
पोटाभोवतीची चरबी कमी करण्यासाठी सुका मेवा (Dry Fruit Benefit), काजू-बदाम नियमित खाणे ज्येष्ठांना उपयोगी पडते, असे नव्या अभ्यासाचे निष्कर्ष आहेत. (Health Tips) आहारतज्ज्ञांच्या (Dietitian) मते सुक्या मेव्याविषयी गैरसमज आहेत. त्यात खूप ऊर्जा असली तरी ते नियमित खाल्ल्यानेही कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
[read_also content=”मुंबईतील नालेसफाईची भाजपा घेणार झाडाझडती; भाजपाचे सर्व पदाधिकारी छोटया मोठया सर्व नाल्यांवर जाऊन देखरेख व पाहणी करणार https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-will-take-up-the-issue-of-sanitation-in-mumbai-all-bjp-office-bearers-will-visit-and-inspect-all-the-nallas-big-and-small-nrvk-261489.html”]
‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ एनव्हायर्नमेंटल रिसर्च अँड पब्लिक हेल्थ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यास अहवालानुसार सुका मेवा, शेंगदाणे-काजू-बदाम यांच्या नियमित सेवनाने पोटाभोवती वाढत्या वयासह चरबी वाढत नाही. या अभ्यासात ६५ ते ७९ वर्षे वयोगटातील व्यक्तींचा अभ्यास केला गेला. दर आठवड्याला किमान तीन दिवस ३० ग्रॅम सुका मेवा खाणारे आणि न खाणाऱ्या व्यक्तींच्या दोन गटांचा अभ्यास करण्यात आला. ज्या व्यक्ती नियमित सुका मेवा खात नव्हत्या, त्यांच्या पोटाभोवतीची चरबी १९ टक्क्यांनी वाढल्याचे अभ्यासकांच्या निदर्शनास आले.
यंदाच्या जानेवारीत झालेल्या अभ्यासानुसार सुका मेवा नियमित खाणाऱ्यांच्या तुलनेत न खाणाऱ्यांच्या ‘मेट्स’चे प्रमाण ६१ टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास आले. ‘मेट्स’ हे पोटाभोवतीची चरबी, इन्शुलिन प्रतिबंध, उच्च रक्तदाब, रक्तशर्करा घट, मधुमेह आणि हृदयविकार धोका दर्शवणारी समुच्चय निदर्शक आहे. शेंगदाणे-काजू-बदाम ठरावीक प्रमाणात नियमित खाल्ल्याने वजन तर वाढत नाहीच. उलट ते कमी होण्यास मदत होते. रक्तवाहिन्यांतील अडथळ्यांनी होणाऱ्या हृदयविकाराचे अथवा मधुमेहाचे दुष्परिणाम सुक्या मेव्याने कमी होतात. शरीरवस्तुमान गुणोत्तर (बॉडी मास इंडेक्स) घटण्यासही मदत होते. स्निग्धाम्लयुक्त अन्नपदार्थाऐवजी सुकामेवा, काजू-बदाम-शेंगदाण्यातून तेवढेच पौष्टिक घटक मिळतात. ते नियमित खाण्याची सवय लावली तर मग मटण अथवा प्रक्रियायुक्त मांस खाण्याची गरज उरत नाही. अमेरिकन हार्ट असोसिएशनने आठवड्यात चारदा मिठाचा वापर न केलेला सुका मेवा ज्येष्ठांनी खावा, असे सुचवले आहे. कच्चा किंवा भाजलेले काजू-बदाम-शेंगदाणे-अक्रोड असावेत. आपल्या मुठीत मावतील एवढे त्याचे प्रमाण असावे.