(फोटो सौजन्य: istoc
बदलत्या काळानुसार आपल्या जीवनशैलीतही अनेक बदल घडून आले. आजकाल कामाच्या प्रचंड व्यापामुळे लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू लागली आहेत. मात्र अनेकांना हे ठाऊक नाही की याचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतो. चुकीची जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या वाईट सवयी आणि व्यायामाच्या अभावामुळे लोक अनेक आजार आपल्या कमी वयातच जडतात आणि आपल्या शरीराला निकामी करण्याचे काम करतात. सध्या काही गंभीर आजारांचे प्रमाण देखील झपाट्याने वाढत आहेत, यात हार्ट अटॅकचा मुख्यत्वे समावेश होतो.
येत्या काई काळात हार्ट अटॅकच्या आजाराने अनेकांना मृत्यूच्या घाटात पोहचवले आहे. अशात याबाबत जनजागृती करणे आणि याच्या काही सामान्य लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे फार गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हृदयविकाराचा झटका येण्याआधी आपले शरीर आपल्याला काही संकेत देत असतो ज्यांच्याकडे वेळीच लक्ष देऊन तुम्ही या आजाराला दूर पळवू शकता. अनेकांना हा लक्षनांविषयी फारसे माहिती नसते ज्यामुळे लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि मृत्यूला बळी पडतात. मात्र या लक्षणांना वेळीच ओळखले तर यावर उपचार करून तुम्ही हा धोका टाळू शकता.
हार्ट अटॅकची लक्षणे
शरीराच्या वरच्या भागात वेदना
जर तुम्हाला छातीत दुखत असेल, अस्वस्थता असेल किंवा तुमच्या हातांवर (विशेषतः डावा हात), जबडा, घसा आणि खांद्यावर पसरणारा कोणताही दबाव असेल तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे.
खूप जास्त घाम येणे
जर तुम्हाला अचानक खूप जास्त प्रमाणात घाम येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः जेव्हा तुम्ही हृदयविकाराच्या इतर लक्षणांमधून जात असाल.
अचानक चक्कर येणे
रिकाम्या पोटापासून ते डिहायड्रेशनपर्यंत अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे तुम्हाला चक्कर येते किंवा तुमचे डोके थोडे जड वाटू लागते. पण जर तुम्हाला छातीत अस्वस्थतेसोबतच कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असेल तर ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. पुरावा सूचित करतो की हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान स्त्रियांना असे वाटण्याची शक्यता जास्त असते.
हृदयाचा ठोका अचानक वाढणे किंवा कमी होणे
जलद हृदयाचा ठोका हा अनेक घटकांचा परिणाम असू शकतो, ज्यात कॅफीनचे जास्त सेवन आणि कमी झोप यांचा समावेश होतो. परंतु जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे हृदय काही सेकंदांसाठी सामान्यपेक्षा वेगाने धडधडत आहे, तर तुम्हाला ताबडतोब डॉक्टरांना भेटण्याची आवश्यकता आहे.
या सर्व लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन तुम्ही या आजारापासून दूर पळू शकता. यातील कोणतेही लक्षण जर तुम्हाला जाणवत असतील तर वेळीच डॉक्टरांना गाठा आणि यावर योग्य तो सल्ला घ्या.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.