Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel: एक असे मंदिर जिथल्या यज्ञ कुंडात देवी सतीने केले होते आत्मदहन, एकदा नक्की दर्शन करा

बिहारमधील सारण जिल्ह्यात गंगा नदीच्या काठावर वसलेले अंबिका भवानी मंदिर हे धार्मिक श्रद्धा आणि पौराणिक इतिहासाचा संगम मानले जाते. देवी सतीच्या आत्मदहनाशी जोडलेल्या कथांमुळे हे ठिकाण अत्यंत पवित्र सिद्धपीठ मानले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 29, 2026 | 09:59 AM
Travel: एक असे मंदिर जिथल्या यज्ञ कुंडात देवी सतीने केले होते आत्मदहन, एकदा नक्की दर्शन करा

Travel: एक असे मंदिर जिथल्या यज्ञ कुंडात देवी सतीने केले होते आत्मदहन, एकदा नक्की दर्शन करा

Follow Us
Follow Us:
  • अंबिका भवानी मंदिराचा संबंध देवी सतीच्या आत्मदहनाच्या पौराणिक कथेशी असून हे ठिकाण शक्तीपीठ मानले जाते.
  • येथे देवीची मूर्ती नसून यज्ञकुंडाची पूजा केली जाते, जे मंदिराचे विशेष वैशिष्ट्य आहे.
  • मंदिरात दर्शनासाठी ठराविक वेळा असून रेल्वे, रस्ता आणि विमानमार्गाने येथे सहज पोहोचता येते.
धार्मिक पर्यटनाची आवड असल्याच आजचे हे मंदिर तुमच्या लिस्टमध्ये नक्कीच सामील व्हायला हवे. हिंदू धर्मातील काही प्रमुख मंदरांमध्ये याचाही प्रामुख्याने समावेश होतो. बिहारमधील सारण जिल्ह्यात गंगा नदीच्या काठावर अंबिका भवानी मंदिर वसले असून इथे स्थळ धार्मिक श्रद्धा आणि पाैराणिक इतिहासाचा संगम मानले जाते. छपरापासून सुमारे २६ किलोमीटर अंतरावर दिघवारा जवळ हे मंदिर स्थित आहे. या मंदिरासंबंधित अनेक कथा प्रचलित असून इथेच देवी सतीने आपल्या प्राणांची आहुती दिल्याचे सांगितले जाते. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

फ्रीमध्ये 7 दिवस परदेश फिरण्याची सुवर्णसंधी! लगेच करा अर्ज, मर्यादित वेळच

सतीने केले होते आत्मदहन

अंबिका भवानी मंदिराचा इतिहास फार जुना असून सतयुगाशी तो जोडलेला असल्याची माहिती आहे. पौराणिक कथा आणि सारण गॅझेटियरनुसार, हे ठिकाण राजा दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचे स्थळ मानले जाते, जिथे पती भगवान शिवाचा अपमान झाल्याने संतप्त झालेल्या देवी सतीने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले. यानंतर भगवान शिवाने सतीच्या पार्थिव देहाला आपल्या खांद्यावर घेऊन तांडल यज्ञ करण्यास सुरुवात केली. परिस्थिती यावेळी फार बिघडलेली होती आणि विश्वाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने देवी सतीच्या पार्थिवाचे तुकडे केले. असे मानले जाते की, देवी सतीच्या शरीराचे हे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले तिथे शक्तीपीठे स्थापन करण्यात आली. परंतु अमीचे वैशिष्ट्य हे आहे की, यज्ञाग्नीत दहन केल्यानंतर सतीच्या शरीराची राख, म्हणजेच तिच्या अवशेषांचे अवशेष, येथेच राहिले. यामुळेच हे स्थळ एक अत्यंत प्रभावशाली सिद्धपीठ मानले जाते.

मंदिराचे वैशिष्ट्य

या मंदिरातील सर्वात खास गोष्ट म्हणजे इथे देवीची कोणतीही मूर्ती नाही तर ज्या यज्ञकुंडात तिने आपल्या देहाचा त्याग केला त्या यज्ञकुंडाची इथे पूजा केली जाते. येथे भक्तगण आदिशक्तीच्या सौम्य रूपाची पूजा करतात. भक्त एखादी इच्छा व्यक्त करण्यासाठी गर्भगृहात हात ठेवतात आणि नंतर कुंडातील नैवेद्य कापडात गुंडाळून ठेवतात. असे केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, असा विश्वास आहे. इच्छा पूर्ण झाल्यावर, कुंडातील नैवेद्य पुन्हा कुंडातच परत केला जातो. इथे एक चमत्कारीक विहिर देखाल आहे ज्यात वर्षभर पाणी तुडुंब भरलेले असते.

मंदिरातील दर्शनाच्या वेळा

सकाळ: पहाटे ४:३० वाजता माता अंबांच्या स्नानाला सुरुवात होते, त्यानंतर पहाटे ५:०० वाजता दैनिक पूजा होते. मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी पहाटे ५:१० वाजता उघडले जातात.
दुपारची सुट्टी – मंदिराचे दरवाजे दुपारी १:०० वाजता बंद होतात आणि दुपारी २:०० वाजता पुन्हा उघडतात.
सायंकाळची आरती – दुपारी ३:१५ वाजता स्नानासाठी दरवाजे बंद केले जातात आणि सायंकाळी ४:०० वाजता शृंगार आणि दर्शन पुन्हा सुरू होते.
मंदिराची भव्य मुख्य आरती रात्री ८:४० वाजता होते.

फ्लाइटमध्ये आता ‘सोफा कम्फर्ट’! नवीन सीट डिझाइनने प्रवास होणार अधिक आरामदायी

आमी अंबिका स्थानाला कसे जायचे?

अंबिका भवानी मंदिराला रेल्वे तसेच रस्ते मार्गाने भेट देता येऊ शकते.

रेल्वेने – मंदिराच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन अमी आहे. भाविक दिघवारा किंवा छपरा जंक्शनपर्यंत रेल्वेने प्रवास करु शकतात. यापुढे त्यांना रिक्षा किंवा टॅक्सी करुन मंदिरात जाता येईल.

रस्त्याने – हे मंदिर पाटणा-छपरा मुख्य रस्त्यावर आहे. ते पाटण्यापासून अंदाजे ५०-५५ किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही पाटण्याहून बस किंवा टॅक्सी करुन थेट तिथे पोहचू शकता.

विमान मार्ग – इथे सर्वात जवळचे विमानतळ आहे जयप्रकाश आंतरराष्ट्रीय विमानतळ, इथून कॅब करुन साधारण २ तासांत मंदिराचे दर्शन करता येते.

Web Title: Ambika bhavani temple bihar history timings how to reach travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 09:59 AM

Topics:  

  • bihar
  • Religious Places
  • travel news

संबंधित बातम्या

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
1

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

लोहगडावर इतिहासाच्या नाही तर सिया पॉईंटच्या शोधत आहेत पर्यटक… डार्क टुरिजमचा हा ट्रेंड नक्की आहे तरी काय?
2

लोहगडावर इतिहासाच्या नाही तर सिया पॉईंटच्या शोधत आहेत पर्यटक… डार्क टुरिजमचा हा ट्रेंड नक्की आहे तरी काय?

भारताच्या या गावाला का म्हटलं जातं सायलंट व्हिलेज, कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल
3

भारताच्या या गावाला का म्हटलं जातं सायलंट व्हिलेज, कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल

Travel News : भारतीय रेल्वेचे शेवटचे स्टेशन… इथून काहीच पावलांवर सुरू होते दुसऱ्या देशाची वाट
4

Travel News : भारतीय रेल्वेचे शेवटचे स्टेशन… इथून काहीच पावलांवर सुरू होते दुसऱ्या देशाची वाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.