कर्करोग, ॲनिमियावाढीची चिंताजनक नोंद! राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कॅन्सरच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ
जगभरात सगळीकडे कर्करोगाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते. शरीरात कॅन्सरच्या अनियंत्रित पेशी वाढू लागल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. कॅन्सर झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्याला हानी पोहचते. शरीराच्या कोणत्याही अवयवाला कॅन्सरची लागण होऊ शकते. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. जगभरात ब्रेस्ट आणि आतड्यांच्या कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. स्तनाच्या कॅन्सरची लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर सुद्धा महिला दुर्लक्ष करतात. असे केल्यामुळे आजार आणखीनच गंभीर होतो आणि संपूर्ण आरोग्य बिघडून जाते.(फोटो सौजन्य – istock)
मोतीबिंदूमुळे डोळ्यांमध्ये वेदना होतात? डोळ्यांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
राज्य सरकारच्या ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत घेतलेल्या आरोग्य शिबिरांमधून राज्यातील महिलांच्या आरोग्याविषयीचे वास्तव उघड करणारे आकडे समोर आले आहेत. आतापर्यंत एक कोटी ५१ लाख १० हजार महिलांची तपासणी करण्यात आली असून त्यात कर्करोग, अॅनिमिया, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळले आहेत. महिलांच्या आरोग्याचे हे चित्र राज्यातील आरोग्य व्यवस्थेला सावध करणारे असून नियमित तपासणी आणि जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित करत आहे.
५४ लाख ४७ हजार महिलांच्या तपासणीत १० हजार संशयित रुग्ण आढळले, त्यातील १,७५० महिलांची बायोप्सी घेण्यात आली. त्यापैकी २३४ महिलांना सर्विकस कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले. नागपूर, बुलढाणा, पुणे, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये या प्रकारचे रुग्ण सर्वाधिक आढळले आहेत.कर्करुग्णांचे प्रमाण१७, कर्करोगग्रस्त ४५०, २३४ सर्वायकल कर्करोगग्रस्त ३ या शिबिरांमध्ये एकूण ३ लाख ३८ हजार २७९ केंद्रांवर तपासणी झाली. त्यात १७ हजार ६१८ महिला मुखकर्करोगाच्या संशयित ठरल्या. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ३,७४४ संशयित रुग्ण नोंदवले गेले, तर बुलढाणा (१,२६९) आणि अमरावती (१,४६०) जिल्ह्यांमध्येही रुग्णसंख्या चिंताजनक आहे.
या शिबिरांमधून २,३४९ महिलांच्या बायोप्सी नमुन्यांपैकी ८४१ महिलांना मुखकर्करोग असल्याचे निश्चित झाले. नाशिक जिल्ह्यातील ५६५ संशयित रुग्णांपैकी ३४ जणींना कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले.राज्यात ८२ लाख ५१ हजार महिलांची स्तनकर्करोग तपासणी करण्यात आली. त्यापैकी १२.२८६ महिला संशयित ठरल्या.स्तन कर्करोगग्रस्त लाख ३८ हजार २७९ केंद्रांवर तपासणी, ८२ लाख ५१ हजार महिलांची स्तनकर्करोग तपासणी करण्यात आली आहे.
कर्करोग म्हणजे काय?
कर्करोग म्हणजे शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ होय, ज्या सामान्य ऊतींमध्ये पसरू शकतात.हे 100 पेक्षा जास्त प्रकारच्या रोगांचा समूह आहे, जे शरीरातील कोणत्याही ऊतीमध्ये सुरू होऊ शकतात.
कर्करोगाची सामान्य लक्षणे?
शरीरात किंवा कानाच्या मागे, मानेजवळ किंवा खांद्यांजवळ गाठ दिसू शकते जी 2-3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकते, वाढते किंवा कठीण असते.कोणत्याही असामान्य रक्तस्त्राव किंवा स्त्रावाकडे दुर्लक्ष करू नये.
कर्करोगावरील उपचार?
औषधांचा वापर करून कर्करोगाच्या पेशी नष्ट करणे. विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाच्या वाढीसाठी हार्मोन्सचा वापर करणे.कर्करोगाच्या पेशींमधील विशिष्ट बदलांवर लक्ष केंद्रित करणारी औषधे वापरणे.






