घनदाट-लांबलचक केसांसाठी 5 रुपयांचा 'हा' पदार्थ ठरेल रामबाण, फक्त अशाप्रकारे करा वापर
सध्या हिवाळा ऋतू सुरु आहे. या थंडीच्या वातावरणात आरोग्याच्या, त्वचेच्या तसेच केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत असतात. महिला तर या ऋतूत अनेक समस्यांनी ग्रासलेल्या असतात. यातीलच एक समस्या म्हणजे, केसगळती. या ऋतूत फार मोठ्या प्रमाणात केसगळती होत असते ज्यामुळे आपल्या केसांचे आरोग्य धोक्यात येते. केसगळती ही एक सामान्य समस्या असली तरी याचे आपल्या आरोग्यावर मोठे परिणाम दिसून येतात. अनेकदा महागडे शॅम्पू वापरूनही ही केसगळती काही थांबण्याचे नाव घेत नाही. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला ही समस्या दूर करण्यासाठीचा एक सोपा आणि प्रभावी उपाय सांगत आहोत.
अनेकांना हे ठाऊक नाही की केसगळतीची समस्या रोखण्यासाठी तुम्ही एका लहान औषधी पदार्थाचाही वापर करू शकता. हे पदार्थ म्हणजे आवळा. आवळा हिवाळ्यातील एक सुपरफूड आहे. यामुळेच शतकानुशतके लोक याला आपल्या आहाराचा भाग बनवत आहेत. चवीला आंबट असलेले हे फळ एकच नाही तर अनेक फायद्यांनी परिपूर्ण आहे. याचा शरीराच्या विविध भागांना अनेक प्रकारे फायदा होतो. तुम्ही तुमची केसगळतीची समस्याही याने दूर करू शकता.
हार्ट अटॅकचा धोका वाढत आहे; शरीराच्या ‘या’ लक्षणांवरून वेळीच सावध व्हा, नाहीतर मृत्यूला बळी पडाल
आवळ्याचे फायदे
केसांसाठी ठरतो फायदेशीर
आवळा विशेषत: केसांसाठी भरपूर प्रमाणात पोषक आहे. त्यात फायटोन्यूट्रिएंट्ससह जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे टाळूमध्ये ब्लड सर्कुलेशन वाढवतात, ज्यामुळे केसांची वाढ वाढते. ब्लड सर्कुलेशन हे सुनिश्चित करते की सर्व खनिजे आणि जीवनसत्त्वे टाळू आणि केसांच्या मुळांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचतात.
कसा करावा वापर
जर तुम्हाला आवळा योग्य प्रकारे केसांसाठी वापरायचा असेल तर त्याचा आहारात समावेश करण्यासोबतच तुम्हाला त्यातून हेअर मास्क बनवावा लागेल. यामुळे केसांना पूर्ण पोषण मिळेल. त्याचा मास्क बनवण्यासाठी आवळ्याची पाने सुकवून त्याची पावडर बनवा. आवळा हेअर मास्क कसा तयार करायचा ते जाणून घेऊया.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.