मानवी कोरोनाव्हायरस HKU1 ची लक्षणे:
मागील काही वर्षांआधी कोरोना विषाणू जगभरातील सर्वच देशांमध्ये पसरला होता. कोरोना विषाणूची लागण होऊन अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला. या काळात संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे, सर्दी, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी अनेक लक्षणे उद्भवली होती. मात्र पुन्हा एकदा भारतामध्ये नवा विषाणू पसरू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोलकात्यामधील ४५ वर्षीय महिलेमध्ये मानवी कोरोनाव्हायरसची HKU1 लक्षणे दिसून आली आहेत. मागील काही दिवसांपासून तिला ताप, खोकला आणि सर्दी झाली होती. त्यानंतर आता महिलेला दक्षिण कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
यकृतासंबंधित आजार झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे, घरगुती उपाय करून आरोग्याची घ्या काळजी
मानवी कोरोनाव्हायरसची लागण झाल्यानंतर वरच्या श्वसनसंस्थेवर परिणाम होतो आणि शरीरामध्ये सामान्य सर्दीसारखी लक्षणे दिसून येतात. याशिवाय न्यूमोनिया किंवा ब्रॉन्कायओलाइटिससारखे गंभीर फुफ्फुसांचे आजार होण्याची जास्त शक्यता असते. कोलकत्यामधील महिलेला झालेला विषाणू कोरोना विषाणू इतका घातक नसला तरीसुद्धा श्वसन संसर्ग होऊ शकतात. त्यामुळे आज आम्ही मानवी कोरोनाव्हायरसची लागण झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? मानवी कोरोनाव्हायरस म्हणजे काय? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर प्रामुख्याने श्वसन संस्थेवर परिणाम होतो. याशिवाय ताप येणे किंवा खोकला येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. पण मानवी कोरोनाव्हायरस HKU1ची लागण झालेल्या महिलेमध्ये न्यूमोनिया आणि ब्रॉन्कायओलायटिस साखरे गंभीर आजार होऊ शकतात. हा विषाणू SARS-CoV-2 विषाणूपेक्षा कमी धोकादायक आहे.
मानवी कोरोनाव्हायरसपासून शरीराचा बचाव करण्यासाठी वारंवार साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवाने आवश्यक आहे.
गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर मास्क किंवा तोंडाला, नाकाला रुमाल लावून बाहेर जावे.
आजारी व्यक्तीच्या संपर्कात जाणे टाळावे.
योग्य आहार, व्यायाम आणि झोपेद्वारे निरोगी रोगप्रतिकारक शक्ती राखणे आवश्यक आहे.
काही वर्षांमध्ये जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीनंतर संपूर्ण जगाचे चित्र बिघडले आहे. मात्र या आजाराचा धोका सर्वच वयोगटातील व्यक्तींना आहे. ६० पेक्षा जास्त वयाच्या लोकांना मानवी कोरोनाव्हायरसचा जास्त धोका आहे. नवजात आणि लहान मुलांना मानवी कोरोनाव्हायरसचा जास्त धोका आहे. दमा, सीओपीडी किंवा फुफ्फुसांचे आजार असलेल्या लोकांनी जास्त काळजी घ्यावी.