गुरमीत चौधरीचे स्ट्रिक्ट डाएट
टीव्हीवरील ‘राम’ ची भूमिका साकारणारा गुरमीत चौधरी केवळ त्याच्या फिटनेसबद्दलच जागरूक नाही तर तो त्याच्या आहाराबद्दलही काटेकोर आहे. एका यूट्यूब चॅनेलवरील पॉडकास्टमध्ये अभिनेत्याने सांगितले की, खाण्याचे शौकीन असूनही, त्याला स्ट्रीक्ट आहार पाळणे कठीण झाले आहे. गुरमीत चौधरी नेहमीच त्याच्या फिटनेससाठी चर्चेत असतो.
यासाठी तो नक्की काय खातो आणि त्याने कोणते डाएट फॉलो केले आहे याबाबत त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. गुरमीतचा फिटनेस पाहता त्याने सांगितलेले डाएट हे खरंच अत्यंत कठोर आहे आणि ते पाळणेही कठीण आहे. जाणून घेऊया काय म्हणाला गुरमीत (फोटो सौजन्य – iStock/Instagram)
केवळ उकडलेले अन्न
भात, चपातीसारखे अन्न खाणे केले होते बंद
गुरमीत मुलाखतीमध्ये म्हणाला की, “मी खूप खवय्या आहे आणि फिटनेससाठी मला खाणे सोडून द्यावे लागले. गेल्या दीड वर्षांपासून मी साखर, चपाती, भात किंवा ब्रेड खाल्लेले नाही. हे अजिबात सोपे नाही. तुम्हाला त्यासाठी आणि प्रत्येक पात्रासाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या योग्यरित्या तयार करावे लागेल.” त्याऐवजी तो काय खातो हे सांगताना गुरमीतने सांगितले की, “मी दीड वर्षे फक्त एकाच प्रकारचे अन्न खाल्ले, फक्त उकडलेले अन्न. त्याला चव नव्हती, पण शेवटी, मला ते चविष्ट वाटू लागले. आता माझी भूक कमी झाली आहे आणि आता हे खाण्याचे प्रमाण अथवा याची चव लागणे इतके वाढले आहे की मी जर काही अस्वास्थ्यकर खाल्ले तर मला ते अजिबात आवडणार नाही.”
उकडलेले अन्न खाण्याचे परिणाम
प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी सांगितले की, जर तुम्ही एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ फक्त उकडलेले अन्न खाल्ले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होईल. त्यांच्या मते, असे करण्याचा सर्वात सकारात्मक परिणाम म्हणजे तुम्ही चरबीचे सेवन कमी कराल, ज्यामुळे वजन कमी होईल. याशिवाय पचनक्रिया चांगली राहील, हृदयरोगांचा धोकाही बऱ्याच प्रमाणात कमी होईल आणि याचा अर्थ तुमचे एकूण आरोग्य सुधारेल.
केवळ उकडलेले पदार्थ खाण्याचे नुकसान
उकडलेले अन्न खाण्यामुळे नक्की काय होतं
आहारतज्ज्ञ आयुषी यादव म्हणाल्या की, फक्त उकडलेले अन्न खाल्ल्याने व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी यासारख्या काही पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. कारण दोन्हीही पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्वे आहेत. तथापि, जर तुम्ही ते सूप म्हणून प्यायले तर पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही. याशिवाय, जर तुम्ही तुमच्या आहारात निरोगी चरबीचा समावेश केला नाही तर शरीरात चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्त्वे अर्थात विटामिन्स (A, D, E, K) चे शोषण कमी होऊ शकते. भाज्या जास्त उकळू नयेत याची काळजी घ्या कारण यामुळे फायबर आणि सूक्ष्म पोषक घटकांचे नुकसान होऊ शकते.
15 दिवसात करा केवळ 1 काम, शरीराच्या कणाकणातील कचरा होईल साफ, सद्गुरूंच्या टिप्समुळे होईल घाणीचा अंत
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.