बहुगुणी पिंपळाचे पान शारीरिक व्याधी करतील दूर, कसं ते जाणून घ्या
वड आणि पिंपळ यांच्यासारखे वटवृक्षांची मुळं पाण्याचे ,साठे धरुन ठेवतात. त्यामुळे अशा झाडांची पुजा केली जाते. हिंदू शास्त्रात वडाप्रमाणे पिंपळाच्या झाडालादेखील महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेदात पिंपळाच्या झाडाला बहुगुणी म्हटलं जातं. पिंपळाच्या पानांचं सेवन केल्याने अनेक शारीरिक व्याधी दूर होतात. रोज पिंपळाच्या पानांचं सेवन केल्याने अनेक जुनाट आजार बरे होतात असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतं. पिंपळाच्या पानांन रोजच्या आहारात कसं सेवन करायचं याबद्दल जाणून घेऊयात.
पिंपळाच्या पानांचं आहरात रोज सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. असं आयुर्वेदात सांगितलं जातं. पिंपळाची फक्त पानंच नाही तर त्याची मुळं, खोड आणि बिया यांच्यात देखील औषधी गुणधर्म आढळतात.
पिंपळाची कोवळी पानं स्वच्छ धूवून घ्या. त्यानंतर गरम पाण्यात उकळून त्याचा काढा बनवा. त्यात चवीसाठी थोड मध टाका. हा काढा रोज सकाळी उपाशी पोटी प्या. यामुळे शरीराला पोषक घटक मिळातात.
-बद्धकोष्ठता, किंवा अपचनाची समस्या होत असेल तर पिंपळाच्या पानाचा काढा करुन प्या. पिंपळाच्या पानांचा हा रामनबाण उपाय तज्ज्ञांच्या सलल्याने घ्यावा असं सांगितलं जातं.
– पिंपळाच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. जर तुमचे दात सतत पिवळे पडत असतील किंवा तोंडाला सतत दुर्गंधी येत असेल तर पिंपळाच्या खोडाची साल आणि काळी मिरी हे एकत्र वाटून त्याची पावडर करा. ही पावडर दातांना लावा असं केल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होईल. त्याशिवाय हिरड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल, असं तज्ज्ञ सांगतात.
– बऱ्याचदा अनियमित मासिकपाळीमुळे चेहऱ्य़ावर पुरळ येतात. जर ही समस्या तुम्हाला होत असेल तर तुम्ही येत असेल पिंपळाच्या पानांचा रस प्यायल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. आणि डाग मुरुम नाहिसे होतात.
– पिंपळच्या पानांचा रस रोज सकाळी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते, म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांसाठी पिंपळाचं पानी वरदान असल्याचं म्हटलं जातं.
हिवाळ्यामध्ये संध्याकाळच्या जेवणात बनवा गरमागरम चविष्ट बाजरीची खिचडी, वाचा सोपी रेसिपी
– पिंपळाच्या मुळांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे क्षयरोग बरा होण्यास मदत होते. पिंपळाची मुळांचं रोज सकाळी सेवन केल्याने क्षयरोगाचा त्रास कमी होतो. त्याचबरोबर खोकला डांग्या खोकल्याची समस्या जाणवत असेल तर पिंपळाच्या मुळांचा हा घरगुती उपचार तुमच्या आजारांवर रामबाण उपाय आहेत.
-बदलत जाणाऱ्या जीवनशैलीत अनेकदा मानसिक आणि शारीरिक ताण वाढतो. नातेसंबंधात होणाऱ्या समस्या, सतत बाहेरचं फास्टफूड खाणं यामुळे हृदयावर याचा ताण येतो. त्यामुळे तरुण वयात हार्टअटॅकचं प्रमाण जास्त वाढत आहे. म्हणूनच पिंपळाच्या पानांचा रस प्यायल्याने हृदयाचं आरोग्य निरोगी राहतं. रोज चार ते पाच पानं गरम पाण्यात उकळवल्यानंतर हा काढा रोज तीन ते चार तासाच्या अंतराने प्या, त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता सुधारते.