
जेनेलियाचा मराठमोळा मनमोहक लुक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
जेनिलियाचा हा लोभसवाणा आणि मनमोहक लुक तरूणांना घायाळ करतोय. आजही जेनिलियाला २ मुलं आहेत यावर विश्वास ठेवता येणार नाही इतके तिचे सौंदर्य काळजात घर राहते. जेनेलियाने या फोटोंमध्ये नेसलेली साडी आणि तिचा साज आपण डिकोड करूया. एखाद्या कार्यक्रमासाठी तुम्हीही असा किल्लर लुक नक्कीच करू शकता (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
व्हाईट अँड ब्लू ऑर्गेंझा साडी
जेनेलियाने व्हाईट अँड ब्लू कॉम्बिनेशन असणारी ऑर्गेंझा साडी नेसली आहे. सध्या ऑर्गेंझा साडीचा पुन्हा ट्रेंड आला आहे. जेनिलिया या साडीत कमालीची सुंदर दिसत आहे आणि याशिवाय तिच्या लुकने चाहते घायाळ झालेत. एखाद्या जुन्या हिरॉईनप्रमाणे जेनिलियाचा Aura भासतोय आणि तिने हा लुक परफेक्ट कॅरी केलाय.
या साडीसह जेनेलियाने अगदी साधा गळाबंद असा जुन्या फॅशनमधील आठवण करून देणारा ब्लाऊज परिधान केला आहे. या ब्लाऊजला गळ्याजवळ मोती लावण्यात आल्याने त्याची शोभा अधिक वाढली आहे.
आंबाडा आणि गजरा
जेनेलियाने या ट्रान्सपरंट ऑर्गेंझा साडीसह हेअरस्टाईल करताना टिपिकल मराठमोळा आंबाडा घातला आहे आणि त्यात तिने गजरा माळला आहे. यामुळे तिच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे आणि तिचा लुक अधिक उठावदार झालाय. जेनेलियाच्या या लुकची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
आंबाडा आणि गजरा घालूनच जेनिलिया थांबली नाही तर कपाळावर बारीकशी या लुकला परफेक्ट साजेल अशी लहानशी टिकली तिने लावली आहे आणि यामुळे तिच्या लुकमध्ये अधिक मोहक अशी भर पडली आहे.
महाराष्ट्राच्या वहिनीसाहेब! बिंदी, गजरा आणि ते निखळ रूप… ‘देशमुखांना शोभणारी सून’
डायमंड मंगळसूत्र
हातामधील मंगळसूत्राच्या डिझाईन्स आणि त्यातील वैविध्याची सध्या क्रेझ आहे आणि जेनेलियानेदेखील तिच्या मनगटावरील डायमंडच्या मंगळसूत्राने सर्वच महिलांचे लक्ष वेधून घेतले आहे. तीन डायमंड्स डिझाईनचे हे मंगळसूत्र कमालीचे आकर्षक आहे आणि जेनेलियाने प्रत्येक फोटोमध्ये ते फ्लाँट केले आहे. या मंगळसूत्राचे डिझाइन अत्यंत युनिक असून आता नक्कीच अशा मंगळसूत्राचा ट्रेंड येईल.
जेनेलियाने डायमंडचे मंगळसूत्र तर परिधान केलेच आहे. त्यासह तिने हिऱ्यांचे कानातलेही घातले आहेत आणि या कानातल्यांमध्ये नीलम खडाही दिसून येत आहे. अत्यंत मिनिमल दागिने आणि न्यूड मेकअप करत जेनिलियाने तिचा हा खास लुक परिपूर्ण केलाय.