प्राजक्ता सुंदर त्वचेसाठी वापरते 'हा' घरगुती फेसमास्क
सुंदर त्वचेसाठी महिला आणि मुली सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट लावणे तर कधी सोशल मीडियावर दाखवले जाणारे घरगुती उपाय करून पहिले जातात. पण त्वचेला सूट होईल अशा पदार्थांचा किंवा प्रॉडक्टचा वापर न केल्यामुळे त्वचा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेचा प्रकार ओळखून त्वचेला सूट होईल अशाच पदार्थांचा वापर करणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या महिला कंटेंट क्रिएटर्स सतत काहींना काही शेअर करत असतात. त्यातील ‘मोस्ट्लीसेन’ ‘प्राजक्ता कोळी’ सगळ्यांची लाडकी आहे. ‘मोस्ट्लीसेन’ आणि ‘मिसमॅच’ या वेब सिरीजमुळे ती तरुणाईमध्ये खूप जास्त लोकप्रिय झाली आहे.(फोटो सौजन्य – iStock)
गट हेल्थ खराब झाल्यानंतर त्वचेवर येतात पुरळ! चेहऱ्यावर आलेले अॅक्ने घालवण्यासाठी घरगुती उपाय
प्राजक्ता कोळीचे सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येने फॉलोवर्स आहेत. ती तिच्या सोशल मीडिया पेजवरून ती सतत काहींना काही शेअर करत असते. तिच्या सौंदर्यावर लाखो चाहते फिदा आहेत. ती तिचे सौंदर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती उपाय करून त्वचेच्या सौंदर्यची काळजी घेते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला प्राजक्ता कोळीने सुंदर त्वचेसाठीऊ शेअर केलेले घरगुती उपाय सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
प्राजक्ता सुंदर त्वचेसाठी वापरते ‘हा’ घरगुती फेसमास्क
प्राजक्ता कोळी तिच्या सुंदर आणि डागविरहित त्वचेसाठी बेसनाचा वापर करते. बेसन त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी मदत करतो. त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी बेसनाचा वापर करावा. यामुळे त्वचा अधिक मुलायम आणि मऊ होते. फेसमास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात दही, हळद आणि मध मिक्स करून घ्या. त्यानंतर मिश्रण तयार करून झाल्यावर त्वचेवर लावून 15 मिनिटं तसेच ठेवा. फेसमास्क पूर्णपणे सुकल्यानंतर गरम पाण्याने त्वचा स्वच्छ करा. घाईगडबडीच्या वेळी कोणत्याही कार्यक्रमाला जाण्याआधी तुम्ही या फेसमास्कचा वापर करू शकता.
सकाळच्या वेळी झोपेतून उठल्यानंतर चेहऱ्यावर लावा ‘हे’ पदार्थ, दिवसभर त्वचा राहील फ्रेश आणि ताज़ीटवटवीत
केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी घरगुती तेल तयार करण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये खोबऱ्याचे तेल घेऊन त्यात कढीपत्त्याची पाने, कांद्याचे तुकडे टाकून व्यवस्थित मिक्स करून गरम करून घ्या. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅस बंद करून तयार करून घेतलेले घरगुती तेल थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर गाळणीच्या सहाय्याने तेल गाळून घ्या. आठवड्यातून दोनदा तेल केसांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे केसांची मूळ मजबूत होतील आणि केस लांबलचक होण्यास मदत होईल.