भारतामधील मीठ, साखरेच्या ब्रँडमध्ये आढळून आले प्लस्टिक
सर्वच स्वयंपाक घरांमध्ये मीठ आणि साखर आढळून येते. मीठ आणि साखरेशिवाय जेवणाला चवच लागत नाही. मीठाचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो तर साखरेचा वापर गोड पदार्थ, चहा किंवा कॉफी बनवण्यासाठी केला जातो. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये मीठ आणि साखरेचा समावेश आहे. पण आता मीठ आणि साखर खाणे आरोग्यसाठी धोकादायक ठरू शकते. कारण नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आले आहे.मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आल्यामुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे.
भारतामधील बाजार पेठांमध्ये विकल्या जाणाऱ्या सर्व ब्रँडच्या मीठ आणि साखरेमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आले आहेत. तसेच भारतामध्ये असलेल्या छोट्या मोठ्या ब्रँडचे साखर आणि मीठामध्ये प्लस्टिकचे कण आढळून आले आहेत. ‘टॉक्सिक्स लिंक’ या पर्यावरण संशोधन संस्थेने ‘मायक्रोप्लास्टिक्स इन सॉल्ट अँड शुगर’ या कंपनीने केलेल्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे. यासाठी संस्थेने पांढरे मीठ, सेंद्रिय खडे मीठ, समुद्री मीठ आणि कच्चे मीठ यांच्यासह इतर १० वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करण्यात आला आहे. तसेच त्यांनी ऑनलाईन आणि बाजारपेठेमधून खरेदी करण्यात आलेल्या साखरेच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यात फायबर, पेलेट्स, फिल्म्स आणि इतर तुकडे आढळून आले आहेत. तर यामध्ये सापडलेल्या मायक्रोप्लास्टिक्सचा आकार 0.1 मिलिमीटर एवढा आहे.
हे देखील वाचा: सकाळी झोपेतून उठल्यावर डोळे सुजतात? मग उठल्यानंतर नियमित करा ‘ही’ योगासने
मीठ आणि साखरेमध्ये आढळून आलेले मायक्रोप्लास्टिक्स मानवी आरोग्यसाठी घातक आहे. टॉक्सिक्स लिंकचे सहयोगी संचालक सतीश सिन्हा म्हणाले, आम्ही केलेल्या अभ्यासामध्ये सर्व मीठ आणि साखरेच्या नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक्स आढळून आले आहे. ही एक चिंतेची बाब असून मायक्रोप्लास्टिक्सचा मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. मीठामध्ये मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण 6.71 ते 89.15 तुकडे आढळून आले आहेत आणि साखरेमध्ये 89.15 तुकडे प्रति किलोग्रॅम आढळून आले आहेत. मीठ आणि साखरेमध्ये सापडलेले स्टिकचे कण अन्न, पाणी आणि हवेतून मानवी शरीरात प्रवेश करू शकतात.