
अक्षय तृतीया 2024 : अक्षय तृतीयेचा दिवस हा अतिशय शुभ मानला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा हा सण. दिवाळीप्रमाणेच या सणालासुद्धा महत्त्व आहे. यावर्षी अक्षय तृतीया दि. 10 मे रोजी साजरी केली जाणार आहे.
Akshya Tritiya 2024 अक्षय तृतीया साजरी करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 4 वाजून 17 मिनिटांनी सुरू होईल आणि दि. 11 मे रोजी पहाटे 2 वाजून 50 मिनिटांनी समाप्त होईल. तसेच पूजेचा मुहूर्त सकाळी 5.30 ते दुपारी 12.18 वाजेपर्यंत आळाहे. या कात तुम्ही संपत्तीची देवी लक्ष्मीची प्रार्थना करू शकता. सुख, समृद्धी आणि संपत्तीत वाढ करण्यासाठी प्रार्थना करू शकता. या काळात केलेली सर्व कामे यशस्वी होतात, असे मानले जाते.
अक्षय तृत्तीयेच्या दिवशी काय खरेदी करू नये
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी प्लास्टिकच्या वस्तू, स्टील अॅल्युमिनिअमची भांडी, काळे कपडे, धारदार वस्तू, काळ्या रंगांच्या वस्तू खरेदी करू नयेत, या वस्तू खरेदी केल्याने घरात दारिद्र्य येते, असे म्हटले जाते.
सनातन धर्मात अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. सोने खरेदी केले जाते. सोन्याचे दागिने अक्षय तृतीयेला खरेदी केले जातात. हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो.
कसे कराल परशुराम देवाचे विधी
परशुराम जयंतीच्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर उठून देवी-देवतांचे ध्यान करून दिवसाची सुरुवात करावी. त्यानंतर आंघोळ करून चांगले वस्त्र परिधान करावे. मंदिराची साफसफाई केल्यानंतर पोस्टावर कापड पसरून भगवान परशुरामाचे चित्र किंवा मूर्ती ठेवा. मंदिराची साफसफाई केल्यानंतर मूर्ती स्थापित करण्याच्या जागेवर कापड पसरून भगवान परशुरामाचे चित्र किंवा मूर्ती ठेवावी. त्यानंतर फोटो किंवा मूर्तीवर पाणी, चंदन, अक्षत इत्यादी अर्पण करा. नंतर तुपाचा दिवा लावून आरती करा. मंत्रांचा जप करण फलदायी मानले जाते.