वॅक्सिंग केल्यानंतर 'या' चुका करणे टाळा
सुंदर दिसण्यासाठी सर्वच महिला काहींना काही करत असतात. त्यातील एक म्हणजे वॅक्सिंग किंवा थ्रेडींग करणे. चेहऱ्यावरील आणि शरीरावरील अतिरिक्त केस काढून टाकण्यासाठी वॅक्सिंग केले जाते. यामुळे चेहऱ्यावर किंवा शरीराच्या इतर भागांवर असलेले केस निघून जातात. यामध्ये आयब्रो, हाता – पायांचे वॅक्सिंग, अंडरआर्म्स, अप्पर लिप्स इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावरील अतिरिक्त केस काढण्यानंतर खूप छान लुक येतो असे महिलांना वाटते. थ्रेडींग, वॅक्सिंग, शेव्हिंग करताना शरीरावरीची त्वचा खेचली जाते. यामुळे संवेदनशील त्वचा असलेल्या महिलांना त्वचा रोग होऊ शकतो. त्यामुळे वॅक्सिंग करताना योग्य ती काळजी घेऊन मगच वॅक्सिंग करावे.
वॅक्सिंग करण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये हॉट व्हॅक्स, कोल्ड व्हॅक्स, चॉकलेट व्हॅक्स इत्यादी. शरीरावर असलेले नैसर्गिक केस काढताना त्वचा मोठ्या प्रमाणावर खेचली जाते. त्वचा खेचल्यामुळे तिथे डाग,पुरळ येण्याची भीती असते. हे पुरळ शरीरावरुन लवकर जात नाही. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला वॅक्सिंग केल्यानंतर कोणत्या गोष्टी करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: मीठ आणि साखरेतून तुम्ही खाताय प्लास्टिक! अभ्यासातून धक्कादायक खुलासा
काही महिलांना गरम किंवा कोमट पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते. पण वॅक्सिंग केल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करून नये. असे केल्यामुळे त्वचेचे नुकसान होऊन त्वचा काळी पडते.त्यामुळे वॅक्सिंग केल्यानंतर थंड पाण्याने अंघोळ करावी. गरम पाण्याचा वापर करू नये.
वॅक्सिंग केल्यानंतर ‘या’ चुका करणे टाळा
वॅक्सिंग केल्यानंतर सूर्यप्रकाशात जाणे टाळावे. यामुळे सूर्यप्रकाश थेट त्वचेवर लागतो आणि त्वचा काळी पडते. तसेच संवेदनशील त्वचा असलेल्या महिलांनी थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कामध्ये जाऊ नये. आवश्यकता असल्यास बाहेर जावे.
हे देखील वाचा: श्रावणात हातावर काढलेल्या मेहंदीचा रंग गडद होण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा वापर
वॅक्सिंग किंवा थ्रेडींग केल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावावे. तसेच वॅक्सिंग करताना पावडरचा वापर करावा. त्वचेवर मॉइश्चरायझर न लावल्याने पुरळ किंवा लाल डाग येण्यास सुरुवात होते. त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून चेहऱ्यावर नियमित मॉइश्चरायझर लावावे.