Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बद्धकोष्ठतेपासून आराम हवा? पचन सुधारण्यासाठी AIIMS तज्ज्ञांचा सल्ला; हे 5 सुपरफुड्स खाताच काही मिनिटांत सर्व घाण निघेल बाहेर

सकाळी पोट व्यवस्थित साफ न झाल्यास दिवसभर अस्वस्थता जाणवू शकते. पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी तज्ज्ञ आहारात काही खास फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 07, 2026 | 08:15 PM
बद्धकोष्ठतेपासून आराम हवा? पचन सुधारण्यासाठी AIIMS तज्ज्ञांचा सल्ला; हे 5 सुपरफुड्स खाताच काही मिनिटांत सर्व घाण निघेल बाहेर

बद्धकोष्ठतेपासून आराम हवा? पचन सुधारण्यासाठी AIIMS तज्ज्ञांचा सल्ला; हे 5 सुपरफुड्स खाताच काही मिनिटांत सर्व घाण निघेल बाहेर

Follow Us
Close
Follow Us:
  • पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही नैसर्गिक पदार्थ फायदेशीर ठरू शकतात.
  • तज्ज्ञांच्या मते, फायबरयुक्त अन्नपदार्थ नियमित खाल्ल्यास पोटाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.
  • आहारात काही साधे पण पौष्टिक पदार्थ समाविष्ट केल्याने सकाळी पोट साफ होण्याची प्रक्रिया सुधारू शकते.
सकाळी उठल्यावर आपल्याला कामावर जाण्याची घाई असते. अशावेळी जर आपलं पोट नीट साफ झालं नाही तर संपूर्ण दिवस खराब जातो. पोट साफ झालं मोकळं वाटत पण तेच जर साफ झालं नाही तर दिवसभर आपला वेळ दडपणात जातो. पोट साफ न होण्याची समस्या आपल्या पचनक्रियेशी जोडलेली आहे. सकाळी उठताच जर तुमच्या शरीरातील घाण, टाकाऊ पदार्थ जर बाहेर पडत नसतील तर वेळीच यावर योग्य तो उपाय करायला हवा. आताच्या काळात अनेकजण पोट साफ न होण्याच्या समस्येला सामोरे जात आहेत. ही समस्या छोटी वाटत असली पुढे जाऊन याचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

‘स्ट्रोक’साठी सर्वसमावेशक आराखडा! समिट आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली महाराष्ट्र स्ट्रोक समिटमध्ये तज्ज्ञांची चर्चा

इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये, एम्स, हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड येथील प्रशिक्षित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी काही फायबरयुक्त पदार्थांबद्दल सांगितले आहे ज्यांचे नियमितपणे सेवन केल्याने आरामात सकाळी पोट साफ होत जाईल आणि डाॅक्टरांकडे जाण्याची गरजही भासणार नाही. तुम्हालाही पोटाच्या समस्यांना सारख्या भेडसावत असतील तर आजपासूनच आहारात खाली दिलेल्या पदार्थांचा समावेश करायला सुरुवात करा.

हलकी हिरवी केळी

बाजारात नेहमी पिवळ्या रंगांची केळी दिसून येतात आणि तिच खाल्ली जातात. पण यावेळी जर तुम्हाला बाजारात कधी हलक्या हिरव्या रंगांची केळी दिसली तर आवर्जून त्यांना खरेदी करा. याचे सेवन आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांना प्रोत्साहन देते आणि रक्तातील साखर स्थिर करते, परिणामी यामुळे पोट दिर्घकाळ भरल्यासारखे वाटते. डॉ. सेठी दररोज किमान एक तरी हलक्या हिरव्या केळीचे सेवन करण्याची शिफारस करतात.

चिया सिड्स

चिया सिड्स पाण्यात टाकून मग त्याचे सेवन केले जाते. तुम्ही कोणत्या ड्रिंकमध्येही टाकून याचे सेवन करु शकता. याचे सेवन पोट भरल्याची भावना वाढवते आणि आतड्यांची नियमित हालचाल राखण्यास मदत करते. डॉक्टर दररोज १-२ चमचे चिया बिया दही किंवा स्मूदीमध्ये मिसळून खाण्याची शिफारस करतात.

डाळी

डाळींचे सेवन फक्त आपल्या आरोग्यावर परिणाम घडवून आणत आहे तर याचा आपल्या पचनसंस्थेवरही परिणाम होत असतो. डाळींमध्ये फायबर, प्लांट बेस प्रोटीन आणि काही आवश्यक घटक असतात जे पोटाच्या आरोग्यावर चांगला परिणाम करतात. डॉ. सेठी आठवड्यातील बहुतेक दिवस १/२ ते १ कप शिजवलेल्या डाळी किंवा शेंगा खाण्याचा सल्ला देतात.

बेरीज

लहानांपासून मोठ्यांना बेरीज खायला फार आवडतात. या फळाचे सेवन फक्त तोंडाचे चोचलेच पुरवत नाही तर आतड्यांच्या आरोग्यासही प्रोत्साहन देते. ब्लूबेरीज किंवा रास्पबेरीज, फायबर आणि पॉलीफेनॉल्सचा एक उत्कृष्ट स्रोत आहेत. डॉ. सेठी यांनी दररोज १/२ ते १ कप बेरीज खाण्याचा सल्ला दिला आहे.

Obesity: लठ्ठपणामुळे वाढतो अनेक आजारांचा धोका, केवळ वजनवाढ नाही; जीवावर बेतू शकते दुर्लक्ष करणे

नट्स

अक्रोड आणि बदाम सारख्या नट्समध्ये फायबर आणि हेल्थी फॅट भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे पोट भरल्याची भावना, चयापचय आरोग्य आणि चांगल्या आतड्यांतील सूक्ष्मजंतूंची विविधता वाढते. डॉ. सेठी दररोज सुमारे १/४ कप नट्स खाण्याची शिफारस करतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Constipation relief superfoods aiims experts digestive health foods for constipation lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • constipation
  • Health Tips
  • healthy food
  • lifestyle news

संबंधित बातम्या

गोळी ठरतेय का गेमचेंजर? कॅन्सरच्या धोक्याला कमी करु शकते ॲस्पिरिन? संशोधनात झालाय खुलासा, जाणून घ्या
1

गोळी ठरतेय का गेमचेंजर? कॅन्सरच्या धोक्याला कमी करु शकते ॲस्पिरिन? संशोधनात झालाय खुलासा, जाणून घ्या

Women Health: प्रसूतीनंतर ७०% महिलांना पाठदुखीचा त्रास; उपचारास विलंब केल्यास दिर्घकालीन आजाराचा धोका
2

Women Health: प्रसूतीनंतर ७०% महिलांना पाठदुखीचा त्रास; उपचारास विलंब केल्यास दिर्घकालीन आजाराचा धोका

धूम्रपान न करणाऱ्यांनाही फुफ्फुसाच्या Cancer चा धोका? कीटकनाशकांचा दीर्घकालीन संपर्क ठरू शकतो घातक; संशोधनात नेमकं काय?
3

धूम्रपान न करणाऱ्यांनाही फुफ्फुसाच्या Cancer चा धोका? कीटकनाशकांचा दीर्घकालीन संपर्क ठरू शकतो घातक; संशोधनात नेमकं काय?

Pregnancy मध्ये शारीरिक संबंध ठेवल्यास होते नॉर्मल डिलिव्हरी? काय आहे तथ्य, तज्ज्ञांनी केला खुलासा
4

Pregnancy मध्ये शारीरिक संबंध ठेवल्यास होते नॉर्मल डिलिव्हरी? काय आहे तथ्य, तज्ज्ञांनी केला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.