वजन कमी करण्यासाठी फॉलो करा सोप्या टिप्स
थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी लवकर उठण्याची इच्छा कोणालाच होत नाही. वातावरणात असलेल्या गारव्यामुळे सकाळी लवकर उठायला होत नाही. यामुळे अनेक लोक जिमला जाणे किंवा व्यायाम करणे टाळतात. पण वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात बदल करून नियमित व्यायाम करणे सुद्धा गरजेचे आहे. व्यायाम केल्यामुळे शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होऊन शरीर स्लिम दिसू लागते. जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. पण तरीसुद्धा वजन कमी होत नाही. कमी महिला वजन कमी करण्यासाठी आहार तज्ञांकडून घेतलेला डाईट फॉलो करतात. पण तरीसुद्धा वजन कमी होत नाही. शरीराचे अतिरिक्त वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला थंडीच्या दिवसांमध्ये योग्य पद्धतीने कसे वजन करावे, याबद्दल काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यामुळे वाढलेले वजन कमी होईल आणि तुम्ही स्लिम दिसाल.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी उठण्याची इच्छा होत नाही. अशावेळी तुम्ही घरीसुद्धा व्यायाम करू शकता. योगासने, पायलेट्स आणि बॉडीवेट इत्यादी योगासने इत्यादी व्यायाम करावे. यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल. नियमित व्यायाम केल्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल. पण कामातून व्यायाम करण्यास वेळ मिळत नसेल तर नियमित वॉकिंग केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.
निरोगी आरोग्यसाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्य बिघडू लागते. त्यामुळे नियमित ७ ते ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते. शिवाय पोटावर वाढलेली चरबी कमी होऊ लागते.
थंडीच्या दिवसांमध्ये थंड पदार्थ खाण्याऐवजी आहारात सूप, भाज्या, फळे इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील. आहारात पालेभाज्या, फळभाज्या, फळे, ड्रायफ्रूट, सूप इत्यादी पदार्थांचे योग्य पद्धतीने सेवन केल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल आणि तुम्ही स्लिम दिसाल. आहारात तुम्ही ओट्स किंवा क्विनोआ सारख्या फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करू शकता. यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहील.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
दिवसभर काम करून थकून आल्यानंतर शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात अधिक ताण निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे पोटावरील चरबी वाढवणारे कोर्टिसोलचे प्रमाण वाढून पोटावर अतिरिक्त चरबी वाढते. शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. शरीरात निर्माण झालेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी विश्रांती आणि शांत झोप घेणे आवश्यक आहे.