मेहंदीचा रंग आणखीन गडद करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा
सणांचा महिना म्हणून श्रावण महिन्याची सगळीकडे ओळख आहे. श्रावणातील सणांची चाहूल लागल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. श्रावणात महिला उपवास करून मनोभावे शंकराची पूजा करतात. श्रावण महिन्यात केलेला उपवास आरोग्यासाठी चांगला असतो. या महिन्यात सर्वच स्त्रिया छान नटून थटून पूजा करण्यासाठी जातात. सणसमारंभ जवळ आल्यानंतर सगळ्यात आधी महिला पार्लरमध्ये जातात. पार्लरमध्ये जाऊन नख, केस, चेहरा इत्यादी वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. तसेच सणसमारंभ आणि लग्न सोहळ्यांमध्ये सर्वच महिला हातावर मेहंदी काढतात. मेहंदी काढल्यामुळे हात अगदी खुलून दिसतात.
नागपंचमी, रक्षाबंधन, गणेशोत्सव इत्यादी श्रावणातील सणांमध्ये सर्वच महिला हातावर मेहंदी काढतात. हातावर काढलेली मेहंदी छान रंगल्यानंतर हात उठावदार आणि आकर्षक दिसतात. मेहंदी काढल्यामुळे हातांचे सौंदर्य वाढते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हातावर काढलेली मेहंदी अधिक जास्त वेळ टिकून राहण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
मेहंदीचा रंग आणखीन गडद करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा
हातावर काढलेली मेहंदी आणखीन जास्त गडद होण्यासाठी लवंग किंवा लवंग तेलाचा वापर करा. लवंगमध्ये असलेले गुणधर्म मेहंदीचा रंग वाढवण्यासाठी मदत करतात. यासाठी तवा गरम करून त्यावर ७ ते ८ लवंगा टाकून गॅस बारीक करून घ्या. मेहंदी काढलेले हातांवर लवंगाची वाफ घेऊन मेहंदी अधिक काळ ठेवून घ्या. यामुळे तुमच्या मेहंदीला आणखीन गडद रंग येईल.
हे देखील वाचा: चेहरा चमकवण्यासाठी घरच्या घरी तयार करा उडदाच्या डाळीचा फेसपॅक! अनेक समस्यांवर रामबाण उपाय
मेहंदीचा रंग आणखीन गडद होण्यासाठी मेहंदी काढून झाल्यानंतर हाताला विक्स किंवा बाम लावा. यामध्ये असलेल्या मेन्थॉलमुळे मेहंदीचा रंग गडद होऊन मेहंदी जास्त काळ हातावर टिकून राहील. सणासुदीला मेंदी काढणं हे प्रत्येक महिलेला आवडतं. त्यामुळे मेहंदी काढल्यानंतर ती अधिक गडद कशी दिसेल याकडे तिचा कल असतो आणि त्यासाठी हा अत्यंत सोपा उपाय आहे.
कॉर्न सिरपचा वापर केल्याने हातावर काढलेली मेहंदी जास्त वेळ टिकून राहते. यासाठी कॉर्न सिरप पाण्यात मिक्स करून मेहंदी काढून झाल्यानंतर कापसाच्या साहाय्याने संपूर्ण हातांवर लावून घ्या. मेहंदी कोरडी झाल्यानंतर हळूहळू मेहंदी निघून जाईल.
हे देखील वाचा: फेस पॅक लावताना या 5 गोष्टी ध्यानात ठेवा
मोहरीच्या तेलाचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जातो. मोहरीच्या तेलामध्ये असलेले गुणधर्म मेहंदीचा रंग गडद होण्यासाठी मदत करतात. मेहंदी सुकल्यानंतर हातावरून काढून घ्या. त्यानंतर हातांना मोहरीचे तेल लावा. यामुळे मेहंदीचा रंग गडद होईल कारण मोहरीच्या तेलात जास्त उष्णता असते.