इंटरनॅशनल ट्रिपची प्लॅनिंग करताय? यावर्षी 'हे' देश ठरलेत लोकप्रिय; आपल्या बकेट लिस्टमध्ये यांचा समावेश करायला विसरू नका
आपल्या आयुष्यात एकदा तरी इंटरनॅशनल ट्रिप करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. नवीन देश, नवीन परंपरा, खाद्यपदार्थ आणि त्या ठिकाणाचे सौंदर्य हे सर्वच पाहणे फार रोमांचक ठरते. आपल्या आयुष्यात आपण एकदा तरी इंटरनॅशनल ट्रिप करायला हवी. याद्वारे आपल्या काही दिवस एक वेगळं जग, वेगळी लोक पाहायला मिळतात आणि आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव सोबत घेऊन जाता येतो. दरवर्षी हजारो पर्यटक इंटरनॅशनल ट्रिप प्लॅन करतात. जगातील सर्वात लोकप्रिय आणि सुंदर देशांना भेट देण्याकडे अधिकांचा कल असतो. दरवर्षी या लोकप्रिय देशांच्या यादीत बदल होत असतो अशात आज आम्ही तुम्हाला जगातील अशा देशांची माहिती सांगणार आहोत जी यावर्षी सर्वात जास्त पॉप्युलर ठरली आहेत. तुम्हीही जर यंदा इंटरनॅशनल ट्रिपचा प्लॅन करत असाल तर हे देश तुमच्या यादीत सामील असायलाच हवेत.
टोकियो, जपान
जपानमधील टोकियो हे आधुनिकता आणि पारंपारिक संस्कृतीचे एक अनोखे मिश्रण आहे. जपान एक्स्पो २०२५ आणि नवीन तंत्रज्ञान केंद्र हे आणखी खास बनवत आहे. इथे तुम्ही शिंटो मंदिर, रोबोट रेस्टॉरंट आणि चेरी ब्लॉसम पार्क या ठिकाणांना भेट देऊ शकता. जपानमध्ये तुम्हाला अनेक प्रगत गोष्टी आणि इंटरेस्टिंग टेक्नॉलॉजिकल गोष्टी देखील पाहायला मिळतील ज्या तुम्ही आधी कुठेही पहिल्या नसतील.
रोम, इटली
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले इटलीतील रोम हे शहर फिरण्याच्या ठिकाणांमध्ये नेहमीच अव्वलस्थानी असते. कोलोसियम, व्हॅटिकन सिटी आणि ट्रेव्ही फाउंटन सारखी ठिकाणे रोमला खास बनवतात. तुम्ही इथे चविष्ट इटालियन जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. रोमच्या रस्त्यांवर फिरून तुम्ही ट्रिपचा एक अद्भुत अनुभव घेऊ शकता.
दुबई, युएई
भारतीयांच्या फिरण्याच्या यादीत दुबई हे ठिकाण फार आधीपासून समाविष्ट आहे. इथल्या भव्य गगनचुंबी इमारती, लक्झरी शॉपिंग आणि वाळवंट सफारी या ठिकाणाला आणखीनच खास बनवते. यासहच इथे बुर्ज खलिफा, पाम जुमेराह आणि फ्युचर म्युझियम ही प्रमुख आकर्षणे आहेत.
बाली, इंडोनेशिया
जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर इंडोनेशियातील बाली हे ठिकाण तुम्हाला खूप आवडेल. इथले शांत वातावरण, समुद्रकिनारा आणि हिरवळ मनाला सुखावणारी आहे. शहराच्या गजबजाटापासून दूर एक सुंदर आणि शांततामय सफरसाठी अनेकजण बालीची निवड करतात. येथील उबुड जंगल, तेगल्लालंग तांदळाच्या टेरेस आणि मंदिरांचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे.
पॅरिस, फ्रान्स
पॅरिस नेहमीच प्रेम आणि कलांचे केंद्र राहिले आहे. इथे आयफेल टॉवर, लूव्र संग्रहालय आणि नदीकाठी एक सुंदर वेळ घालवता येऊ शकतो. इथे घालवलेल्या सुंदर काळ नेहमीच संस्मरणात राहण्यासारखा आहे. अनेक चित्रपटांचे शूटिंग देखील या ठिकाणी केले जाते, तुम्ही जर या ठिकाणाला भेट दिलीत तर काल्पनिक वाटणारे आयुष्य सत्यात अनुभवत असल्याचा अनुभव तुम्हाला येईल.
केपटाऊन, दक्षिण आफ्रिका
इंटरनॅशनल ट्रिपसाठी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन देखील एक उत्तम पर्याय आहे. नैसर्गिक सौंदर्य, समुद्रकिनारे आणि टेबल माउंटन हे ठिकाण खास बनवते. वाइल्डलाइफ सफारी आणि येथील ऐतिहासिक स्थळे या ठिकाणाला आणखीनच खास बनवतात.
सँटोरिनी, ग्रीस
सॅंटोरिनीतील ग्रीस ही प्राचीन संस्कृतीची भूमी आहे. या भूमीने पाश्चात्त्य संस्कृती, तत्त्वज्ञान, साहित्य, कला आणि क्रीडा यांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. निळ्या घुमट असलेल्या चर्च आणि पांढऱ्या घरांसह सॅंटोरिनी हे जगातील सर्वात सुंदर बेटांपैकी एक आहे. हनिमून कपल्ससाठी हे ठिकाण एक लोकप्रिय ठिकाण आहे.