बेली बटण पिअर्सिंग फॅशन करताना काय घ्यावी काळजी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
फॅशनचे जग सतत नवीन ट्रेंड स्वीकारते आणि त्याचा सतत वेगवेगळ्या पिढीत वापर होताना दिसून येतो. सध्या वेगाने उदयास येणारा ट्रेंड म्हणजे बेली बटन फॅशन, म्हणजेच नाभीला हायलाइट करणारी स्टाईल. महिलांसाठी, नाभी नेहमीच धाडस आणि स्टाइलचे प्रतीक राहिली आहे. नाभीत अंगठी वा रिंग घालण्याचा हा ट्रेंड खूप लोकप्रिय झाला आहे, विशेषतः तरुण मुलींमध्ये आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या प्रभावशाली लोकांमध्ये जे इन्फ्लुएसर आहेत, त्यांनी याला अधिक प्रकाशझोतात आणल्याचे दिसून येत आहे.
बेली बटन फॅशनची सुरुवात पॉप कल्चरमधून झाली असे मानले जाऊ शकते, जसे की बॉलिवूड चित्रपटांमध्ये जेव्हा अभिनेत्री क्रॉप टॉप किंवा लो-वेस्ट साड्या नेसत असत तेव्हा करिश्मा कपूर, रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टी सारख्या स्टार्सनी ९० च्या दशकातच नाभीला ग्लॅमरचा भाग बनवले. त्यानंतर, हॉलिवूडमधील ब्रिटनी स्पीयर्स आणि क्रिस्टीना अगुइलेरा सारख्या पॉप गायकांनी हा ट्रेंड अधिक जागतिक बनवला. आजचे डिझायनर्स नाभीला फोकसमध्ये आणणारे पोशाख डिझाइन करतात – जसे की क्रॉप टॉप, ब्रेलेट्स, ट्यूब टॉप आणि लो-वेस्ट पँट. हे केवळ पार्टी किंवा कॅज्युअल लूकमध्ये ट्रेंडी दिसत नाहीत तर आपले व्यक्तीमत्व दाखविण्याचा हा एक भाग बनला आहे. मेट गालापासून ते कॉलेज फेस्टपर्यंत, नाभीत रिंग घालणे ही एक सामान्य फॅशन बनली आहे.
सध्याचा ट्रेंड
सध्या अनेक मुली हा ट्रेंड आणखी पुढे नेण्यासाठी, नाभीमध्ये रिंग टोचून घेतात किंवा टॅटू काढतात. या बॉडी ज्वेलरीज नाभीला अधिक आकर्षक बनवतात, जे बहुतेकदा बारीक कंबर असलेल्या मुलींना अधिक छान दिसते.
काळजी घेणे महत्त्वाचे
इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट आणि टिकटॉक सारख्या प्लॅटफॉर्मवर बेली बटण दाखवणे हा ट्रेंड बनला आहे. रीलमध्ये क्रॉप टॉप घालून नाचणे किंवा बिकिनी लुकमध्ये नाभी दाखवणे हे एक स्टाईल स्टेटमेंट बनले आहे. तरुण पिढीमध्ये ही फॅशन वेगाने पसरत आहे. बेली बटण फॅशन ट्रेंडी असली तरी, त्यासोबत स्वच्छता राखणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही पिअर्सिंग केले असेल तर नियमित स्वच्छता, अँटीसेप्टिकचा वापर आणि घट्ट कपडे टाळणे महत्वाचे आहे जेणेकरून संसर्ग होणार नाही.
लग्न समारंभात उठून दिसतील ‘या’ पद्धतीचे लेटेस्ट फॅशन मंगळसूत्र, गळा दिसेल सुंदर
किती खर्च होतो
भारतात, बेली बटन पियर्सिंगची किंमत साधारणपणे ₹२००० ते ₹७००० पर्यंत असते. जर तुम्ही ते दिल्ली, मुंबई किंवा बंगळुरूसारख्या मोठ्या शहरातील चांगल्या आणि स्वच्छ पियर्सिंग स्टुडिओमधून केले तर ते ₹२५०० किंवा त्याहून थोडे जास्त किमतीत करता येते. परंतु जर तुम्ही ते लहान पार्लर किंवा स्वस्त ठिकाणी केले तर ते ₹५०० ते ₹१००० मध्येदेखील करता येते. परंतु लक्षात ठेवा, स्वस्त ठिकाणी स्वच्छता आणि सुरक्षिततेची काळजी घेतली जात नाही, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. म्हणून, थोडे जास्त पैसे देऊन विश्वासार्ह ठिकाणाहून पियर्सिंग करणे चांगले आहे.