वय वाढल्यानंतर शरीरासाठी घातक ठरतात 'ही' फळे! आतड्यांमध्ये तयार होईल विष
वय वाढल्यानंतर महिलांसह पुरुषांच्या शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे वाढत्या वयात आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी. कायमच निरोगी राहण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे, फळांचे आणि भाज्यांचे सेवन केले जाते. पण बऱ्याचदा चुकीची जीवनशैली फॉलो केल्यामुळे शरीरात थकवा, अशक्तपणा वाढू लागतो, याशिवाय चढताना किंवा खाली बसताना हाडांमध्ये वेदना वाढू लागतात. पण काहीवेळा आहारात खाल्लेल्या पदार्थांचा परिणाम शरीरावर चुकीचा परिणाम दिसून येतो. या फळांच्या सेवनामुळे शरीरात विषासमान घटक निर्माण होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या फळांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया मंदावते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. तसेच वाढत्या वयात शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होऊन जाते आणि रक्तभसिरणात सुद्धा अडथळे निर्माण होतात.(फोटो सौजन्य – istock)
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं अननस खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. अननसामध्ये ब्रोमेलेन नावाचे एन्झाइम आढळून येते, जे तरुणांसाठी अतिशय दाहक ठरते. वय वाढल्यानंतर या घटकांचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. यामध्ये असलेल्या साखरेमुळे मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय संधिवात, हाडांमध्ये वेदना, कंबर दुखणे, गुडघे दुखणे इत्यादी गंभीर समस्या उद्भवू लागतात. तसेच रक्त पातळ करण्याची औषध खात असलेल्या व्यक्तींनी अननस अजिबात खाऊ नये.
सगळ्यांचं केळी खायला खूप जास्त आवडतात. पण वयस्कर लोकांच्या आरोग्यासाठी केळी अजिबात फायदेशीर नाहीत. यामध्ये असलेले जास्त कार्बोहायड्रेट्स आणि साखर शरीरात पाणी टिकवून ठेवतात, ज्यामुळे पायांना सूज येते, चालताना थकवा जाणवणे किंवा वारंवार सर्दी खोकल्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे आहारात केळीची अजिबात सेवन करू नये.
विटामिन सी युक्त संत्री खाल्यामुळे त्वचा आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी विटामिन सी युक्त फळांचे सेवन केले जाते. संत्र्यामधील सायट्रिक ऍसिड सांध्यांचे नुकसान करतात. सांध्यांमध्ये वेदना, कंबर दुखणे किंवा हाडांमध्ये वेदना होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे वयस्कर लोकांनी संत्र्याचे अजिबात सेवन करू नये.
Explainer: कफ सिरपमधील डायएथिलिन ग्लायकॉल नक्की काय आहे? यामुळे झाला 11 मुलांचा मृत्यू
उन्हाळ्यात कलिंगड मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. कारण यामध्ये भरपूर पाणी असते. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड खाण्याचा सल्ला दिला जातो. पण वय वाढल्यानंतर यामध्ये असलेल्या पाण्यामुळे क्तातील साखरेची पातळी अचानक वाढते आणि अशक्तपणा, थकवा आणि आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवतात.कलिंगड खाल्ल्यामुळे पायांना सूज येणे, अशक्तपणा जाणवणे, थकवा इत्यादी समस्या उद्भवतात.
कापलेली फळे फ्रीजमध्ये ठेवणे सुरक्षित आहे का?
नाही, कापलेली फळे (उदा. टरबूज) फ्रीजमध्ये ठेवल्यास बॅक्टेरिया वाढू शकतात आणि अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो.
कोणत्या फळांचे ज्यूस पिऊ नयेत?
बीट, गाजर, आवळा यांसारख्या ज्यूसचे सेवन काही विशिष्ट लोकांना फायद्यापेक्षा जास्त नुकसान करू शकते. ज्यांना विशिष्ट आरोग्य समस्या आहेत, त्यांनी या ज्यूसचे सेवन टाळावे.
फळांसोबत मीठ, साखर किंवा चाट मसाला वापरणे सुरक्षित आहे का?
फळांवर मीठ, साखर किंवा चाट मसाला घालून खाण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, त्यामुळे या सवयीमुळे आरोग्य बिघडू शकते.