तुम्हालाही घाईघाईत लवकर जेवण्याची सवय आहे का? 10 मिनिटांत जेवण्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो? आजच जाणून घ्या
अनेकदा लहानपणी तुम्ही तुमच्या वडिलांकडून ऐकले असेल की हळूहळू खा. पण असे अनेक लोक आहेत ज्यांना हे नीट समजत नाही आणि मोठे झाल्यावरही झपाट्याने खाण्याची सवय लागते. अनेकदा कामाच्या गडबडीत अथवा घाईघाईत आपण पटापट जेवण उरकतो. अनेकांना आपल्या आयुष्यात एकदम घाईघाईत आणि पटकन जेवण्याची सवय असते. असे अनेक लोक आहेत जे जेवण समोर येताच त्यावर तुटून पडतात. तथापि, काही लोक बळजबरीने अन्न पटकन खातात.
कोणाला वेळ नसेल तर तो पटकन काहीही खातो आणि घराबाहेर पडतो. कारण काहीही असो, जर तुम्हाला झटपट किंवा घाईघाईने खाण्याची सवय असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. सर्वप्रथम, तुम्हाला अन्नातून योग्य पोषक तत्व मिळत नाहीत ज्यामुळे तुमचे शरीर अशक्त आणि थकल्यासारखे वाटू लागते. एवढेच नाही तर यामुळे तुमची पचनक्रिया नेहमीच खराब राहते. घाईघाईत जेवण्याची सवय आपल्या आरोग्यासाठी अनेक तोटे निर्माण करत असते. याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊयात.
J Beauty VS K Beauty: कोरियन की जपानी? तुमच्यासाठी कोणता स्किन केअर रूटीन आहे बेस्ट, जाणून घ्या
खराब पचनशक्ती
क्लीव्हलँड क्लिनिकच्या मानसशास्त्रज्ञ डॉ. लिझली हेनबर्ग म्हणतात की, खूप जलद खाण्याचा पहिला प्रतिकूल परिणाम हा खराब पचन असतो. अन्न नीट चघळले की पचनाचे अर्धे काम होते. परंतु जेव्हा तुम्ही ते थेट गिळले किंवा ते कमी चावून खाल्ले जाते तेव्हा तुमच्या पोटाला हे अन्न तोडण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. त्यामुळे पचनशक्तीवर परिणाम होतो.
पोषक तत्वांच्या सेवनात अडथळा आणणे
जेव्हा आपण खूप जलद जेवण करतो, तेव्हा हे स्पष्ट आहे की अन्न योग्यरित्या तोडले जात नाही. जेव्हा ते योग्यरित्या तोडले जात नाही, तेव्हा त्यातून पोषकद्रव्ये योग्यरित्या बाहेर पडत नाहीत. त्यामुळे अन्नामध्ये असलेले सूक्ष्म पोषक घटक शरीराला मिळत नाहीत. म्हणजेच, आपल्या आहारातून आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे न मिळताच, हे अन्न शरीराबाहेर कचरा म्हणून फेकले जाते.
मेटाबॉलिक सिंड्रोम
जर तुम्ही वेगाने खाण्याची सवय सोडली नाही तर यामुळे तुम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोम होऊ शकतो. यामध्ये तुम्हाला एकाच वेळी अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल. यामध्ये उच्च रक्तदाब, उच्च रक्तातील साखर, पोटाजवळ जास्त चरबी, उच्च कोलेस्टेरॉल अशा समस्या एकत्रितपणे उद्भवतील. या सर्वांमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका देखील वाढू शकतो.
वजन वाढणे
संशोधनात असे आढळून आले आहे की जलद वेगाने खाल्ल्याने आपले वजनात वाढ होऊ शकते. जपान युनिव्हर्सिटीने 50 हजार लोकांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, लवकर जेवण्याची सवय असलेल्या बहुतेक लोकांचे वजन हे जास्त आहे.
काय होईल जर महिनाभर भात खाणे बंद केले? शरीरात दिसून येतील हे बदल
ही सवय कशी बदलावी?
तुम्ही खाण्याच्या वेळेला महत्त्व द्याल असे आधीच ठरवून ठेवा. जेवणासाठी किमान 20 मिनिटे द्यावीत. अर्ध्या तासाचा वेळ आदर्श मानला जातो. अन्न खाताना, ते थेट गिळू नका ते चघळण्यासाठी जास्त वेळ घ्या. तुम्ही अन्न जितके चघळाल तितके अन्नातील पोषक घटक तुमच्या शरीराला मिळतील. जर तुम्हाला पटकन खाण्याची सवय असेल, तर मध्येच पाणी प्यायला ठेवा. तुम्ही टीव्ही किंवा मोबाईल बघत जेवण करत असाल तर ही सवय देखील सोडा. या सर्व गोष्टी केल्याने तुम्हाला हळूहळू खाण्याची सवय लागेल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.