वयाच्या पन्नाशीत तरुण राहण्याचे ब्युटी सिक्रेट! सकाळी उठल्यानंतर नियमित करा 'या' कॉफीचे सेवन
वय वाढल्यानंतर आरोग्यासोबतच त्वचेमध्ये सुद्धा अनेक बदल दिसतात. वाढलेली आजारपण, हाडांमधील वेदना इत्यादी अनेक गोष्टींसोबतच त्वचेवर सुरकुत्या सुद्धा वाढू लागतात. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आणि टॅनिंग, वांग कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांमुळे चेहऱ्यावर फारसा बदल दिसून येत नाही. सर्वच महिलांना अभिनेत्रींनप्रमाणे सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. वाढत्या वयात त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर चेहरा अतिशय निस्तेज आणि थकल्यासारखा वाटतो. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट करून घेतात. यामुळे फारकाळ चेहऱ्यावर तारुण्य टिकून राहत नाही.(फोटो सौजन्य – istock)
मोतीबिंदूमुळे डोळ्यांमध्ये वेदना होतात? डोळ्यांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री ही केवळ तिच्या अभिनयामुळेच नाहीतर तिच्या फिटनेस आणि डाएटमुळे सुद्धा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चाहत्यांना सतत काहींना काही ब्युटी टिप्स आणि सीक्रेट शेअर करत असते. चेहऱ्यावरील कमी झालेला ग्लो पुन्हा वाढवण्यासाठी केमिकल ट्रीटमेंट न करता घरगुती पदार्थांचे सेवन करून चेहऱ्यावर ग्लो वाढवावा. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होईल आणि अतिशय सुंदर दिसते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन आणि चेहऱ्यावरील ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या खास ड्रिंकचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या ड्रिंकचे महिनाभर नियमित सेवन केल्यास त्वचेवर अनेक सकारात्मक बदल दिसून येतील.
वाढलेले वजन कमी करताना आहारात बुलेट कॉफीचे सेवन केले जाते. या कॉफीमध्ये उच्च फॅट्स आणि कमी कार्ब्स असतात. बुलेट कॉफी बनवण्यासाठी ब्लॅक कॉफीमध्ये ग्रास फेड बटर किंवा शुद्ध साजूक तूप घालून ब्लेंडरमध्ये फेस येईपर्यंत मिक्स करून घ्या. त्यानंतर हे ड्रिंक अतिशय मलाईदार आणि क्रीम होईल. सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळच्या वेळी तुम्ही बुलेट कॉफीचे सेवन करू शकता. हा कॉफीचा प्रकार किटो डाएट किंवा इंटरमिटेंट फास्टिंग करणाऱ्या लोकांमध्ये खूप जास्त फेमस आहे. कॉफीमध्ये असलेल्या हेल्दी फॅट्समुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. याशिवाय तुम्हाला वारंवार भूक लागत नाही आणि कोणतेही तिखट, तेलकट पदार्थ खाण्याची अजिबात इच्छा होत नाही.
शरीराला योग्य प्रमाणात कार्ब्स मिळत नसतील तर बुलेट कॉफीचे सेवन करावे. या कॉफीच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जेसाठी लागणारे कार्ब्स मिळतात. तसेच पोटावर वाढला चरबीचा अनावश्यक घेर कमी होऊन जातो. कॉफीमध्ये असलेले कॅफेन आणि तुपामध्ये असलेले हेल्दी फॅट संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये घालवण्यासाठी मदत करतात. यामुळे शरीरातील ऊर्जा कायमच स्थिर राहते आणि आरोग्य सुधारते. शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी तूप अतिशय प्रभावी ठरते. सकाळच्या नाश्त्यात दुधाच्या चहाचे सेवन करण्याऐवजी बुलेट कॉफीचे सेवन करावे.
वजन कमी करण्याच्या टिप्स:
वजन कमी करण्यासाठी वास्तववादी आणि साध्य करण्यायोग्य ध्येये ठरवा.संतुलित आहार म्हणजे अनेक भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ खाणे. प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त पेये आणि फॅटी पदार्थ टाळा.
वजन कमी कसे करावे?
वजन कमी करण्यासाठी आणि वजन वाढवण्यासाठीही व्यायाम महत्त्वाचा आहे. तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा, कारण त्याचा तुमच्या वजनावर परिणाम होऊ शकतो.
वजन कधी तपासावे?
वजन तपासण्यासाठी सकाळची वेळ सर्वात चांगली आहे.व्यायामानंतर लगेच वजन तपासणे टाळा, कारण यामुळे योग्य परिणाम मिळत नाही.वीकेंडमध्ये जास्त खाल्ल्यानंतर वजन तपासणे टाळा, कारण त्यामुळे वजन जास्त दिसू शकते.






