चाळिशीतही त्वचेवर दिसून येणार नाही वृद्धत्व, Young Skin साठी 'या' बॉडी स्क्रबचा वापर करा
वयोमानानुसार आपल्या आरोग्यावर तसेच त्वचेवर काही बदल घडून येणे स्ववभाविक आहे. वय वाढले की बऱ्याचदा आपल्याला आपल्या त्वचेवर काही बदल झाल्याचे जाणवू लागते. त्वचा सैल होणे, चेहऱ्यावरील तेज कमी होणे अशा काही समस्या आपल्या वृद्धत्वाच्या खुणा जाणवून देत असतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? एका घरगुती स्क्रबच्या मदतीने तुम्ही वाढत्या वयातही तुमच्या त्वचेला तरुण बनवून ठेवू शकता. त्वचेची योग्य निगा राखल्यास त्वचेच्या समस्यांना तोंड देता येऊ शकते.
आज या लेखात आम्ही तुम्हाला घरच्या घरी एक सोपा आणि प्रभावी असा नैसर्गिक स्क्रब कसा तयार करायची याची एक सोपी पद्धत सांगत आहोत. हा स्क्रब तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता. यातील नैसर्गिक घटक तुमच्या चेहऱ्यावरील मृत पेशी काढून टाकून चेहऱ्याचे आतून हिल करण्यास मदत करतील. चला तर मग स्क्रब तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि याला वापरण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया.
स्क्रब तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
किचनमध्ये ठेवलेल्या काही सहज उपलब्ध गोष्टींच्या मदतीने तुम्ही घरी नैसर्गिक बॉडी स्क्रब बनवू शकता. केमिकल फ्री बॉडी स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला एक कप बेसन, दही, दूध, लिंबू, चंदन पावडर आणि हळद पावडर लागेल. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की या सर्व गोष्टींमध्ये आढळणारे घटक तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी वरदान ठरू शकतात.
घरी कसा तयार करावा बॉडी स्क्रब
स्क्रब तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात बेसन आणि दही एकत्र करा. आता त्याच भांड्यात लिंबाचा रस, दूध आणि चिमूटभर चंदन पावडर घाला. यानंतर तुम्हाला या भांड्यात थोडी हळद देखील घालावी लागेल. आता तुम्हाला या सर्व नैसर्गिक गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळा. तुमचे बॉडी स्क्रब तयार आहे. आता तुम्ही तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये याचा समावेश करू शकता.
वापरण्याची पद्धत
या बॉडी स्क्रबचा वापर करण्याच्या योग्य पद्धतीबद्दल माहिती घेऊया. बॉडी स्क्रब तुमच्या त्वचेवर नीट लावा. सर्वोत्तम परिणामांसाठी बॉडी स्क्रबला तुमच्या चेहऱ्यावर 15-20 हळूहळू स्क्रब करा. यानंतर चेहरा पाण्याने स्वछ धुवून काढा. शेवटी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.
J Beauty VS K Beauty: कोरियन की जपानी? तुमच्यासाठी कोणता स्किन केअर रूटीन आहे बेस्ट, जाणून
बॉडी स्क्रबचा त्वचेला होणार फायदा
बेसन, दही, दूध, लिंबू, चंदन पावडर आणि हळद पावडरपासून बनवलेला हा बॉडी स्क्रब तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या बॉडी स्क्रबचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा दीर्घकाळ तरूण ठेवू शकता. याशिवाय या बॉडी स्क्रबचा वापर तुमच्या त्वचेची चमक वाढवण्यासाठीही केला जाऊ शकतो. तथापि, या बॉडी स्क्रबचा तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये समावेश करण्यापूर्वी तुम्ही एकदा पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.