भारतीय संस्कृतीमध्ये सौभाग्याचा अलंकार म्हणून मंगळसूत्राची विशेष ओळख आहे. लग्न झाल्यानंतर मुलींच्या गळ्यात मंगळसूत्र घातले जाते. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत धार्मिक मान्यतेनुसार पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया गळ्यात मंगळसूत्र घालतात. यामुळे नात्यामधील प्रेम आणि बांधिलकी टिकून राहते, असे बोलले जाते. तसेच मंगळसूत्राला संस्कृतमध्ये ‘मांगल्यतंतू’ असे म्हंटले जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लग्न समारंभात आणि इतर कार्यक्रमांमध्ये उठून दिसण्यासाठी लेटेस्ट फॅशन मंगळसूत्राच्या काही डिझाइन्स सांगणार आहोत. या डिझाइन्स नक्की ट्राय करून पहा.(फोटो सौजन्य-istock)
लेटेस्ट फॅशन मंगळसूत्र
अतिशय युनिक डिझाईनच मंगळसूत्र तुम्हाला जर हवं असेल तर ही डिझाईन नक्की ट्राय करून पहा. कारण हे मंगळसूत्र बनवण्यासाठी रंगाच्या मण्यांचा वापर करण्यात आला आहे.
काही महिला खूप जास्त हेवी मंगळसूत्र आवडत नाही. अशावेळी तुम्ही गेरू पॅटर्नमध्ये या पद्धतीच्या सुंदर डिझाइन्स नक्की ट्राय करू शकता.
साडी नेसल्यानंतर किंवा ड्रेस घातल्यावर काहींना नाजूक साजूक मंगळसूत्र घालायला खूप आवडतात. अशावेळी तुम्ही या डिझाइन्सचे मंगळसूत्र घालू शकता. या मंगळसूत्रामध्ये पेंडंट असल्यामुळे तुमचा लुक खूप सुंदर दिसेल.
लग्न समारंभात घालण्यासाठी या डिझाइन्सचे मंगळसूत्र अगदी बेस्ट आहेत. काळ्या मण्यांचा वापर करून बनवलेली मंगळसूत्र अतिशय उठावदार आणि सुंदर दिसतात.
अनेक महिलांना मोठे आणि हेवी मंगळसूत्र घालायला खूप आवडतात. अशांसाठी या डिझाइन्स अगदी बेस्ट आहेत.