
केसांच्या सर्वच समस्या होतील कायमच्या नष्ट! रोजच्या आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
सौंदर्या भर पाडण्यासाठी प्रत्येकालाच आपले केस चमकदार आणि सुंदर हवे असतात. मात्र वातावरणात होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे केसांच्या समस्या वाढू लागल्या आहेत. तरुण वयातच केस पांढरे होणे, केस गळणे किंवा केसांच्या इतरही समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. केस पांढरे झाल्यानंतर किंवा केसांमध्ये कोंडा वाढल्यानंतर महिला बारात उपलब्ध असलेल्या महागड्या शाम्पु आणि कंडिशनरचा वापर करतात. तर कधी हेअर मास्क, हेअर सीरम तर कधी हेअर कलर करून पांढरे केस पुन्हा एकदा काळे केले जातात. केसांना योग्य प्रमाणात पोषण न मिळल्यामुळे केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. (फोटो सौजन्य – istock)
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम केसांसह संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे केसांना वरून पोषण देण्यापेक्षा आतून पोषण देणे खूप जास्त आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला केसांच्या निरोगी वाढीसाठी आणि केस कायमच चमकदार ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतील.
केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर केसांची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते. याशिवाय केसांच्या समस्या वाढू लागतात. शरीरातील झिंक आणि लोहाची पातळी कमी झाल्यानंतर प्रामुख्याने केसांच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे आहारात लोहयुक्त पदार्थांचे भरपूर प्रमाणात सेवन करावे. आहारात बीट, पालक, बदाम, अक्रोड इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून निघेल आणि तुम्ही कायमच हेल्दी राहाल.
सर्वच ऋतूंमध्ये केसांच्या समस्या वाढू लागतात. त्यामुळे आहारात बीट, पालक, हिरव्या पालेभाज्या, गूळ, फुटाणे, पालेभाज्या इत्यादींचे सेवन केल्यास शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून निघेल. नियमित बीट, गाजर आणि सफरचंद रस प्यायल्यास केसांच्या समस्यांसोबतच त्वचेसंबंधित समस्यांपासून कायमची सुटका मिळेल. बीटच्या सेवनामुळे त्वचेवर ग्लो येईल.
केस मजबूत आणि घनदाट करण्यासाठी आहारात प्रोटीन आणि कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन करावे. कॅल्शियम युक्त पदार्थांच्या सेवनामुळे आहारात प्रोटीनची कमतरता निर्माण होणार नाही. राजमा, पनीर, दुग्धजन्य पदार्थ आहारात जास्त खावेत. यासोबतच जवस आणि चिया सीड्सचे सुद्धा सेवन करावे.
दीर्घकाळ केस मजबूत आणि सुंदर ठेवण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर शिर्षासन, सर्वांगासन करावेत. प्राणायाम केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कायमच निरोगी राहते. केसांच्या मुळांना चांगला ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी नियमित व्यायाम आणि योगासने करणे आवश्यक आहे. तसेच केस स्वच्छ करण्यासाठी माईल्ड शाम्पू वापरणे आवश्यक आहे.