(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अभिनेत्री दीपिका पदुकोणने ‘स्पिरिट’ चित्रपट सोडल्यापासून, चित्रपटसृष्टीत शिफ्ट वेळ आणि वर्क-लाइफ बॅलन्स याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. खरंतर, दीपिकाने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यासोबत आठ तासांच्या शिफ्टमध्ये काम करण्याची अट घातली होती. जेव्हा यावर एकमत झाले नाही तेव्हा दीपिकाने चित्रपट सोडला. यानंतर, अनेक स्टार दीपिकाच्या समर्थानात आले आहेत. अलीकडेच, जेव्हा अभिनेत्री जिनिलीया डिसूझाला काम-जीवन संतुलनाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने सांगितले की ती दररोज १० तास काम करते. आता याबद्दल अभिनेत्री नक्की काय म्हणाली हे जाणून घेऊयात.
‘Sitare Zameen Par’ चित्रपटाला मिळाला हिरवा सिग्नल, सेन्सॉर बोर्डाने कोणत्याही कटशिवाय दिली मंजुरी
‘मी १० तास काम करते’ – जिनिलीया डिसूझा
या महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात जिनिलीया डिसूझा दिसणार आहे. अलीकडेच, झूमशी झालेल्या संभाषणात, जिनिलीया डिसूझा या अभिनेत्रीने सांगितले की ती तिचे वैयक्तिक आयुष्य कसे व्यवस्थापित करते. अभिनेत्री म्हणाली की जेव्हा दिग्दर्शक कामाचे तास वाढवतो तेव्हा ती वेळ मी समायोजन करते. जेनेलिया म्हणाली, ‘हे कठीण आहे पण अशक्य नाही. मी दिवसाला १० तास काम करते आणि असे काही दिवस असतात जेव्हा दिग्दर्शक मला वेळ ११ किंवा १२ तासांपर्यंत वाढवून देतात’. असे अभिनेत्री म्हणाली आहे.
जेनेलिया डिसूझा पुढे म्हणाली, ‘मला वाटतं ते ठीक आहे, पण यामध्ये तडजोडी करण्यासाठी आपल्याला वेळ हवा आहे. जेव्हा तुमच्याकडे एक किंवा दोन दिवस असतात, तेव्हा तुम्हाला जास्त काम करावे लागते. त्यासाठी परस्पर समंजसपणा आणि प्रक्रिया देखील आवश्यक असते’. ‘स्पिरिट’ चित्रपटातून दीपिकाच्या बाहेर पडल्यानंतर कामाच्या वेळेत बदल करण्याबाबत वाद सुरू असताना जेनेलियाने कामाच्या वेळेवर केलेली टिप्पणी चर्चेत आली आहे.
दीपिकाने ठेवल्या या अटी
दीपिका पदुकोण संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘स्पिरिट’ चित्रपटात काम करणार होती. पण तिने आठ तास काम करण्याची अट ठेवली. यासोबतच तिने ४० कोटी रुपयांची फी मागितली. असेही म्हटले जात होते की दिग्दर्शकाने तिला तेलुगू शिकण्यास सांगितले. या सर्व अटी दीपिका आणि संदीप रेड्डी यांच्यात मान्य होऊ शकल्या नाहीत, ज्यामुळे दीपिकाने चित्रपट सोडला. आता या चित्रपटात अभिनेत्री तृप्ती डिमरी मुख्य भूमिका साकारत आहे. पण, दीपिकाने चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर, इंडस्ट्रीमध्ये वर्क-लाइफ बॅलन्सवर चर्चा सुरू झाली आहे.
कधी प्रदर्शित होणार चित्रपट ?
आमिर खानचा हा चित्रपट २० जून २०२५ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. कोणताही कट न करता पास झालेल्या या चित्रपटाबद्दल चित्रपटसृष्टीत सकारात्मक वातावरण आहे. अशी अपेक्षा आहे की आमिर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करण्यात यशस्वी होईल. आणि प्रेक्षकांचं मन जिंकेल. तसेच हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणे मनोरंजनक ठरणार आहे.