Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियेची भिती वाटते ? काय आहेत समज आणि गैरसमज

अनेकांना हृदयाच्या बायपास सर्जरीचा विचार येतो तेव्हा मनात भीती येते. मात्र याबाबत काय बरेच समज गैरसमज आहेत. याबाबत कार्डिव्हॅस्क्युलर सर्जन यांनी सविस्त माहिती दिली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 23, 2025 | 05:11 PM
हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियेची भिती वाटते ? काय आहेत समज आणि गैरसमज
Follow Us
Close
Follow Us:

हृदय म्हणजे शरीराचा सर्वात महत्त्वाचा आणि नाजूक अवयव. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना हृदयविकारासंबंधित आजार भेडसावत आहेत. अनेकांना हृदयाच्या बायपास सर्जरीचा विचार येतो तेव्हा मनात भीती येते. आपलं पुढील आयुष्य कसं असेल याबाबत चिंता सतावत असते. मात्र या बाबत अनेक समज गैरसमज आहेत.  बायपास सर्जरी म्हणजे तुमच्या कार्यरत जीवनाचा शेवट नाही तर ती एक नवीन सुरूवात आहे! योग्य आणि निरोगी जीवनशैलीसह शस्त्रक्रियेनंतर हृदयाचे कार्य चांगले राहते आणि तुम्हाला जुन्या दिनचर्येत परत जाण्यापासून – किंवा अगदी एव्हरेस्ट बेस कॅम्पला ट्रेकिंग करण्यापासून काहीही रोखत नाही. याबाबत अधिक माहिती हिंदुजा हॉस्पिटलच्या कार्डिव्हॅस्क्युलर सर्जन, डॉ. कौशल पांडे यांनी दिली आहे.

बायपास सर्जरीला सीएबीजी किंवा कलिनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट सर्जरी असेही म्हणतात. तुमच्या तिन्ही धमन्यांमध्ये गंभीर ब्लॉकेज असतात आणि केस अँजिओप्लास्टीसाठी योग्य नसते तेव्हा ती केली जाते.योग्य उपचारांचा निर्णय घेण्यासाठी अँजिओग्राफी ही एक महत्त्वाची चाचणी आहे. ती डॉक्टरांना रुग्णाच्या हृदयासाठी आवश्यक ती पावले ठरवण्यास मदत करते. तुमच्या निकालांनुसार काही रुग्णांना अँजिओप्लास्टी किंवा स्टेंटिंगची आवश्यकता असू शकते, तर काहींना त्यांच्या धमन्या स्वच्छ ठेवण्यासाठी पुन्हा स्टेंटिंग प्रक्रियेची आवश्यकता असू शकते.

हल्लीच्या काळात अँजिओप्लास्टी आणि स्टेंटिंग एकमेकांशी संबंधित आहेत. अँजिओप्लास्टी करणाऱ्या प्रत्येक रूग्णाला दीर्घकालीन फायद्यांसाठी स्टेंट दिला जातो. अँजिओप्लास्टीचा मूळ अर्थ पूर्वी बलून अँजिओप्लास्टी असून ब्लॉक केलेल्या धमन्या उघडण्यासाठी बलूनचा वापर केला जात असे. नंतर डॉक्टरांना लक्षात येऊ लागले की, ५-१० वर्षांत अनेक ब्लॉकेज परत येत आहेत. कधी-कधी काही प्रकरणांमध्ये तर ते काही आठवड्यांत परतले. धमनीत धातूचा स्टेंट ठेवल्याने ब्लॉकेज परत येण्यापासून रोखण्यास मदत होते आणि पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण कमी होते, असे संशोधनातून असे दिसून आले आहे.

बेअर मेटल स्टेंट (पहिल्या पिढीतील): सुरूवातीचे स्टेंट फक्त धातूचे होते. ते रचनात्मक आधार देत असत परंतु त्याला मर्यादा होत्या. औषधावर आधारित स्टेंट: नंतर काळात ड्रग-एल्युटिंग स्टेंट (डीईएस) आले. त्यात पुन्हा ब्लॉकेज टाळण्यासाठी औषधे वापरण्यात आली आणि त्यामुळे ते दीर्घकाळात अधिक प्रभावी झाले.

बायपास सर्जरीचे परिणाम:
बायपास सर्जरीचा परिणाम रूग्णाच्या प्रकृतीनुसार बदलतो आणि अनेकदा त्यांना दीर्घ, निरोगी आणि अधिक समाधानकारक आयुष्य मिळते. काही रुग्णांबाबत सांगायचे झाल्यास बायपास सर्जरीमुळे त्यांचे आयुष्य खूप सुधारते, जीवनाची गुणवत्ता वाढते आणि त्यांना पुढील अनेक वर्षे निरोगी आयुष्य जगता येते.

२० ते ३० वर्षे वयोगटातील तरूणांनी सकस आहार घ्यावा, व्यायाम केला पाहिजे आणि धूम्रपान करू नये. त्यांनी आठवड्यातून किमान १५० ते १८० मिनिटे व्यायाम केला पाहिजे आणि कार्डिओसाठी वेळ दिलाच पाहिजे असं ही डॉक्टारांनी सांगितलं आहे.

केवळ व्यायामच नाही तर योग्य आहार घेणे देखील महत्वाचं आहे. रेस्टॉरंटमध्ये किंवा बाहेर जेवण्याचाहा  अलिकडचा ट्रेंड आता सामान्य झाला आहे. कारण अनेक जण विविध कारणांमुळे त्यांच्या कुटुंबापासून दूर राहतात. त्यामुळे आपली जीवनशैली जाणीवपूर्वक बदलणे आणि सकस आहार घेण्याची सवय लावणं हे अत्यंत महत्वाचं आहे.

तंत्रज्ञानाचा परिणाम:
तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ऑपरेशन प्रक्रियेत खरोखर काय बदल झाले आहेत असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. त्याचे उत्तर म्हणजे अचूकता आणि सुरक्षितता वाढली आहे. अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरपासून ते अत्याधुनिक प्रकाशयोजना,  भूल  देणाऱ्या  तज्ज्ञांपर्यंत प्रत्येक बाबतीत मोठे बदल झाले आहेत.

आपल्याकडे आता अशी साधने आहेत, ज्याद्वारे बायपास सर्जरीनंतर तुमचे सर्व बायपास योग्य पद्धतीने काम करत आहेत की नाही हे तपासता येते. रूग्ण ऑपरेशन थिएटरमधून बाहेर पडतो तेव्हा आम्हाला सर्व बायपास योग्यरित्या काम करत असल्याची खात्री पटते.

रोबोटिक शस्त्रक्रिया हा विशेषतः व्हिज्युअलायझेशनच्या बाबतीत एक मोठा सकारात्मक बदल आहे. धमन्या मोठ्या दिसत असल्याने अचूकता वाढते आणि सर्जनला अधिक कार्यक्षमतेने काम करता येते. परंतु रोबोट सर्जनची जागा घेऊ शकणार नाही. मानवी हस्तक्षेप आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता किमान ऑपरेशन थिएटरमध्ये निर्णय घेण्याच्या बाबतीत तरी एआय आणि रोबोट्सद्वारे करता येत नाही.

आजच्या सीएबीजीमुळे दीर्घायुष्य मिळते आणि आयुष्यमानात लक्षणीय वाढ होते. अनुभवी सर्जन्सनी शस्त्रक्रिया केल्यावर गुंतागूंत होण्याचा धोका कमी होतो. सुधारित इमेजिंग आणि रिफाइन्ड सर्जिकल तंत्रांसारख्या प्रगतीमुळे अचूकता आणि रुग्णांचे लाभ आणखी वाढले आहेत.

बायपास सर्जरी ही एक सुरक्षित व सर्वसामान्य प्रक्रिया आहे आणि तिचे दीर्घकालीन फायदे आहेत. रूग्णांनी सर्वसमावेशक उपचार पद्धतीच्या आणि चांगले आयुष्य जगण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करताना हृदयरोगतज्ज्ञ आणि सर्जन्स या दोघांचाही सल्ला घेणे आवश्यक आहे.

Web Title: Are you afraid of heart bypass surgery what are the myths and misconceptions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 04:50 PM

Topics:  

  • Health News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Latur News :  उदगीरनगर परिषदेसाठी चौरंगी लढत, काँग्रेसकडून प्रचाराला वेग
1

Latur News : उदगीरनगर परिषदेसाठी चौरंगी लढत, काँग्रेसकडून प्रचाराला वेग

Kalyan : ‘खोटे कागदपत्र तयार करून जमीन लाटण्याचा प्रयत्न’ पिडीत शेतकरी आक्रमक
2

Kalyan : ‘खोटे कागदपत्र तयार करून जमीन लाटण्याचा प्रयत्न’ पिडीत शेतकरी आक्रमक

Sindhudurg : निलेश राणेंचा नितेश राणे व कणकवली सभेवर प्रत्युत्तर; भाजप ऑफर नाकारली
3

Sindhudurg : निलेश राणेंचा नितेश राणे व कणकवली सभेवर प्रत्युत्तर; भाजप ऑफर नाकारली

Satara News : लाच स्वीकारताना पकडलं रंगेहात; विद्युत पथकातील कार्यकारी अभियंत्यावर पोलीसांची कारवाई
4

Satara News : लाच स्वीकारताना पकडलं रंगेहात; विद्युत पथकातील कार्यकारी अभियंत्यावर पोलीसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.