तूप खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे
सकाळी उठल्यानंतर अनेकांना चहा पिण्याची सवय असते. चहा प्यायल्यानंतर अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते,तर काहींना सकाळी उठल्यानंतर लगेच चहा पिण्याची सवय असते. ग्रीन टी, हर्बल टी, आल्याचा चहा, चॉकलेट चहा असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचा चहा बनवून प्यायला जातो. चहा पिणे आरोग्यासाठी गुणकारी असते. पण सतत चहा प्यायल्यानंतर आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर शक्यता आरोग्यास गुणकारी असलेला चहा प्यावा. अनेकांना सकाळच्या वेळी हर्बल टी पिण्याची सवय असते. हर्बल टी व्यतिरिक्त तुम्ही तुपाचा चहा पिऊ शकता. यामुळे आरोग्याला सुद्धा अनेक गुणकारी फायदे होतील. आज आम्ही तुम्हाला तुपाचा चहा प्याल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया तुपाचा चहा पिण्याचे फायदे.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: भाजीत तेल जास्त झालं? मग चिंता सोडा आणि या घरगुती टिप्सचा वापर करा
तुपाच्या चहाचे सेवन केल्यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे नियमित तुपाचे सेवन करावे. तूप शरीरासाठी फायदेशीर आहे.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सर्वच महिलांना शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच पोट दुखी, कंबर दुखणे, उलट्या होणे इत्यादी अनेक समस्या जाणवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात तुपाचे सेवन करावे. नुसतेच तूप खायला जमत नसेल तर तुम्ही तुपाचा चहा सुद्धा बनवून पिऊ शकता.
बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात तुपाचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर तुपाचे पाणी किंवा तुपाचा चहा प्यावा. ज्यामुळे तुमचे पोट स्वच्छ होऊन शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघून जातील.
हे देखील वाचा: ओठांना पाहून ओळखू शकता आरोग्याची स्थिती; आपण किती निरोगी आहोत? काही सेकंदात जाणून घ्या
तुपाचा चहा बनवण्यासाठी दुधाचा वापर करू नये. टोपात पाणी घेऊन ते गरम झाल्यानंतर त्यात साखर आणि चहा पावडर टाकून व्यवस्थित पाणी उकळवून घ्या. चहाला उकळी आल्यानंतर त्यात आल्याचा तुकडा टाकून पुन्हा एकदा पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. नंतर गॅस बंद करून चहा गाळून त्यात एक चमचा तूप टाकून मिक्स करून घ्या.