Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“सनई चौघडे” मध्ये राज हंचनाळेची दमदार एन्ट्री; ‘जय खानोलकर’च्या भूमिकेत घालणार धुमाकूळ

सनई चौघडे या आगामी मालिकेत मराठी अभिनेता राज हंचनाळेची दमदार एन्ट्री झालेली पाहायला मिळाली आहे. ‘जय खानोलकर’च्या जबरदस्त भूमिकेत अभिनेता दिसणार असून, १६ मार्चपासून झी मराठीवर मालिका सुरु होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 04, 2026 | 01:10 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • “सनई चौघडे” मध्ये राज हंचनाळेची दमदार एन्ट्री
  • ‘जय खानोलकर’च्या भूमिकेत वेधले लक्ष
  • “सनई चौघडे” मालिका कुठे होणार प्रदर्शित?
 

सनई चौघडे या झी मराठीवरील नव्या मालिकेत अभिनेता राज हंचनाळे दमदार आणि स्टायलिश नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘जय खानोलकर’ ही त्याची व्यक्तिरेखा कणखर, शिस्तप्रिय आणि तितकीच भावनिक आहे. स्वभावाने रागीट आणि ॲटिट्युड असलेला जय मनाने मात्र अत्यंत हळवा आहे. त्याच्या आयुष्यात फक्त तीन स्त्रियांना विशेष स्थान आहे. आजी, आई आणि बहीण. स्वतःच्या कष्टाने शून्यातून विश्व उभं करणारा जय कामावर लक्ष केंद्रित करणारा, स्पष्टवक्ता आणि आत्मविश्वासी अशी भूमिका अभिनेत्याने साकारली आहे. त्याच्या आयुष्यातील अनेक गुपितं मालिकेच्या प्रवासात हळूहळू उलगडणार आहेत.

Dhurandhar 2 च्या भीतीने Toxic च्या निर्मात्यांनी पुढे ढकलली रिलीज डेट; चाहत्यांना ३ महिने करावी लागणार प्रतीक्षा

या भूमिकेसाठी निवड होण्याबाबत अभिनेता राज म्हणाला, ‘या भूमिकेसाठी माझी निवड झाली म्हणजे मला प्रॉडक्शन हाऊसमधून ऑडिशनसाठी कॉल आला. हे ऐकून मला खूप उत्सुकता वाटली. मला तिने सांगितलं की राजू सावंत डीरेक्टर आणि प्रोड्युसर आहे आणि ही आमच्या प्रोडक्शन ची पहिली सिरीयल आहे आणि प्लस ती झी मराठीवर आहे, सो हे कॉम्बिनेशन… एकदम भन्नाट वाटलं. मी पहिलं ऑडिशन घरातून पाठवलं आणि ते सगळ्यांना आवडलं. त्यानंतर मला सेटवर तीन-चार राऊंडसाठी बोलावण्यात आलं सह कलाकारानं सोबत ऑडिशनसाठी.’

अभिनेता पुढे म्हणाला, ‘माझ्यासाठी हा वेगळा अनुभव होता, कारण या आधी साधारण एक-दोन ऑडिशनमध्ये माझी निवड होत असे, या भूमिकेसाठी मात्र चार-पाच ऑडिशन झाले. तेव्हा थोडे प्रश्न मनात आले, पण आता मागे वळून पाहताना वाटतं की योग्य कलाकार निवडण्यासाठी त्यांनी काटेकोर प्रयत्न केले. त्या प्रक्रियेचा भाग होण्याचा मला आनंद आहे.’

जय खानोलकर ही प्रभावी व्यक्तिमत्त्वाची भूमिका असल्याने राजने बॉडी लँग्वेज, स्वॅग, ॲटिट्युड आणि स्टाईल यावर विशेष मेहनत घेतली आहे. मेहनतीने उभं केलेलं साम्राज्य सांभाळणारा जय रुबाबदार आणि अधिकारपूर्ण दिसणं आवश्यक असल्याने दिग्दर्शकांसोबत चर्चा करून त्याने व्यक्तिरेखा अधिक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. कठोर वाटणाऱ्या जयच्या मनातील प्रेमळ बाजूही प्रेक्षकांसमोर आणणं तितकंच महत्त्वाचं असल्याचं अभिनेत्याने सांगितलं आहे.

एचपीव्ही लसीकरण मोहिमेत ‘तिघी’ चित्रपटाच्या टीमचा सहभाग; महिला दिनानिमित्त आरोग्य जनजागृतीचा संदेश

मालिकेच्या प्रोमोला उत्तम प्रतिसाद मिळाला असून “स्वामींची इच्छा” हा संवाद आणि “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” हे वाक्य प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे. जय खानोलकरच्या रूपात राज हंचनाळे एक नवा, स्टायलिश आणि भावनिक नायक घेऊन येत आहे. मेहनत, शिस्त आणि भावनांचा संगम असलेली ही व्यक्तिरेखा नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करेल. ‘सनई चौघडे’ १६ मार्चपासून दररोज रात्री ८.३० वाजता झी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: Sanai chaughade zee marathi serial actor raj hanchanale entry as jay khanolkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Dhurandhar 2 च्या भीतीने Toxic च्या निर्मात्यांनी पुढे ढकलली रिलीज डेट; चाहत्यांना ३ महिने करावी लागणार प्रतीक्षा
1

Dhurandhar 2 च्या भीतीने Toxic च्या निर्मात्यांनी पुढे ढकलली रिलीज डेट; चाहत्यांना ३ महिने करावी लागणार प्रतीक्षा

एचपीव्ही लसीकरण मोहिमेत ‘तिघी’ चित्रपटाच्या टीमचा सहभाग; महिला दिनानिमित्त आरोग्य जनजागृतीचा संदेश
2

एचपीव्ही लसीकरण मोहिमेत ‘तिघी’ चित्रपटाच्या टीमचा सहभाग; महिला दिनानिमित्त आरोग्य जनजागृतीचा संदेश

BO Collection: होळीच्या सुट्टीचा ‘The Kerala Story 2’ ला मोठा फायदा; बॉक्स ऑफिसवर केली बंपर कमाई
3

BO Collection: होळीच्या सुट्टीचा ‘The Kerala Story 2’ ला मोठा फायदा; बॉक्स ऑफिसवर केली बंपर कमाई

“माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न…”, ‘धुरंधर’ फेम आयेशा खानचा मोठा खुलासा; सेटवरील स्पॉटबॉयने केले धक्कादायक कृत्य
4

“माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न…”, ‘धुरंधर’ फेम आयेशा खानचा मोठा खुलासा; सेटवरील स्पॉटबॉयने केले धक्कादायक कृत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.