
Blood Donation Benefits: रक्तदान केल्यामुळे हृदयाच्या आरोग्याला फायदे होतात का? जाणून घ्या रक्तदानाचे फायदे
Blood Donation Benefits: रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान मानले जाते. बऱ्याचदा अपघात, मोठ्या शस्त्रक्रिया, प्रसूतीदरम्यान होणारा रक्तस्राव, कर्करोगावरील उपचार आणि थॅलेसेमियासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींना कोणत्याही क्षणी रक्ताची आवश्यकता भासते. अशावेळी एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी निरोगी व्यक्तीचे रक्त घेतले जाते. आपत्कालीन परिस्थितींसाठी रक्ताचा नियमित पुरवठा असणे फार आवश्यक आहे. यामुळे संबंधित व्यक्तीचा जीव वाचतो. रक्तदान करताना रक्तदात्याची योग्य ती तपासणी करून नंतरच रक्त घेतले जाते. चला तर जाणून घेऊया रक्तदान केल्यामुळे शरीराला होणारे फायदे.(फोटो सौजन्य – istock)
Cancer: फुफ्फुसांचा कर्करोग आणि वायुप्रदूषणाचा संबंध; सूक्ष्म कण ठरत आहेत धोकादायक
रक्तदान म्हणजे निरोगी व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेऊन गरजू रुग्णाला दिले जाते. त्यानंतर रक्तपेढीत रक्ताची तपासणी करून रक्ताच्या लाल पेशी, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स असे घटक वेगवेगळे करून नंतर आवश्यकतेनुसार रुग्णांना दिले जातात. रक्तदान साधारणपणे १८ ते ६५ वर्षे वय असलेली कोणतेही महिला किंवा पुरुष रक्तदान करू शकतात. हिमोग्लोबिनची पातळी व्यवस्थित असल्यास रक्तदान करू शकतात.
रक्तदानापूर्वी रक्तदाब, हिमोग्लोबिन आणि इतर प्राथमिक तपासण्या केल्या जातात. रक्तदान केल्यामुळे शरीरातील रक्तपेशींच्या नैसर्गिक पुनर्निर्मितीच्या प्रक्रियेला चालना मिळते. याशिवाय शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरीरात लोहाचे अतिरिक्त संचय होण्याचा कमी होण्यास मदत होते. नियमित रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. रक्तदानामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि रक्त शुद्ध होण्यास मदत होते. शरीर डिटॉक्स करण्याचा उत्तम पर्याय म्हणजे ६ महिन्यातून एकदा रक्तदान करावे.
पंख्याच्या आवाजाशिवाय झोप लागत नाही? जाणून घ्या याच्या मागचं क्रेझी लॉजिक
बऱ्याचदा रक्तदान केल्यामुळे चक्कर येण्याची शक्यता असते. याशिवाय रक्तदान केल्यानंतर एक दोन दिवस मद्यपान व धूम्रपान करणे टाळावे. रक्तदान हे केवळ जनजागृती करण्यापुरते मर्यादित नसून गरजू रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. रक्तदान केल्यानंतर विश्रांती घेणे फार आवश्यक आहे. दिवसभर पुरेसे पाणी प्यायल्यास शरीरात वाढलेला थकवा कमी होण्यास मदत होईल. चक्कर किंवा अशक्तपणा जाणवल्यास त्वरित बसावे किंवा शांत विश्रांती घ्यावी.
Ans: रक्तदान केल्याने हृदयविकाराचा धोका निश्चितपणे कमी होतो, असे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. हृदय निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि रक्तदाब नियंत्रण महत्त्वाचे आहे.
Ans: रक्तदानामुळे गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध होण्यास मदत होते. तसेच रक्तदानापूर्वी हिमोग्लोबिन, रक्तदाब आणि नाडी यांसारख्या काही प्राथमिक तपासण्या केल्या जातात.
Ans: रक्तदानादरम्यान शरीरातील काही प्रमाणात लोह बाहेर पडते. त्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होऊ शकते. मात्र, लोहाची कमतरता असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रक्तदान करू नये.