Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shravan 2025 : भारतातील अनोखं मंदिर ज्याचे खांब हवेत लटकतायेत; कुठे आहे हे मंदिर? जाणून घेऊया यामागचं रहस्य

देशात अनेक प्राचीन मंदिरं आहेत ज्यांचा स्वतःच असा इतिहास आणि महत्त्व आहे. त्यातच आज आम्ही तुम्हाला आंध्र प्रदेशमधील एका अशा मंदिराची माहिती सांगत आहोत जेथील स्तंभ हे हवेत लटकलेले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 19, 2025 | 08:30 AM
Shravan 2025 : भारतातील अनोखं मंदिर ज्याचे खांब हवेत लटकतायेत; कुठे आहे हे मंदिर? जाणून घेऊया यामागचं रहस्य

Shravan 2025 : भारतातील अनोखं मंदिर ज्याचे खांब हवेत लटकतायेत; कुठे आहे हे मंदिर? जाणून घेऊया यामागचं रहस्य

Follow Us
Close
Follow Us:

भारतात अनेक प्राचीन मंदिरं आहेत ज्यांचा स्वतःचा असा इतिहास आहे. प्रत्येक मंदिराची आपली अशी खासियत असते आणि अशातच आज आम्ही तुम्हाला देशातील अशा एक मंदिराची माहिती सांगत आहोत ज्याचे खांब जमिनीला नाही तर हवेत लटकलेले आहेत. भारत आपल्या प्राचीन मंदिरं आणि अद्वितीय स्थापत्यकलेसाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. अशाच प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक म्हणजे आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात वसलेलं “लेपाक्षी मंदिर”. हे मंदिर आपल्या असामान्य वास्तुरचनेसाठी ओळखलं जातं, पण याची सर्वात चर्चेची गोष्ट म्हणजे “हवेतील खांब”. होय, या मंदिरात असा एक खांब आहे जो जमिनीला स्पर्श करत नाही, तो हवेत लटकलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया या मंदिराचं महत्त्व आणि या हवेतील खांबामागचं गूढ.

Low Budget Monsoon Trip : अवघ्या 5000 रुपयांत करता येईल मान्सून सफर; देशातील हा ठिकाणे तुमच्यासाठी परफेक्ट

लेपाक्षी मंदिराचं बांधकाम १६व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या काळात करण्यात आलं होतं. असं मानलं जातं की, या मंदिराची निर्मिती विरुपन्ना नावाच्या व्यक्तीने आपल्या भावासोबत मिळून केली होती, जो तिथल्या राजाकडे नोकरी करत होता. एक दुसरी मान्यता अशी आहे की, या मंदिराचं बांधकाम ऋषी अगस्त्यांनी केलं होतं. हे मंदिर भगवान शिव (विशेषतः त्यांचा रौद्र अवतार वीरभद्र) आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे. असं मानलं जातं की इथे एक स्वयंभू शिवलिंग आहे, ज्याला वीरभद्राचं रूप मानलं जातं. मंदिराच्या परिसरात सुंदर शिल्पकाम, कोरीव खांब आणि भित्तीचित्रं आहेत, जी विजयनगरकालीन कलेचे उत्कृष्ट उदाहरण मानली जातात.

या मंदिराच्या मुख्य सभागृहात एकूण ७० खांब आहेत, पण त्यामध्ये एक असा खांब आहे जो जमिनीला बिलकुल स्पर्श करत नाही. हा खांब थोडासा वर उचललेला आहे आणि त्याच्या खाली सहजपणे कापड किंवा धागा घालता येतो. स्थानिक श्रद्धेनुसार, या खांबाला हात लावल्यास शुभफल प्राप्त होतं. या हवेतील खांबाचं रहस्य समजून घेण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, परंतु आजपर्यंत कोणीही याचं उत्तर शोधू शकलं नाही. ब्रिटिश काळातही काही अभियंत्यांनी हे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला. एका ब्रिटिश आर्किटेक्टने सिद्धांत मांडला की मंदिराचा सर्व भार इतर ६९ खांबांवर आहे, त्यामुळे एक खांब हवेत असल्याने काही फरक पडत नाही.

आसामच्या ‘या’ गावाला म्हटले जाते ब्लॅक मॅजिकची राजधानी; काय आहे यामागचं रहस्य? ऐकाल तर हैराण व्हाल

पण जेव्हा या सिद्धांताची तपासणी झाली, तेव्हा समोर वेगळंच वास्तव आलं. अभ्यासातून असं समोर आलं की, मंदिराचा सर्वात मोठा भार याच हवेत असलेल्या खांबावर आहे. तरीही तो खांब जमिनीला स्पर्श करत नाही. या अनोख्या स्थापत्यशास्त्राच्या समोर शेवटी ब्रिटिश तज्ज्ञांनीही हार मानली. या खांबावरून एक गोष्ट स्पष्ट होते – की हे मंदिर विज्ञान आणि श्रद्धेचं एक विलक्षण मिश्रण आहे, जे पाहणाऱ्याला थक्क करतं. मंदिराच्या आवारात एक विशाल नंदीची मूर्तीही आहे, जी भगवान शिवाच्या वाहनाचं प्रतीक आहे. विशेष म्हणजे, ही मूर्ती एका एकसंध खडकात कोरलेली असून भारतातील सर्वांत मोठ्या नंदी मूर्तींपैकी एक मानली जाते.

Web Title: A unique temple in india whose pillars hang in the air where is lepakshi mandir travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 08:29 AM

Topics:  

  • Shravan 2025
  • temple
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2025 : पितरांच्या शांतीसाठी आणि पिंडदानासाठी सर्वश्रेष्ठ मानली जातात ही तीर्थस्थळे; इथे जाऊनच मिळेल मोक्ष
1

Pitru Paksh 2025 : पितरांच्या शांतीसाठी आणि पिंडदानासाठी सर्वश्रेष्ठ मानली जातात ही तीर्थस्थळे; इथे जाऊनच मिळेल मोक्ष

भारताप्रमाणेच नेपाळमध्येही आहे सुंदर ताजमहाल! असंख्य खोल्या, राणीचा महल अन् इथे जाण्यासाठी एंट्री फीचीही गरज नाही
2

भारताप्रमाणेच नेपाळमध्येही आहे सुंदर ताजमहाल! असंख्य खोल्या, राणीचा महल अन् इथे जाण्यासाठी एंट्री फीचीही गरज नाही

Pitru Paksh 2025 : बिहारमधील एकमात्र असे ठिकाण जिथे केले जाते आत्मपिंडदान, जिवंतपणीच साधली जाते पितृऋणातून मुक्ती
3

Pitru Paksh 2025 : बिहारमधील एकमात्र असे ठिकाण जिथे केले जाते आत्मपिंडदान, जिवंतपणीच साधली जाते पितृऋणातून मुक्ती

श्री रामाने या ठिकाणी केलं होतं वडील दशरथांच पिंडदान; मोक्षप्राप्तीसाठी लोकप्रिय, आजही इथे जमते शेकडो लोकांची गर्दी
4

श्री रामाने या ठिकाणी केलं होतं वडील दशरथांच पिंडदान; मोक्षप्राप्तीसाठी लोकप्रिय, आजही इथे जमते शेकडो लोकांची गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.