व्हॅलेंटाईन डे च्या पार्टीमध्ये सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर लावा नैसर्गिक पदार्थानी बनवलेला घरगुती फेसमास्क
7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरु होणार आहे. व्हॅलेंटाईन वीकच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळे डे साजरे करून एकमेकांबद्दल असलेले प्रेम व्यक्त केले जाते. तसेच या दिवसांमध्ये अनेक जोडपी पार्टी निमित्त बाहेर फिरायला जातात. अशावेळी मुली मोठ्या आनंद आणि उत्साहामध्ये छान तयार होऊन आपल्या पार्टनरसोबत बाहेर फिरायला जातात. पण कामाच्या धावपळीमुळे मुलींना पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम, फेशिअल इत्यादी अनेक गोष्टी करूनही चेहऱ्यावर हवा तसा ग्लो दिसून येत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला व्हॅलेंटाईन डे च्या पार्टीमध्ये चेहऱ्यावर ग्लो मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. घरगुती फेसमास्कचा वापर केल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते.(फोटो सौजन्य – iStock)
खोबऱ्याचा किस
मध
फेसमास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम, ओलं खोबरं किसून त्यातील किस काढून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात खोबऱ्याचा किस टाकून त्यात मध टाकून पेस्ट तयार करून घ्या. तयार करून घेतलेली पेस्ट वाटीमध्ये काढून मिक्स करा. नंतर तयार फेसमास्क संपूर्ण चेहऱ्यावर, मानेवर लावून काहीवेळ हलक्या हाताने मसाज करून नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या त्वचेवरील सर्व टॅनिंग निघून जाईल आणि त्वचा उजळदार दिसेल.
ओलं खोबरं त्वचेला लावल्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होण्यास मदत होते. त्वचेवरील टॅनिंग निघून जाऊन त्वचेची गुणवत्ता सुधारते. ओल्या खोबऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फॅटी ऍसिड आणि विटामिन इ आढळून येते. उन्हामुळे त्वचेमध्ये होणारी जळजळ कमी करण्यासाठी खोबऱ्याचे दूध किंवा तेल चेहऱ्यावर लावून काहीवेळाने स्वच्छ धुवावे. यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी दिसेल. खोबऱ्याचा किस आणि मध वापरून तयार केलेला फेसमास्क त्वचा स्वच्छ करण्यासाठी मदत करेल.
गट हेल्थ खराब झाल्यानंतर त्वचेवर येतात पुरळ! चेहऱ्यावर आलेले अॅक्ने घालवण्यासाठी घरगुती उपाय
मधाचा वापर त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे मुरुमानी भरलेला चेहरा स्वच्छ आणि तेजस्वी दिसतो. त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यासाठी मधाचा वापर करावा. मध वापरल्यामुळे त्वचा उजळदार आणि सुंदर दिसू लागते.मध आणि खोबऱ्याचा किस त्वचेवर लावल्यामुळे तुमचा लुक अधिक तरुण आणि उठावदार दिसेल. व्हॅलेंटाईन डे च्या पार्टीमध्ये सुंदर दिसण्यासाठी या फेसमास्कचा नक्की वापर करून पहा .