लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाणेरडी चरबी स्वच्छ करण्यासाठी 'या' पदार्थाचा आहारात करा समावेश
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात वाढलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह, फॅटी लिव्हर, पोटाच्या समस्या आणि थकवा, अशक्तपणा वाढू लागतो. या सर्व समस्या उद्भवल्यानंतर शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. शरीराच्या कार्यात निर्माण झालेले अडथळे गंभीर आजाराचे संकेत आहेत. त्यामुळे जीवनशैलीत बदल करून शरीराची काळजी घ्यावी. दिवसभर काम, धावपळ, जंक फूडचे सेवन, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी शेवग्याच्या पानांचे सेवन करावे. या पानांच्या सेवनामुळे शरीराच्या अनेक गंभीर समस्यांपासून आराम मिळतो. शेवग्याची पाने आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध आहेत.(फोटो सौजन्य – istock)
जेवणाच्या ताटात कायमच पालेभाज्या खाल्ल्या जातात. पालेभाज्या खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा शेवग्याच्या पानांची भाजी खाल्ल्यास शरीर स्वच्छ होईल. या पानांच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला अनेक फायदे होतात. आज आम्ही शेवग्याच्या पानांचे सेवन केल्यामुळे लिव्हरला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शेवग्याची पाने औषधासमान मानली जातात.
रोजच्या आहारात सतत जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे लिव्हरवर गंभीर परिणाम दिसून येतात. लिव्हरसबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर पोटात वेदना होणे, ओटीपोटात जडपणा वाटणे किंवा पोटाला सूज येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. अशावेळी लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी शेवग्याच्या पानांची भाजी खावी. शेवग्याच्या पानांची भाजी खाल्ल्यामुळे रक्तातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि अनावश्यक साचून राहिलेली चरबी कमी होते. शेवग्याच्या पानांमध्ये क्लोरोफिल, पॉलिफिनॉल्स आणि अँटिऑक्सिडंट्स, विटामिन सी, विटामिन इ आणि फ्लेव्होनॉईड्स सारखे घटक लिव्हरचे हानिकारक पेशींपासून नुकसान होऊ देत नाहीत. त्यामुळे लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी हिरव्या पानांचा रस किंवा बाजारात मिळणाऱ्या मोरिंगा पावडरचे गरम पाण्यासोबत सेवन करू शकता.
रक्तात साचून राहिलेल्या घाणेरड्या कोलेस्टरॉलमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात, ज्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो. त्यामुळे वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी कोमट पाण्यात मोरिंगा पावडर मिक्स करून प्यावी. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होणार नाहीत.शेवग्याच्या पानांमध्ये असलेली गुणधर्मांमुळे कार्डिवास्कुलर सिस्टम सुरळीत राहते.
शरीरावर वाढलेला चरबीचा अनावश्यक घेर कमी करण्यासाठी कोणत्याही महागड्या पेयांचे सेवन करण्याऐवजी मोरिंगा किंवा शेवग्याच्या पानांचे सेवन करावे. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा शेवग्याच्या पानांचा रस प्यायल्यास वाढलेले वजन झपाट्याने कमी होईल आणि तुम्ही स्लिम दिसाल. यामध्ये खूप कमी कॅलरीज आणि भरपूर फायबर आढळून येते.
यकृताचे आरोग्य कसे सुधारावे?
हिरव्या पालेभाज्या, फळे, सॅल्मन सारखे चरबीयुक्त मासे आणि हळदीसारख्या पदार्थांचे सेवन करा. ल्कोहोलचे सेवन मर्यादित करा किंवा पूर्णपणे बंद करा.
यकृत कसे कार्य करते?
यकृत पित्त तयार करते, जे पचनासाठी मदत करते.रक्तातील विषारी पदार्थ आणि कचरा काढून टाकते.जीवनसत्त्वे आणि इतर महत्त्वाचे पदार्थ साठवते.
यकृत आजारांची सामान्य कारणे?
जास्त मद्यपान केल्याने यकृताचे नुकसान होऊ शकते, जसे की सिरोसिस. हिपॅटायटीस बी आणि हिपॅटायटीस सी सारखे विषाणू संक्रमण यकृताच्या दीर्घकालीन आजारांना कारणीभूत ठरू शकतात.