अभिनेत्री जेनेलिया देशमुख म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या वहिनीसाहेब पती अभियन्ता रितेश देशमुख आणि त्यांच्याव चिमुरड्यांसह नेहमी सोशल मीडियाच्या नजरेत असतात. जेनेलिया तिच्या सोशल मीडियावर फार सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. अशामध्ये तिचा नवा अंदाज चर्चेत येत आहे.
अभिनेत्री जेनेलिया देशमुखने शेअर केले नवे Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री जेनेलिया देशमुखने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसून येत आहे.
अभिनेत्रीने नेहमीप्रमाणे पारंपरिक भारतीय साज शृंगार केला आहे. जांभळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये अभिनेत्री सौंदर्यवती दिसत आहे.
अभिनेत्रीने पोस्टखाली 'Gajra, Bhindi, Haathphool, Anarkali with a Khada Dupatta … aur main meri favourite hoon' असा सुंदर आणि विनोदी कॅप्शन दिला आहे.
आता जेनेलियाने पोस्ट केली आहे मग चाहत्यांचा उत्साह काही मागे राहतोय, व्हयं? कमेंट्समध्ये भरभरून कौतुक आले आहे.
मुळात, अभिनेत्रीने परिधान केलेले आभूषण चाहत्यांचा जास्त आकर्षणास आले आहे.