फोटो सौजन्य - Social Media
वृद्धत्व ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी वयानुसार हळूहळू शरीरावर परिणाम करू लागते. पण कुणालाही स्वतःच्या इच्छेने म्हातारे व्हायचं नसतं. दुर्दैवाने, अनेक वेळा आपण जितकं वृद्धत्वापासून दूर पळतो, ते आपल्याला तितक्याच वेगाने गाठतं. आजकाल अनेक लोक त्यांच्या प्रत्यक्ष वयापेक्षा अधिक वयाचे दिसू लागले आहेत आणि त्यांच्या शरीरावर वृद्धत्वाची लक्षणे लवकर जाणवू लागली आहेत. जर तुम्हीही अशा समस्यांना सामोरे जात असाल, तर तुम्ही कदाचित महागडी अँटी-एजिंग क्रीम्स, प्रॉडक्ट्स किंवा ट्रीटमेंट्स वापरून पाहिल्या असतील. पण तरीही जर तुमच्या त्वचेवर फारसा फरक दिसत नसेल, तर त्यामागे तुमच्याच काही चुकीच्या सवयी कारणीभूत असू शकतात. या लेखात आपण वृद्धत्वाची प्रमुख लक्षणं, कारणं आणि त्यापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी काय करावं याची माहिती घेणार आहोत.
वृद्धत्वाची प्रमुख लक्षणं कोणती?
वय वाढल्यावर शरीरावर येणाऱ्या बदलांपैकी सर्वात सामान्य लक्षण म्हणजे सैल झालेली त्वचा. त्याशिवाय चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, लहान रेषा (फाइन लाइन्स), काळे डाग, पिग्मेंटेशन ही देखील वृद्धत्वाची लक्षणं आहेत.
ही माहिती प्रसिद्ध त्वचा तज्ज्ञ डॉक्टर नीति गौर यांनी पॉडकास्टर राज शामनी यांच्याशी संवाद साधताना दिली आहे. त्यांनी सांगितले की आपली जीवनशैली ही वृद्धत्व लवकर येण्यामागचं एक मोठं कारण आहे.
तणाव – एक महत्त्वाचं कारण
डॉक्टर गौर यांच्या मते मानसिक तणाव हा वृद्धत्व लवकर येण्यामागे मोठा हात असतो. आजकाल बहुतांश लोक सतत कुठल्या ना कुठल्या तणावात असतात. यामुळे शरीरात ‘कॉर्टिसोल’ नावाचा स्ट्रेस हार्मोन अधिक प्रमाणात तयार होतो. हा हार्मोन त्वचेची चमक, केसांची मजबुती आणि शरीरातील ऊर्जा हळूहळू कमी करतो. यामुळे चेहऱ्यावर थकवा, सुरकुत्या आणि वयापेक्षा जास्त वय दिसू लागतं.
जीवनशैलीचा त्वचेवर होणारा परिणाम
जीवनशैलीचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. जर जीवनशैली अस्वस्थ असेल, तर त्याचे संकेत सर्वप्रथम त्वचेवर दिसायला लागतात. म्हणूनच, त्वचेला निरोगी ठेवायचं असेल, तर आहार, झोप, व्यायाम, आणि मानसिक आरोग्य याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
त्वचेची काळजी घ्या
अनेक लोक त्वचेच्या निगेलेकडे दुर्लक्ष करतात. पण रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला स्वच्छ करून योग्य स्किनकेअर प्रॉडक्ट्स लावणं खूप आवश्यक असतं. रात्रीच्या वेळेस त्वचा स्वतःचं पुनरुत्पादन करते, त्यामुळे रात्रीची नीट झोपही तितकीच महत्त्वाची असते. जर तुम्हाला स्किनकेअरचं मोठं रूटीन अवघड वाटत असेल, तर एक चांगला त्वचारोग तज्ज्ञ तुमच्यासाठी योग्य आणि सोप्पा रूटीन सुचवू शकतो.
आहारावर लक्ष द्या
उम्रपेक्षा लवकर म्हातारे न दिसण्यासाठी आहारात बदल करणेही अत्यावश्यक आहे. जंक फूड, तळलेले आणि तेलकट पदार्थ यापासून दूर राहणं गरजेचं आहे. त्याऐवजी अँटी-एजिंग गुणधर्म असणाऱ्या अन्नपदार्थांचा समावेश करा – जसं की फळं, भाज्या, नट्स, आणि हायड्रेटिंग पदार्थ. योग्य सल्ल्यासाठी तुम्ही आहारतज्ज्ञाचा किंवा डॉक्टरचा सल्लाही घेऊ शकता.
वृद्धत्व टाळता येत नाही, पण ते लांबवणं तुमच्या हातात आहे. जर तुम्हाला लवकर वृद्ध दिसण्यापासून स्वतःला वाचवायचं असेल, तर तुमच्या जीवनशैलीत बदल करणे आणि काही चुकीच्या सवयी टाळणे आवश्यक आहे. योग्य आहार, चांगली झोप, तणावमुक्त जीवन आणि नियमित त्वचा देखभाल यामुळे तुमचं सौंदर्य दीर्घकाळ टिकू शकतं.