Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केस पिकून पांढरे झाले आहेत? मग काळ्याभोर केसांसाठी ‘या’ पद्धतीने करा कलौंजी बियांचा वापर, केस होतील सुंदर

तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर मुली केसांना हेअर कलर लावतात. मात्र हा हेअर कलर फारकाळ केसांवर टिकून राहत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कलौंजी बियांचा वापर करून हेअर कलर बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 11, 2025 | 01:30 PM
केसांच्या वाढीसाठी कलौंजी बिया वापरण्याचे फायदे

केसांच्या वाढीसाठी कलौंजी बिया वापरण्याचे फायदे

Follow Us
Follow Us:

हल्ली कमी वयातच महिलांसह पुरुषांचे सुद्धा केस पांढरे होतात. केस पांढरे होण्यामागे अनेक कारण आहेत. केस काळे आणि लांबलचक ठेवण्यासाठी अनेक महिला सतत काहींना काही करत असतात. कधी केसांना हेअरमास्क लावणे तर कधी हेअर कलर केसांना लावला जातो. अनेक महिला थंडीच्या दिवसांमध्ये केसांची निगा राखण्यासाठी केसांना वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट करून घेतात, मात्र या केमिकल ट्रीटमेंटचा फारकाळ केसांवर प्रभाव टिकून राहत नाही. तसेच पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी हेअर कलर करून घेतला जातो. मात्र केमिकल युक्त हेअर कलर फारकाळ केसांवर टिकून राहत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी कलौंजी बियांचा कशा प्रकारे वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पद्धतीने कलौंजी बियांचा वापर केल्यास काळेभोर आणि सुंदर होतील.(फोटो सौजन्य – iStock)

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

केसांच्या वाढीसाठी कलौंजी बिया वापरण्याचे फायदे:

दैनंदिन आहारात कलौंजी बियांचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. या बियांमध्ये अँटीऑक्सिडेंट्स, ओमेगा-3, ओमेगा-6  फॅटीअसिड्स, विटामिन ए इत्यादी अनेक घटक आढळून येतात. या बियांचा वापर केल्यामुळे केस मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते. अनेक महिला केसांच्या निरोगी वाढीसाठी कलौंजी बियांचा वापर करतात. यामुळे पांढरे केस काळे होण्यास मदत होते.

कलौंजी बियांपासून हेअर कलर तयार करण्याची कृती:

साहित्य:

  • कलौंजी बिया
  • आवळा पावडर
  • भृंगराज
  • दही

कृती:

कलौंजी बियांपासून हेअर कलर तयार करण्यासाठी सर्वप्रथम, पॅनमध्ये कलौंजी बिया व्यवस्थित भाजून घ्या. त्यानंतर भाजून घेतलेल्या बिया मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. त्यानंतर वाटीमध्ये कलौंजी बियांची पावडर, आवळा पावडर, भृंगराज आणि दही टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार करून घेतलेला हेअर कलर केसांवर व्यवस्थित लावून घ्या. त्यानंतर 40 मिनिटं ठेवून केस पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे पांढरे केस काळे होण्यास मदत होईल. शिवाय केस लांबलचक आणि सुंदर दिसतील.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा 

घरगुती हेअर कलर लावल्यामुळे केसांना होणारे फायदे:

केसांच्या वाढीसाठी आवळा अतिशय फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी आढळून येते, ज्यामुळे केसांची वाढ निरोगी होण्यास मदत होईल. आवळ्याचे सेवन केल्यामुळे केसांवर सकारात्मक परिणाम दिसून येतात. शिवाय दही केसांना मुलायम आणि चमकदार करण्यासाठी मदत करते. केसांच्या वाढीसाठी नियमित एका आवळ्याचे सेवन करावे.भृंगराज पावडरचा वापर केल्यामुळे केस तुटणे, केस गळणे इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Benefits of applying homemade hair color home remedies for white hair benefits of using kalonji seeds for hair growth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2025 | 01:30 PM

Topics:  

  • hair care tips

संबंधित बातम्या

Hair Care: पांढऱ्या केसांसाठी कायमच केमिकल हेअर डायचा वापर करता? केसांना लावा ‘या’ हिरव्या पानांचा रस, केस होतील काळेभोर
1

Hair Care: पांढऱ्या केसांसाठी कायमच केमिकल हेअर डायचा वापर करता? केसांना लावा ‘या’ हिरव्या पानांचा रस, केस होतील काळेभोर

Hair Care: केसांना मिळेल पोषण अन् चमकही! अंड्यात ‘या’ गोष्टी मिसळून बनवा हेअर मास्क; जाणून घ्या पद्धत
2

Hair Care: केसांना मिळेल पोषण अन् चमकही! अंड्यात ‘या’ गोष्टी मिसळून बनवा हेअर मास्क; जाणून घ्या पद्धत

Hair Fall: शॅम्पूमुळे केस गळतात का? केसांच्या आरोग्यासाठी जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी
3

Hair Fall: शॅम्पूमुळे केस गळतात का? केसांच्या आरोग्यासाठी जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.