गुडघ्यापर्यंत लांब केसांसाठी 'हा' घरगुती उपाय नक्की करून पहा
सर्वच महिलांना लांबलचक सुंदर केस हवे असतात. लांब केस वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करतात. मात्र वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते आणि केस कोरडे निस्तेज होऊन जातात. केसांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी केसांना पोषण देणे आवश्यक आहे. शिवाय दैनंदिन आहारात केसांच्या वाढीस आवश्यक असलेल्या घटकांचे सेवन केल्यास केसांची वाढ निरोगी होते. थंडीच्या दिवसांमध्ये अनेक महिला केसांवर वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट करून घेतात. मात्र याचा फारसा परिणाम केसांवर दिसून येत नाही. काही दिवस खूप सुंदर आणि सिल्की दिसतात. मात्र काही महिन्यांनंतर केस पुन्हा एकदा कोरडे आणि निस्तेज होऊन जातात. केसांच्या वाढीसाठी केसांची योग्य निगा राखणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
केसांची काळजी घेण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. केसांच्या निरोगी वाढीसाठी केसांना आठवड्यातून दोनदा तेल लावणे, केसांना सूट होईल अशा शॅम्पूचा वापर करणे, हेअर मास्क लावणे, आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात.मात्र केसांच्या वाढीसाठी शरीराला आतून पोषण देणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी कोरफडचा वापर कसा करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
केसांच्या वाढीसाठी केमिकल गोष्टींचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यासाठी कोरफड वापरावे. कोरफड केसांना लावल्यामुळे केसांची गुणवत्ता कायम टिकून राहते. शिवाय केस हायड्रेट आणि स्वच्छ राहतात. तसेच यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. कोरफडमध्ये असलेले विटामिन ए आणि ई त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा अतिशय फायदेशीर आहे. कोरफडमध्ये कांद्याचा रस मिक्स करून लावल्यास केसांची वाढ मजबूत होईल आणि केस सुंदर दिसू लागतील.
कोरफड आणि कांद्याचा रस मिक्स करून केसांना लावल्यास केसांची वाढ मजबूत होण्यास मदत होईल. यासाठी वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात कांद्याचा रस टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या 30 मिनिटं ठेवून नंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे केसांची चमक कायम तशीच टिकून राहील.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे केसांमध्ये कोंडा होऊन केसांवरील त्वचा तेलकट आणि चिकट होऊन जाते. केस कितीही स्वच्छ केले तरीसुद्धा केस तेलकटच लागतात., अशावेळी कोरफड जेलमध्ये लिंबाचा रस टाकून मिश्रण तयार करून घ्या. तयार केलेले मिश्रण टाळूवर व्यवस्थित लावून 30 मिनिटं मसाज करून घ्या. त्यानंतर पाण्याने केस स्वच्छ धुवा. हा उपाय केल्यामुळे केसांतील कोंडा कमी होऊन टाळू स्वच्छ होईल आणि केस सुंदर दिसतील.