
तरुण वयात होईल हाडांचा सांगाडा! Vitamin D ची कमतरता भरून काढण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ
शरीराला निरोगी राहण्यासाठी सर्वच विटामिनची आवश्यकता असते. त्यामुळे शरीरातील विटामिनची संतुलित ठेवणे आवश्यक आहे. पण बऱ्याचदा जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतात. शरीरात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विटामिन असते. कामाच्या धावपळीमध्ये थकवा, अशक्तपणा आणि कंबर दुखणे, हाडांच्या वेदनांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. पण सतत दुर्लक्ष केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. विटामिन डी ची कमतरता निर्माण झाल्यानंतर सतत मूड स्विंग होणे, थकवा, अशक्तपणा, जखमा लवकर बऱ्या न होणे, केस गळणे, वारंवार होणार सर्दी खोकला इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरासाठी विटामिन डी अतिशय महत्वाचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली विटामिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे संपूर्ण शरीराला योग्य पोषण मिळते.(फोटो सौजन्य – istock)
मानवी शरीरातील सर्वच हाडे कायम मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात विटामिन डी असणे आवश्यक आहे. विटामिन डी शरीरातील कॅल्शियम योग्य प्रमाणात शोषून घेते. पण या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर हाडे ठिसूळ होणे, हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, सांधे दुखी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय विटामिन डी च्या कमतरतेचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. एका अभ्यासात दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये १३-१८ वर्षे वयोगटातील तरुणांना व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा सर्वाधिक त्रास असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये ६७% किशोरवयीन मुलांचा सुद्धा समावेश आहे. विटामिन डी ची कमतरता निर्माण झाल्यास हाडांमधील वेदना वाढून अतिशय तीव्र होतात.
विटामिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत मिळणाऱ्या हलक्या उन्हात २० मिनिटं जाणून बसावे. यामुळे शरीराला विटामिन मिळेल. सकाळच्या वेळात सूर्याच्या किरणांमुळे शरीरात नैसर्गिकरीत्या विटामिन डी तयार होते. तसेच बाहेर गेल्यानंतर हात, पाय आणि पाठीवर सूर्यकिरण पडेल याची काळजी घ्यावी. सूर्याच्या किरणांमध्ये महिनाभर कायम जाणून बसल्यास विटामिनची कमतरता भरून निघेल.
ॲनिमियावाढीची चिंताजनक नोंद! राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कॅन्सरच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ
विटामिनची कमतरता भरून काढण्यासाठी काळे तीळ, साजूक तूप आणि बदाम इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांमध्ये चांगले फॅट्स विटामिन डी आढळून येते, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय सूर्याच्या प्रकाशात सुकवून घेतलेले मशरूम शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरतात. बऱ्याचदा आहारातून थेट विटामिन डी शरीराला मिळत नाही. त्यामुळे नियमित सूर्याच्या किरणांमध्ये बसायला जाणे आवश्यक आहे.
व्हिटॅमिन डी म्हणजे काय?
व्हिटॅमिन डी हाडे मजबूत ठेवण्यासाठी, कॅल्शियम आणि फॉस्फरसचे शोषण सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
व्हिटॅमिन डी कसे मिळवावे?
सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणे हा व्हिटॅमिन डी मिळवण्याचा सर्वात नैसर्गिक मार्ग आहे.सॅल्मन, हेरिंग आणि सार्डिन सारखे फॅटी फिश.मशरूम आणि दूध, चीज यांसारखे फोर्टिफाईड (प्रबलित) डेअरी उत्पादने.