्य पाहायला मिळतं. प्रवाशांच्या हातावर शांतपणे बसलेला एखादा गरुड आणि तोही इतर प्रवाशांसारखाच फ्लाइटमध्ये प्रवासासाठी तयार. हे कुठलं प्रदर्शन किंवा शो नसून, हे गरुड खरंच विमानाने प्रवास करत असतात. विशेष बाब म्हणजे या पक्ष्यांकडेही अधिकृत पासपोर्ट असतो. UAE सरकारकडून गरुडांसाठी स्वतंत्र पासपोर्ट जारी केला जातो. अरब देशांमध्ये गरुड पाळणं ही केवळ हौस नाही, तर शेकडो वर्षांची परंपरा आहे.

National Tourism Day 2026: प्रवासात तणाव येतोय? फॉलो करा या 5 स्मार्ट टिप्स आणि सहलीला बनवा लाइफस्टाईल

तेल सापडण्याआधी वाळवंटात राहणारे बेडूइन लोक उपजीविकेसाठी गरुडाच्या मदतीने शिकार करत असत. त्या काळापासून गरुड हा ताकद, वेग आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानला जातो. आजही UAE मध्ये गरुडांना मोठं सांस्कृतिक महत्त्व आहे. कला, परंपरा आणि ओळखीचा हा अविभाज्य भाग आहे. गरुड पालनाला UNESCO ने अमूर्त सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) म्हणून मान्यता दिली आहे. लाखो रुपयांची किंमत असलेले हे पक्षी कुटुंबातील सदस्यांसारखे जपले जातात, त्यामुळे त्यांची सुरक्षितता आणि काळजी अत्यंत गांभीर्याने घेतली जाते.

बाजांना देशोदेशी नेण्याची गरज

आधुनिक काळात गरुड पालन अधिक व्यावसायिक आणि शास्त्रीय झालं आहे. प्रशिक्षण, प्रजनन, स्पर्धा किंवा उपचारांसाठी बाजांना परदेशात नेणं आता सामान्य झालं आहे. मात्र, ठोस नियम आणि ओळख प्रणाली नसल्यास आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणं कायदेशीर आणि नैतिक दृष्ट्या कठीण ठरतं.

बाजांना पासपोर्ट का दिला जातो?

ही अडचण दूर करण्यासाठी UAE मध्ये गरुडांसाठी पासपोर्ट प्रणाली सुरू करण्यात आली. यामुळे बाजांना आंतरराष्ट्रीय प्रवास करणं सोपं झालं, कारण पासपोर्टमध्ये त्या पक्ष्याची ओळख, मालक आणि आरोग्यविषयक माहिती असते. दुसरा महत्त्वाचा उद्देश म्हणजे तस्करी रोखणं. जगभरात जंगली प्राण्यांची, विशेषतः शिकारी पक्ष्यांची बेकायदेशीर तस्करी मोठी समस्या आहे. गरुडाचा पासपोर्ट हे सिद्ध करतो की तो पक्षी कायदेशीररीत्या पाळलेला आहे.
तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे प्रजातीचं संरक्षण. पासपोर्ट प्रणालीमुळे केवळ पाळीव गरुडांनाच देशाबाहेर नेण्याची परवानगी मिळते, ज्यामुळे नैसर्गिक अधिवासातील गरुडाची संख्या टिकून राहण्यास मदत होते.

गरुडाच्या पासपोर्टमध्ये कोणती माहिती असते?

गरुडाचा पासपोर्ट माणसांच्या पासपोर्टसारखाच असतो, मात्र तो प्राण्यांशी संबंधित नियमांनुसार तयार केला जातो. यात बाजाची प्रजाती, नर-मादी माहिती, पंखांचा रंग, ओळखचिन्हे आणि मायक्रोचिप क्रमांक नमूद केलेला असतो.

याशिवाय मालकाची माहिती आणि पशुवैद्यकीय नोंदीही असतात. लसीकरण, आरोग्य तपासणी आणि प्रवासासाठी आवश्यक वैद्यकीय तपशील या पासपोर्टमध्ये नोंदवलेले असतात. माणसांच्या पासपोर्टप्रमाणे कालावधीवर आधारित वैधता न ठेवता, गरुडाच्या पासपोर्टची वैधता अनेकदा प्रवासांच्या संख्येवर अवलंबून असते. ही अट देश आणि एअरलाइननुसार बदलू शकते.

बाज कोणत्या देशांमध्ये प्रवास करू शकतात?

UAE पासपोर्ट असलेले गरुड प्रामुख्याने खाडी देशांमध्ये सहज प्रवास करू शकतात. सौदी अरेबिया, कतार, कुवेत, बहरीन आणि ओमान या देशांमध्ये या पासपोर्टला मान्यता दिली जाते. काही युरोपीय देशही आवश्यक अटी पूर्ण केल्यास बाजांना प्रवेश देतात. तरीही, पासपोर्ट असूनसुद्धा मालकांना एअरलाइनचे नियम, स्थानिक कायदे आणि आंतरराष्ट्रीय करार पाळणे बंधनकारक असते. CITESसारख्या करारांमुळे लुप्तप्राय प्रजातींचं संरक्षण केलं जातं.

या वर्षी चुकूनही बनवू नका हे देश फिरण्याचा प्लॅन… सुरक्षेच्या बाबतीत इथे आहे मोठा धोका

एअरलाईन्सची भूमिका

खाडी भागातील अनेक एअरलाईन्सनी या परंपरेला स्वीकारलं आहे. काही एअरलाईन्स बाजांना केबिनमध्ये प्रवास करण्याची परवानगी देतात, मात्र एका फ्लाइटमध्ये गरुडांची संख्या मर्यादित ठेवली जाते. यामागचा उद्देश म्हणजे पक्ष्यांवर ताण येऊ नये आणि त्यांची सुरक्षितता कायम राहावी. एकूणच, UAE मधील गरुड पासपोर्ट प्रणाली ही परंपरा, आधुनिकता आणि वन्यजीव संरक्षण यांचा सुंदर समन्वय दाखवते.

Web Title: A country in the world where passports are made for eagles travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 08:28 AM

Topics:  

  • animal
  • travel news
  • UAE

संबंधित बातम्या

सांस्कृतिक वारसा ते समुद्रकिनारे, ‘भारत पर्व 2026’मध्ये महाराष्ट्र पर्यटन दालनाला पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद
1

सांस्कृतिक वारसा ते समुद्रकिनारे, ‘भारत पर्व 2026’मध्ये महाराष्ट्र पर्यटन दालनाला पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद

या वर्षी चुकूनही बनवू नका हे देश फिरण्याचा प्लॅन… सुरक्षेच्या बाबतीत इथे आहे मोठा धोका
2

या वर्षी चुकूनही बनवू नका हे देश फिरण्याचा प्लॅन… सुरक्षेच्या बाबतीत इथे आहे मोठा धोका

T20 World Cup 2026 साठी यूएईचा संघ जाहीर! मोहम्मद वसीमच्या खाद्यावर नेतृत्वाची धुरा; ‘या’ खेळाडूंची लागली लॉटरी 
3

T20 World Cup 2026 साठी यूएईचा संघ जाहीर! मोहम्मद वसीमच्या खाद्यावर नेतृत्वाची धुरा; ‘या’ खेळाडूंची लागली लॉटरी 

Gen Z मध्ये वाढत चाललेले ‘रेज बुकिंग’ नक्की आहे तरी काय? एका क्लिकवर घेतात बर्नआऊटपासून सुट्टी
4

Gen Z मध्ये वाढत चाललेले ‘रेज बुकिंग’ नक्की आहे तरी काय? एका क्लिकवर घेतात बर्नआऊटपासून सुट्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.