लग्न झाल्यानंतर महिला गळ्यात पतीच्या नावाचे मंगळसूत्र घालतात. भारतीय संस्कृतीमध्ये मंगळसूत्राला विशेष महत्व आहे. पण हल्लीच्या बदललेल्या फॅशनमुळे मंगळसूत्राच्या अनेक नवनवीन डिझाइन्स बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. त्यातील सगळ्यात जास्त क्रेज असलेले मंगळसुत्र ब्रेसलेट सगळीकडे खूप फेमस आहे. अनेक महिला गळ्यात मंगळसूत्र घालण्याऐवजी हातामध्ये मंगळसूत्र ब्रेसलेट घालतात. यामुळे हात खूप उठावदार आणि सुंदर दिसतात. चला तर जाणून घेऊया मंगळसूत्र ब्रेस्लेटच्या काही सुंदर डिझाइन्स.(फोटो सौजन्य-pinterest)
हातामध्ये शोभून दिसतील 'या' सुंदर डिझाइन्सचे मंगळसुत्र ब्रेसलेट

अनेक महिला नजर लागू नये म्हणून एव्हिल आय असलेले ब्रेसलेट हातामध्ये घालतात. त्यामुळे तुम्ही या पद्धतींने मंगळसूत्र ब्रेसलेट तयार करून घेऊ शकता.

मंगळसूत्रामधील काळे मणी आणि चैनीचे या पद्धतीचे मंगळसूत्र ब्रेसलेट हातामध्ये खूप सुंदर दिसते. हे ब्रेसलेट कोणत्याही कपड्यांवर सूट होईल.

काळे मणी आणि चैनीचे या पद्धतीने तयार करून घेतलेले मंगळसूत्र ब्रेसलेट हातामध्ये घातल्यानंतर खूप सुंदर लुक येईल.

काहींना गळ्यामध्ये दागिने घालायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही हातामध्ये मंगळसूत्र ब्रेसलेट घालू शकता.

तुम्हाला जर जास्त मोठे दागिने घालायला आवडत नसतील तर तुम्ही या डिझाईनचे नाजूक साजूक ब्रेसलेट हातामध्ये घालू शकता.






