त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी या पद्धतीने करा बीटचा वापर
राज्यभरात सगळीकडे थंडी वाढली आहे. वाढत्या थंडीचा परिणाम आरोग्यासह त्वचेवरसुद्धा दिसून येतो. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची अधिक काळजी घेण्याची सल्ला दिला जातो. शिवाय या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच त्वचेची सुद्धा काळजी घ्यावी. वातावरणातील बदलांचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. यामुळे त्वचा कोरडी पडणे, पिंपल्स येणे, त्वचा निस्तेज होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट, फेसपॅक, फेसमास्क इत्यादी अनेक गोष्टी त्वचेवर लावल्या जातात. मात्र यामुळे त्वचेची गुणवत्ता अधिकच खराब होऊन जाते. त्वचेची काळजी घेण्यासाठी त्वचेला आतून पोषण देणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात. त्यामध्ये लाल रंगाचे बीट प्रामुख्याने सगळीकडे मिळते. बीट खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. दैनंदिन आहारात बीटचे सेवन केल्यास शरीरात निर्माण झालेली लोहाची आणि रक्ताची कमतरता कमी होण्यास मदत होईल. हिवाळ्यात ओठांची काळजी घेण्यासाठी आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी बीट अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला त्वचेसाठी बीटचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी काही महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रीम्स लावतात. मात्र यामुळे त्वचा वरून सुंदर दिसते. पण त्वचेला आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि खराब झालेली त्वचा सुधारण्यासाठी दैनंदिन आहारात बीटच्या रसाचे सेवन करावे. यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यामध्ये लोह, अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्वे इत्यादी अनेक गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे त्वचेवर डाग किंवा पिंपल्सचे डाग निघून जाण्यास मदत होते.
बीटरूटची पावडर तयार करण्यासाठी सर्वप्रथम बीटचे बारीक तुकडे करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यातील रस काढून उरलेला चोथा चार ते पाच दिवस उन्हामध्ये सुखण्यासाठी ठेवा. त्यानंतर मिक्सरमध्ये टाकून पुन्हा एकदा बारीक पावडर तयार करून घ्या. तयार केलेली पावडर तुम्ही काचेच्या बंद डब्यात भरून ठेवू शकता. या पावडरचा वापर करून तुम्ही फेसपॅक किंवा फेसमास्क बनवू शकता. यामुळे तुमच्या त्वचेला पोषण मिळेल.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेसोबतच ओठ सुद्धा कोरडे होऊन जातात. कोरडे ओठ पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. थंडी सुरु झाल्यानंतर ओठांना भेगा पडणे, ओठ कोरडे पडणे, ओठांमध्ये रक्त येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही बीटरूट लीप स्क्रबचा वापर करू शकता. यामुळे ओठांच्या सौंदर्यात भर पडेल.