अभिनेता विकी कौशल 'या' गंभीर आजाराने ग्रस्त
नुकताच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटानंतर प्रसिद्ध अभिनेत्री विकी कौशलला खूप जास्त लोकप्रियता मिळाली आहे. सोशल मीडियासह इतर सर्वच ठिकाणी विकी कौशलचे नाव चांगलेच चर्चेत आहे. चित्रपटामध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. हल्ली बॉलिवूड अभिनेत्यांच्या यादीमध्ये विकी कौशलचे नाव गाजत आहे. त्याने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक वेगळीच छाप निर्माण केली आहे. मात्र सोशल मीडियावर चर्चेत असलेला विकी कौशल मागील काही दिवसांपासून एका गंभीर आजाराने त्रस्त आहे. या आजारामुळे त्याला मानसिक आणि शारीरिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. त्याने सोशल मीडियावरील एका मुलाखतीमध्ये या आजाराबद्दल खुलासा केला आहे. चला तर जाणून घेऊया विकी कौशल कोणत्या आजाराने त्रस्त आहे? यामागे नेमकी काय आहेत कारण? जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – iStock)
अभिनेता विकी कौशल स्लीप पॅरालिसिस नावाच्या गंभीर आजाराने ग्रस्त आहे. या आजाराचे निदान झाल्यानंतर झोपेमध्ये असताना त्यांना हात पाय हलवणे किंवा आवाज देणे देखील कठीण होऊन जाते. याशिवाय झोपेमधून उठल्यानंतर मेंदू जागा होतो मात्र शरीराची कोणतीही हालचाल होत नाही किंवा कोणतीही क्रिया करताना शरीर साथ देत नाही. ही एक भीतीदायक समस्या आहे. मात्र योग्य जीवनशैली, डॉक्टरांचा सल्ला आणि पोषक आहाराचे सेवन केल्यास शरीराची मानसिक स्थिती सुधरण्यास मदत होते.
स्लीप पॅरालिसिसच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते औषध उपचार करावे. याशिवाय योग्य झोप, संतुलित आहार आणि मानसिक शांती इत्यादी अनेक गोष्टी या समस्येवर प्रभावी ठरू शकता. स्लीप पॅरालिसिसची समस्या वारंवार उद्भवू लागल्यानंतर धावपळीची जीवनशैली न जगता शांत आणि आनंदी जीवन जगावे.
सततची धावपळ, योग्य आहार न घेणे, अपुरी झोप, कामाचा तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीराची पचनक्रिया बिघडल्यानंतर झोपेची कमतरता देखील निर्माण होते. याशिवाय मानसिक संतुलन सुद्धा बिघडू लागते. बिघडलेले मानसिक संतुलन सुधारण्यासाठी झोपेचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. नियमित ७ ते ८ तासांची झोप घेतल्यास शरीराला आराम मिळेल आणि मानसिक तणाव कमी होईल आणि मन फ्रेश राहील.